एक्स्प्लोर

Kurla Bus Accident: रिंग वाजताच खाली पाहिलं, ती चाकांमध्ये अडकलेली; मुलाने आई गमावली, म्हणाला, तिचे दागिनेही गायब!

Kurla Bus Accident: कुर्ला येथील अपघातात 55 वर्षीय कणीस फातिमा अंसारी यांचाही मृत्यू झाला.

Kurla Bus Accident मुंबई: मुंबईतल्या कुर्ल्यामध्ये काल रात्री नऊच्या सुमारास झालेल्या बेस्ट बसच्या अपघातानं (Mumbai Kurla Bus Accident) अवघा महाराष्ट्र हादरला. या अपघातात 7 जणांचा जीव गेला. तर 49 जण गंभीर जखमी झाले. त्याशिवाय बसच्या धडकेनं रस्त्यावरच्या 20-22 वाहनांचंही मोठं नुकसान झालं. या अपघातानंतर बसचालक संजय मोरेवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली आहे. तसेच हा अपघात नेमका का घडला? त्यात दोषी कोण? या प्रश्नांच्या उत्तराचा शोध सुरु झाला आहे. 

कुर्ला येथील अपघातात 55 वर्षीय कणीस फातिमा अंसारी यांचाही मृत्यू झाला. ते जिथे अपघात झाला त्या रस्त्यावर असलेल्या देसाई रुग्णालयमध्ये काम करीत होत्या. काल त्या कामावर जात असताना रुग्णालयाच्या समोरच हा अपघात झाला आणि त्यांचा मृत्यू झाला. कणीस फातिमा यांचा मृतदेह मोबाईलच्या वाजलेल्या रिंगमुळे समजल्याचे स्थानिकांनी सांगितले. अपघात झाल्यानंतर आम्ही मदत करण्यास धावलो. यानंतर उभे असताना मोबाईल रिंगचा आवाज आला. आम्ही खाली वाकून बघितलं तर एक महिला बस आणि कारच्या चाकांमध्ये अडकून पडल्या होत्या. बाहेर काढल्यानंतर त्या जवळील देसाई रुग्णालयात काम करणाऱ्या कणीस फातिमा असल्याचं समोर आलं. 

फातिमा यांचा मुलगा म्हणाला, आईच्या अंगावरील दागिने गायब-

अपघातानंतर आई कणीस फातिमा यांचा मृतदेह मिळाल्यानंतर मुलगा अबिदने खानने धक्कादायक माहिती दिली. आईच्या अंगावर काही दागिने होते. पोलिसांनी पंचनामा केला, त्यावेळी काही दागिने पोलिसांनी माझ्या बहिणीकडे दिले. मात्र त्यामधले कानातले गायब होते, असं अबिद खान म्हणाला. 

क्लच समजून चुकून अॅक्सिलरेटरवर पाय-

कुर्ल्यात अपघातग्रस्त बेस्ट बसच्या चालक संजय मोरेला केवळ तीन दिवसांचं इलेक्ट्रिक वाहन चालवण्याचं प्रशिक्षण देण्यात आलं होतं, अशीही माहिती समोर आली आहे. याआधी संजय मोरे जूनी बस चालवायचा. त्यामुळे संजय मोरेने अपघात झाला त्यावेळी क्लच समजून चुकून अॅक्सिलरेटरवर पाय दिल्यामुळे बस थांबण्याऐवजी तिचा वेग वाढला, अशी धक्कादायक माहिती देखील तपासात उघड झाली आहे. पोलीस याच दिशेने तपास करत असल्याचं सांगण्यात येत आहे.

संबंधित बातमी:

Kurla Bus Accident: कुर्ला बस अपघातानंतर बाप मदतीला धावला; अचानक हाती मुलाचाच मृतदेह आला, अंगावर काटा आणणारा क्षण!

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2019 पासून लोकमत ऑनलाईनमधून पत्रकारितेची सुरुवात. राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा, क्राईम, क्रीडा, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस. 

Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

पुण्यात पुन्हा 'वैष्णवी'ने संपवलं जीवन; सासरच्या जाचाला कंटाळून 8 महिन्यांतच विवाहितेचं टोकाचं पाऊल
पुण्यात पुन्हा 'वैष्णवी'ने संपवलं जीवन; सासरच्या जाचाला कंटाळून 8 महिन्यांतच विवाहितेचं टोकाचं पाऊल
Pune Crime News: पुण्यात प्रेमप्रकरणाचा भयंकर अंत; प्रेयसीच्या कुटुंबीयांनी प्रियकराला संपवलं; आईला व्हिडिओ कॉलवर दिली धमकी, एफआयआरमधून धक्कादायक माहिती समोर
पुण्यात प्रेमप्रकरणाचा भयंकर अंत; प्रेयसीच्या कुटुंबीयांनी प्रियकराला संपवलं; आईला व्हिडिओ कॉलवर दिली धमकी, एफआयआरमधून धक्कादायक माहिती समोर
Beed Crime News: 'तू रंगाने काळी आहेस, आम्हाला आवडत नाहीस', बीडमध्ये विवाहितेचा सासरच्यांकडून छळ, कंटाळून महिलेने आयुष्य संपवलं
'तू रंगाने काळी आहेस, आम्हाला आवडत नाहीस', बीडमध्ये विवाहितेचा सासरच्यांकडून छळ, कंटाळून महिलेने आयुष्य संपवलं
Beed Crime News: केवळ 1000 रुपयांचे शुल्क थकले, संतापलेल्या वसतीगृह चालकाकडून नववीतील विद्यार्थ्याला बेदम मारहाण; बीडमधील धक्कादायक घटना
केवळ 1000 रुपयांचे शुल्क थकले, संतापलेल्या वसतीगृह चालकाकडून नववीतील विद्यार्थ्याला बेदम मारहाण; बीडमधील धक्कादायक घटना

