एक्स्प्लोर

Latur Molestation Case: लातूरमध्ये विनयभंग प्रकरणात सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, सदस्यांसह 16 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

लातूरमध्ये विनयभंग प्रकरणात सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, सदस्यांसह 16 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लातूर : मुलीस मारहाण करून विनयभंग केल्याप्रकरणी कोपरा किनगाव येथील सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, सदस्यांसह 16 जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी महिलेवरही अट्रोसिटीचा आणि शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गावातील भवानी मातेचे मंदिर अतिक्रमण केलेल्या जागेत आहे, ते पाडण्यास गेलेल्या लोकांनी विरोध करणाऱ्या तरुणीस विनयभंग करत जबर मारहाण केल्याचा घटना अहमदपूर तालुक्यातील कोपरा किणगाव या गावात घडली आहे. 16 लोकांविरोधात किणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील कोपरा किनगाव येथे भवानी मातेचे मंदिर आहे. गावातील सरपंच आणि इतर लोकांकडून ते मंदिर काढण्यासाठी प्रयत्न सुरू होते. कारण हे मंदिर अतिक्रमित जागेवर आहे, त्यामुळे ते काढावे लागेल असे त्यांचे मत होते. बारा तारखेस सरपंच गंगाधर डेपे आणि इतर 15 लोक तेथे गेले. सोबत जेसीबी नेण्यात आला होता. जागा साफ करण्याचे काम सुरू होते. त्यावेळी फिर्यादी महिला त्या ठिकाणी आली. महिलेने विरोध करण्यास सुरुवात करत पाड कामाचे आदेश आहेत का? असा प्रश्न केला. यावरून संतप्त झालेल्या लोकांनी काठीने सदरील महिलेस जबर मारहाण केली. या भांडणात काही महिलाही सामील होत्या. फिर्यादी महिलेस चावण्यात आले. दगडाने मारहाण करण्यात आली. गुप्तांगा वर दगडाने मारहाण केल्यामुळे महिला गंभीर जखमी झाली आहे. याघटनेनंतर पीडित महिलेने किणगाव पोलिसात तकार दिली आहे. 

विनयभंगप्रकरणी 16 गुन्हा दाखल
यावरून सरपंच गंगाधर डेपे, उपसरपंच बालाजी आचार्य, ग्रामसेवक, प्रशांत आचार्य, कांचन आचार्य, राहूल कांबळे, गहिनीनाथ आचार्य, सुभाष टेलर, मैनाबाई आचार्य, मैनाबाईचा मुलगा, शिला आचार्य, संतराम ग्रामपंचायत सेवक, भुराबाई आचार्य, शांताबाई आचार्य, सुभाष टेलरची बायको, जेसीबी ऑपरेटर यांच्यासह 16 लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. येथे मुलीस मारहाण करून तिचा विनयभंग करण्यात आल्याप्रकरणी गावचे सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, सदस्यांसह 16 जणांविरुध्द गुन्हा किनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
          
महिलेंवरही गुन्हा दाखल
याच घटनेत ग्रामसेवक रवींद्र क्षीरसागर यांच्या फिर्यादी वरून दोन महिला विरोधात जातीवाचक शिवीगाळ करुन शासकीय कामात अडथळा निर्माण करण्यात आला आहे. अशी तक्रार देण्यात आली आहे. यावरून गुन्हा दाखल करण्यात आला असून किणगाव पोलीस पुढील तपास करत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी ! रायगडच्या समुद्रकिनारी 8 जणांचा बुडून मृत्यू; पुण्यातील सहल फिरायला आल्याची माहिती
मोठी बातमी ! रायगडच्या समुद्रकिनारी 8 जणांचा बुडून मृत्यू; पुण्यातील सहल फिरायला आल्याची माहिती
इन्स्टाग्रामवर रील पाहिली, कल्पना सुचली, भाजी विक्रेत्यानं घरीच छापल्या 100 आणि 500 रुपयांच्या बनावट नोटा, धक्कादायक घटना समोर 
इन्स्टाग्रामवर रील पाहिली, कल्पना सुचली, भाजी विक्रेत्यानं घरीच छापल्या 100 आणि 500 रुपयांच्या बनावट नोटा, धक्कादायक घटना समोर 
प्रदीप पूर्णेकर मृत्यू प्रकरण! ठाण्यात समाज विघातक घटना वाढल्या, या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, भाजप आमदाराची मागणी
प्रदीप पूर्णेकर मृत्यू प्रकरण! ठाण्यात समाज विघातक घटना वाढल्या, या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, भाजप आमदाराची मागणी
Pradeep Purnekar : माझ्या नवऱ्याने यांच्या बायका पळवून नेल्या का? घरात गुंड घुसवून संपवेन; मीनाक्षी शिंदेंची ऑडिओ क्लिप संजय राऊतांकडून शेअर
माझ्या नवऱ्याने यांच्या बायका पळवून नेल्या का? घरात गुंड घुसवून संपवेन; मीनाक्षी शिंदेंची ऑडिओ क्लिप संजय राऊतांकडून शेअर

