एक्स्प्लोर

Ketan Agrawal Pune Lohagad Death Case: चेतन-सियाने डिलीट केलेले 'ते' चॅट्स रिकव्हर, चॅटिंगसाठी कोड लँग्वेज अन् निकनेमचा वापर; केतन अग्रवाल प्रकरणात चक्रावणारी माहिती

Ketan Agrawal Pune Lohagad Death Case: सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी हे दोघे मोबाईलवर संवाद साधण्यासाठी सांकेतिक भाषा आणि टोपण नावांचा वापर करत असल्याचे उघड झाले आहे.

Ketan Agrawal Pune Lohagad Death Case: लोणावळा जवळील लोहगड किल्ल्यावरून (Lohagad Fort) दरीत ढकलून करण्यात आलेल्या केतन अग्रवाल हत्या प्रकरणात (Ketan Agrawal Pune Lohagad Death Case) आता रोज नवनवे आणि चक्रावून टाकणारे खुलासे समोर येत आहेत. मुख्य आरोपी आणि केतनची होणारी पत्नी सिया गोयल (Siya Goyal) तसेच तिचा प्रियकर चेतन चौधरी (Chetan Chaudhari) हे दोघे मोबाईलवर संवाद साधण्यासाठी सांकेतिक भाषा (Code Language) आणि टोपण नावांचा (Nickname) वापर करत असल्याचे उघड झाले आहे. पुणे ग्रामीण पोलिसांनी आरोपींच्या मोबाईलमधील डिलीट केलेला डेटा रिकव्हर (Recovered Data) केला आहे. या सांकेतिक संभाषणाची पडताळणी करण्यासाठी दोघांची समोरासमोर चौकशी करण्याकरिता पोलिसांनी तीन दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली होती. मात्र, न्यायालयाने ही मागणी फेटाळून दोन्ही आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

18 जून रोजी केतन अग्रवालचा लोहगड किल्ल्यावरून ढकलून हत्या केल्याच्या आरोपावरून पुणे ग्रामीण पोलिसांनी (Pune Rural Police) सिया आणि चेतनला अटक केली आहे. त्यांच्या पोलीस कोठडीची मुदत संपल्याने त्यांना शुक्रवारी वडगाव मावळ येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए. एम. विभुते यांच्या न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते. यावेळी तपास अधिकारी मनोज पवार यांनी तपासातील प्रगती न्यायालयासमोर मांडली.

Ketan Agrawal Pune Lohagad Death Case: सरकारी वकील आणि पोलिसांचा युक्तिवाद

दोन्ही आरोपींचे एकूण तीन मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहेत. सरकारी वकील राजश्री वीरकुड यांनी न्यायालयात सांगितले की, "मोबाईलमधून रिकव्हर केलेल्या डेटामध्ये आरोपींनी सांकेतिक भाषेत संभाषण केल्याचे निदर्शनास आले आहे. या सांकेतिक शब्दांचा अर्थ आणि गुन्ह्याच्या कटाशी असलेला त्यांचा संबंध स्पष्ट करण्यासाठी दोघांची समोरासमोर चौकशी करणे अत्यंत आवश्यक आहे." दुसरीकडे, तांत्रिक तपासासाठी आरोपींना पोलीस कोठडीत ठेवण्याची गरज नाही, असा प्रतिवाद बचाव पक्षाचे वकील विपुल दुशिंग यांनी केला. न्यायालयाने दोन्ही बाजू ऐकून घेत आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली.

Ketan Agrawal Pune Lohagad Death Case: कटाची माहिती चेतनच्या मित्रालाही होती?

या हायप्रोफाईल प्रकरणाच्या तपासात आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. आरोपी चेतन चौधरी आणि सिया गोयल यांच्या संपर्कातील काही तरुणांचे जबाब पोलीस नोंदवत आहेत. तपासादरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार, केतन अग्रवालच्या हत्येच्या कटाची माहिती चेतन चौधरीच्या एका वर्गमित्राला आधीपासूनच होती. हा तरुण बीडचा (Beed) रहिवासी असून मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून तो चेतनच्या संपर्कात होता. विशेष म्हणजे, केतनचा जीव घेण्यासारखे टोकाचे पाऊल उचलू नये, यासाठी या मित्राने चेतन आणि सिया या दोघांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला होता, अशी माहिती समोर येत आहे. या मित्राकडून पोलिसांना आणखी महत्त्वाचे पुरावे मिळण्याची शक्यता आहे.

