Crime News : पाचव्या पत्नीनेच केली पतीची हत्या, गुप्तांगही कापलं; झोपेच्या गोळ्या देऊन चिरला गळा
Madhya Pradesh Crime : पतीच्या छळाला कंटाळून त्याच्या पाचव्या पत्नीनेच पतीची हत्या केली. इतकंच नाही तर आरोपी महिलेने हत्या केल्यानंतर पतीचं गुप्तांगही कापलं.
Fifth Wife Killed Husband : पाचव्या पत्नीनेच पतीला संपवल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. इतकंच नाही तर आरोपी महिलेने हत्या केल्यानंतर पतीचं गुप्तांगही कापलं. मध्य प्रदेशमधील ही धक्कादायक घटना समोर आली आहे. पतीच्या छळाला कंटाळून त्याच्या पाचव्या पत्नीनेच पतीची हत्या केली. कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत 21 फेब्रुवारी रोजी पोलिसांना रस्त्यावर एका तरुणाचा मृतदेह आढळला होता. मृतदेहाच्या मानेवर आणि गुप्तांगावर जखमा होत्या. यानंतर पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करत तपास सुरु केला होता.
21 फेब्रुवारीला रस्त्यावर आढळला मृतदेह
कोतवाली पोलीस स्टेशनचे अधिकारी अरुण पांडे यांनी सांगितले की, "उर्ती गावातील रहिवासी बिरेंद्र गुर्जरचा मृतदेह 21 फेब्रुवारी रोजी त्यांच्या घराजवळील रस्त्यावर सापडला होता. या घटनेची माहिती बिरेंद्रची पत्नी कांचन गुर्जरने पोलिसांना दिली. त्यानंतर अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर पोलिसांकडून या प्रकरणात तपास करण्यात आली. पोलिसांनी मृताच्या जवळच्या नातेवाईकांची चौकशी केली.
कुऱ्हाडीने चिरला गळा, गुप्तांगही कापलं
पोलीस अधिकारी अरुण कुमार पांडे यांनी माहिती देत सांगितलं की, "महिलेने पतीच्या जेवणात झोपेच्या 20 गोळ्या मिसळल्या. त्यामुळे जेवणानंतर पती गाढ झोपी गेला. यानंतर पत्नीने त्यांची गळा दाबून हत्या केली. त्यानंतर तिने पतीच्या गळ्यावर कुऱ्हाडीने वार केले. इतकंच नाही तर त्यानंतर महिलेने पतीचं गुप्तांगही कापलं. यानंतर पतीचा मृतदेह घरापासून काही दूर अंतरावर फेकून दिला."
चौकशीत हत्येचा उलगडा
पोलिसांनी तपास केला असता, मृत बिरेंद्रची पत्नी कांचनही संशयाच्या भोवऱ्यात आली. तिला ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी तिची कसून चौकशी केली असता संपूर्ण सत्य समोर आलं. कांचनने पोलिसांना सांगितले की, "तिचा पती अंमली पदार्थांचं व्यसन करायचा. तो दारुच्या नशेत तिच्यावर खूप अत्याचार करायचा, याला कंटाळून तिने पतीला संपवलं."
चौकशीत पत्नीने उघड केले रहस्य
पोलिसांनी तपास केला असता कांचनही संशयाच्या भोवऱ्यात आली. त्याला ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली असता संपूर्ण सत्य समोर आले. कांचनने पोलिसांना सांगितले की, "तिचा पती ड्रग्जचं व्यसन होतं. दारूच्या नशेत तो तिच्यावर खूप अत्याचार करायचा."
असा रचला पतीच्या हत्येचा कट
कांचनने सांगितले की, तिने पतीच्या हत्येचा कट रचला. 21 फेब्रुवारीच्या रात्री तिने पतीला जेवणातून 20 झोपेच्या गोळ्या खाऊ घातल्या. यामुळे तो गाढ झोपेत गेला. त्यानंतर तिने तिची निर्घृण हत्या केली. त्यानंतर तिने मृतदेह कपड्यात गुंडाळून सायकलवरुन नेला आणि घरापासून काही अंतरावर नेऊन रस्त्याच्या कडेला फेकून दिला. त्यानंतर आरोपी महिलेने मयत पतीचे कपडे आणि चप्पलही जाळली.
छळाला कंटाळून चार बायका गेल्या
तपासात समोर आलं की, मृताच्या छळाला कंटाळून त्याच्या चारही पत्नी त्याला सोडून गेल्या होत्या. त्यानंतर मृताने कांचन गुर्जर हिच्यासोबत पाचवं लग्न केलं. कांचनने त्याच्या छळाला कंटाळून पतीचीच हत्या केली.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Hong Kong Model Murder : सूप पॉटमध्ये सापडलं बेपत्ता मॉडेलचं डोकं, फ्रिजमध्ये मृतदेहाचे तुकडे