व्हिडीओ

Sanjay Raut PC Thane Purnekar Case : देवेंद्र फडणवीस...ठाण्यात फिरा मग कळेल, आक्रमक संजय राऊत UNCUT
Pradeep Purnekar Case : ठाकरेंच्या सैनिकावर फैरी पूर्णेकरांचे कोण वैरी? Special Report
India Alliance on EC : ज्ञानेश कुमारांना घेरलं इंडिया आघाडीचं ठरलं | Special Report ABP Majha
Thackeray Congress on EC : आयोगाविरोधात थोपटले दंड, विरोधकांची तयारी प्रचंड | Special Report ABP Majha
Ketan Agarwal Case : टॅटू, चॅटिंग, मर्डर; आरोपांचा डोंगर | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Water Link Tunnel : मुंबई-पुणे मिसिंग लिंकला समांतर आता 'वॉटर लिंक'! कोकणातील पुराचे पाणी मराठवाड्याकडे वळवणार; किसान आर्मीचा मोठा प्रस्ताव
मुंबई-पुणे मिसिंग लिंकला समांतर आता 'वॉटर लिंक'! कोकणातील पुराचे पाणी मराठवाड्याकडे वळवणार; किसान आर्मीचा मोठा प्रस्ताव
मोठी बातमी ! रायगडच्या समुद्रकिनारी 8 जणांचा बुडून मृत्यू; पुण्यातील सहल फिरायला आल्याची माहिती
मोठी बातमी ! रायगडच्या समुद्रकिनारी 8 जणांचा बुडून मृत्यू; पुण्यातील सहल फिरायला आल्याची माहिती
सकाळी बजरंग सोनवणेंकडून गंभीर आरोप, संध्याकाळी धनंजय मुंडे मुख्यमंत्र्यांना भेटले, दुष्काळाचं कारण
सकाळी बजरंग सोनवणेंकडून गंभीर आरोप, संध्याकाळी धनंजय मुंडे मुख्यमंत्र्यांना भेटले, दुष्काळाचं कारण
धक्कादायक! वडिलांनीच सख्ख्या मुलीला संपवलं, साताऱ्याच्या हद्दीत टाकून दिलं; अखेर 15 दिवसांनी हत्येचा उलगडा
धक्कादायक! वडिलांनीच सख्ख्या मुलीला संपवलं, साताऱ्याच्या हद्दीत टाकून दिलं; अखेर 15 दिवसांनी हत्येचा उलगडा
पक्षप्रवेश होताच काँग्रेसचा पहिला उमेदवार जाहीर; विधानपरिषदेसाठी शिक्षक मतदारसंघातून अदिती पोहरेंना उमेदवारी
पक्षप्रवेश होताच काँग्रेसचा पहिला उमेदवार जाहीर; विधानपरिषदेसाठी शिक्षक मतदारसंघातून अदिती पोहरेंना उमेदवारी
Mundhwa land deal case : 1 टक्का भागीदारावर कारवाई, मग 99 टक्के हिस्सा असलेल्या पार्थ पवारांना का वगळलं? मुंढवा जमीन घोटाळ्याप्रकरणी उच्च न्यायालयाकडून पुनरुच्चार, सुनावणीवेळी काय घडलं?
1 टक्का भागीदारावर कारवाई, मग 99 टक्के हिस्सा असलेल्या पार्थ पवारांना का वगळलं? मुंढवा जमीन घोटाळ्याप्रकरणी उच्च न्यायालयाकडून पुनरुच्चार, सुनावणीवेळी काय घडलं?
Maharashtra MLC Election: विधानपरिषदेसाठी महायुतीचा अंतिम फॉर्मूला ठरला; कोणत्या पक्षाला कोणती जागा मिळणार? पुणे पदवीधर कोण लढवणार?
विधानपरिषदेसाठी महायुतीचा अंतिम फॉर्मूला ठरला; कोणत्या पक्षाला कोणती जागा मिळणार? पुणे पदवीधर कोण लढवणार?
तहसीलदारांच्या खुर्चीवर खासदार बसले; निवडणूक आयोगाकडे तक्रार, तहसीलदारांच्या बडतर्फीची मागणी
तहसीलदारांच्या खुर्चीवर खासदार बसले; निवडणूक आयोगाकडे तक्रार, तहसीलदारांच्या बडतर्फीची मागणी
Embed widget