Ketan Agrawal Pune Lohagad Death Case: संमतीविना नार्को चाचणी नाही

सुनावणी दरम्यान दोन्ही आरोपींची नार्को चाचणी (Narco Test) करण्याचा मुद्दाही उपस्थित झाला. त्यावर न्यायालयाने स्पष्ट केले की, आरोपींच्या संमतीशिवाय नार्को चाचणी घेता येणार नाही. त्यानंतर सरकारी वकिलांनीही या टप्प्यावर नार्को चाचणीची आवश्यकता नसल्याचे सांगितल्याने नार्को चाचणीचा विषय सध्या तरी निकालात निघाला आहे. मात्र, केतन अग्रवाल प्रकरणात आणखी काय धक्कादायक माहिती समोर येणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. 

राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ

आणखी वाचा 

Ketan Agrawal Case : सियाच्या घरातून जुना मोबाईल पोलिसांना मिळाला; सिया-चेतन यांंच्या पहिल्या भेटीचा अन् 'दिवाळी पार्टी कनेक्शन'चा तपास, पोलिसांनी कोर्टात मांडला महत्त्वाचा पुरावा

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pune Baramati Crime News: अर्थवला शारीरिक संबंध ठेवायचेत, मला गोळी देतोय; मुलीचा आईला फोन, पुढच्या तासांत युवतीचा मृत्यू, बारामतीमधील हादरवून सोडणारी घटना
अर्थवला शारीरिक संबंध ठेवायचेत, मला गोळी देतोय; मुलीचा आईला फोन, पुढच्या तासांत युवतीचा मृत्यू, बारामतीमधील हादरवून सोडणारी घटना
Pune Crime News: वडापाव खाताना चुकून पायाला पाय लागला, संतापलेल्या वैभवने शिवमच्या छातीवर बुक्क्या मारल्या अन्...; पुण्यातील हादरवणारी घटना
वडापाव खाताना चुकून पायाला पाय लागला, संतापलेल्या वैभवने शिवमच्या छातीवर बुक्क्या मारल्या अन्...; पुण्यातील हादरवणारी घटना
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
Advertisement

व्हिडीओ

Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report
Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tejasvee Ghosalkar Gen Z: भाजपच्या तेजस्वी घोसाळकरांची जेन झी साठी महत्त्वाची मागणी, लोकल ट्रेनमधील तीन डबे आरक्षित करा, थेट रेल्वेमंत्र्यांना धाडलं पत्र
भाजपच्या तेजस्वी घोसाळकरांची जेन झी साठी महत्त्वाची मागणी, लोकल ट्रेनमधील तीन डबे आरक्षित करा, थेट रेल्वेमंत्र्यांना धाडलं पत्र
AR Rahman Son AR Ameen Car Accident: ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीनच्या गाडीचा भीषण अपघात; गायकाची पोर्शे कार एका कॅबला धडकली, अन्...
ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीनच्या गाडीचा भीषण अपघात; पोर्शे कार एका कॅबला धडकली, अन्...
Hardik Pandya Trade : हार्दिक पांड्याला घेण्यासाठी संघांची पैशांची जुळवाजुळव, पण मुंबई इंडियन्सने अद्याप पत्तेच उघडले नाहीत! KKR-CSKच्या प्लॅनला ब्रेक, नेमकं काय घडलं?
हार्दिक पांड्याला घेण्यासाठी संघांची पैशांची जुळवाजुळव, पण मुंबई इंडियन्सने अद्याप पत्तेच उघडले नाहीत! KKR-CSKच्या प्लॅनला ब्रेक, नेमकं काय घडलं?
ODI World Cup 2027 : कधीकाळी क्रिकेट विश्वावर राज्य, आता वर्ल्ड कप खेळण्यासाठी संघर्ष! 5 ICC ट्रॉफी जिंकणाऱ्या वेस्ट इंडिजची दाणादाण
कधीकाळी क्रिकेट विश्वावर राज्य, आता वर्ल्ड कप खेळण्यासाठी संघर्ष! 5 ICC ट्रॉफी जिंकणाऱ्या वेस्ट इंडिजची दाणादाण
Maharashtra Live blog updates: नाशिकसह पालघरमध्ये पुन्हा भूकंपाचे धक्के; जव्हार-विक्रमगड परिसर हादरला
Maharashtra Live blog updates: नाशिकसह पालघरमध्ये पुन्हा भूकंपाचे धक्के; जव्हार-विक्रमगड परिसर हादरला
PM Modi and Rohit Pawar: PM मोदी स्टेजवर येताच सुप्रिया सुळेंनी रोहित पवारांना हाताला धरुन खेचलं, पुढे काय घडलं?; सगळीकडे चर्चा, पाहा 38 सेकंदाचा VIDEO
PM मोदी स्टेजवर येताच सुप्रिया सुळेंनी रोहित पवारांना हाताला धरुन खेचलं, पुढे काय घडलं?; सगळीकडे चर्चा, पाहा 38 सेकंदाचा VIDEO
Kisan Sabha Protest : नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
Janardan Mishra Petrol : शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
Embed widget