व्हिडीओ

North Korea Ballistic missile: एकीकडे इराण Vs अमेरिका युद्ध शिगेला, दुसरीकडे किम जोंग उन मैदानात, उत्तर कोरियाने 10 बॅलेस्टिक मिसाईल सोडल्या
Kishori Pednekar on Ritu Tawde : मुंबईच्या महापौर पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांपेक्षा मोठ्या झाल्या का? पेडणेकर आक्रमक
kharg Island Special Report : इराणच्या मुकूटमणीवर अमेरिकेचा शक्तिशाली बॉम्बहल्ला
Election Comission PC : 5 राज्यांच्या निवडणुकांचे बिगुल वाजणार? निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद
Kuldeep yadav Marriage : कुलदीप यादवच्या लग्नाची धूम, मैत्रीण वंशिकाबरोबर लग्नगाठ बांधली

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
नेपाळमध्ये भारतीय यात्रेकरूंना घेऊन जाणारी बस दरीत कोसळली; 7 जणांचा मृत्यू, मनकामना मंदिरातून परतताना भीषण अपघात
नेपाळमध्ये भारतीय यात्रेकरूंना घेऊन जाणारी बस दरीत कोसळली; 7 जणांचा मृत्यू, मनकामना मंदिरातून परतताना भीषण अपघात
Harish Rana Case: सुप्रीम कोर्टाची इच्छामरणाची परवानगी, 31 वर्षीय हरिश राणा शेवटच्या प्रवासाला निघाला; तब्बल 13 वर्षांच्या शारीरिक क्लेशातून मुक्त होणार
Video: सुप्रीम कोर्टाची इच्छामरणाची परवानगी, 31 वर्षीय हरिश राणा शेवटच्या प्रवासाला निघाला; तब्बल 13 वर्षांच्या शारीरिक क्लेशातून मुक्त होणार
BLOG: युद्धभूमीचा बदलता चेहरा; गनपावडरपासून अल्गोरिदम 'वॉर'रुमकडे
BLOG: युद्धभूमीचा बदलता चेहरा; गनपावडरपासून अल्गोरिद 'वॉर'रुमकडे
धाराशिवमध्ये भीषण अपघात, तीन वाहनाची विचित्र धडक; तीन जणांचा मृ्त्यू, 2 गंभीर
धाराशिवमध्ये भीषण अपघात, तीन वाहनाची विचित्र धडक; तीन जणांचा मृ्त्यू, 2 गंभीर
Baramati and Rahuri : बारामतीची पोटनिवडणूक सुनेत्रा पवार लढणार, राष्ट्रवादीकडून शिक्कामोर्तब; राहुरीत प्राजक्त तनपुुरे शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून इच्छुक, सूत्रांची माहिती
बारामतीत सुनेत्रा पवार पोडनिवडणूक लढवणार, सुनील तटकरेंची माहिती, राहुरीत प्राजक्त तनपुरे शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून इच्छुक, सूत्रांची माहिती
पुण्यात पुन्हा 'वैष्णवी'ने संपवलं जीवन; सासरच्या जाचाला कंटाळून 8 महिन्यांतच विवाहितेचं टोकाचं पाऊल
पुण्यात पुन्हा 'वैष्णवी'ने संपवलं जीवन; सासरच्या जाचाला कंटाळून 8 महिन्यांतच विवाहितेचं टोकाचं पाऊल
बारामती अन् राहुरीची पोटनिवडणूक बिनविरोध होऊ द्या, अन्यथा..; देवेंद्र फडणवीसांचं आवाहन अन् इशाराही
बारामती अन् राहुरीची पोटनिवडणूक बिनविरोध होऊ द्या, अन्यथा..; देवेंद्र फडणवीसांचं आवाहन अन् इशाराही
Iran War Live News: 'नेतान्याहू जिवंत असेल तर शोधून ठार मारणार, तो निष्पाप मुलांचा खुनी' ट्रम्पना होर्मुझमध्ये ट्रॅप करताच इराणचा युद्धाच्या 16व्या दिवशी गर्भित इशारा
'नेतान्याहू जिवंत असेल तर शोधून ठार मारणार, तो निष्पाप मुलांचा खुनी' ट्रम्पना होर्मुझमध्ये ट्रॅप करताच इराणचा युद्धाच्या 16व्या दिवशी गर्भित इशारा
Embed widget