एक्स्प्लोर

Ketan Agrawal Lohagadh Case Pune: केतन अग्रवाल प्रकरणात संशयाची सुई फिरली; सिया-चेतनसह आणखी कोणाचा सहभाग, ती व्यक्ती कोण?

Ketan Agrawal Lohagadh Case Pune: केतन अग्रवाल हत्येत सिया गोयल आणि प्रियकर चेतन चौधरीला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.

Ketan Agrawal Lohagadh Case Pune: केतन अग्रवाल (Ketan Agrawal) हत्येत सिया गोयल (Siya Goyal) आणि प्रियकर चेतन चौधरीला (Chetan Choudhari) बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. मात्र सिया आणि चेतनच्या कटात आणखी कोणाचा तरी सहभाग आहे? असा संशय लोणावळा पोलिसांना आहे. उरलेल्या दोन दिवसांच्या पोलीस कोठडीत सिया आणि चेतनकडे या अँगलने तपास केला जाणार आहे. त्यामुळं पोलिसांची संशयाची सुई नेमकी कोणाकडे आहे? आणि ती व्यक्ती नेमकी कोण? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे. 

केतनच्या हत्येप्रकरणी आत्तापर्यंत अनेकांचे जबाब नोंदवण्यात आलेत. यात सियाचा भाऊ साहिल, वडील प्रवीण आणि आई पूजा अशा संपूर्ण गोयल कुटुंबीयांची कसून चौकशी झालीये. सिया आणि केतनच्या लग्न ठरविण्यात मध्यस्थी असणारे मित्तल दाम्पत्याचे दोन दिवस जबाब नोंदवण्यात आलेत. बालीला प्री-विडिंग शूटसाठी जाताना मुंबई विमानतळापर्यंत सोडणाऱ्या कॅब ड्रायव्हरकडून ही घटनाक्रम जाणून घेण्यात आलाय. पण सिया आणि चेतनच्या कटात आणखी कोणाचा सहभाग आहे का? हे पोलिसांनी अद्याप स्पष्ट केलेलं नाही. मात्र रिमांड मिळवताना सिया आणि चेतनच्या कटात कोणाचा सहभाग आहे का? तशी चौकशी या दोघांकडे करायचं असल्याचं वडगाव न्यायालयात म्हटलं आहे. त्यामुळं लोणावळा पोलिसांची संशयाची सुई नेमकी कोणाकडे आहे? हा प्रश्न अजून ही अनुत्तरित आहे. (Ketan Agrawal Lohagadh Case)

सियाने केतनच्या फोनमधून डेटा केला डिलीट? (Ketan Agrawal Marathi News)

सियाने केतनच्या फोनमधून डेटा केला डिलीट?, केल्याचा पोलिसांना संशय आहे. केतनचा मोबाईल फॉरेन्सिक विभागाला पाठवून तपासणी केली जाणार आहे. खाली पडण्यापूर्वी केतनचा मोबाईल सियाकडे कसा आला, असा पोलिसांना संशय आहे. कुटुंब लोहगडावर पोहचल्यावर सियाने मोबाईल त्यांच्याकडे सुपूर्द केला. कुटुंब लोहगडपर्यंत पोहोचण्यापूर्वी सियाने मोबाईलमधील पुरावे डिलीट केला असल्याचा पोलिसांना संशय आहे.

केतनशी सियाला लग्न करायचं नाही, हे साहिलला आधीचं माहिती होतं- (Siya Goyal Brother Lohagadh Case Pune)

पुढं फूड मॉल वर सियाने केतनचा पासपोर्ट फाडून टाकला, मुंबई विमानतळावर पोहचल्यावर केतनला पासपोर्ट सापडला नाही. आता केतनशी सियाला लग्न करायचं नाही, हे साहिलला आधीचं माहिती होतं, मग केतनचा पासपोर्ट गायब झाल्यावर, तो सियाने गायब केलाय, ही शंका साहिलच्या मनात आली असेल का? जर शंका आली असेल तर ती शंका साहिलने उपस्थित का केली नसावी?, असा सवाल उपस्थित होत आहे.

रिक्रिएशनवेळी सियाच्या प्रियकराने केतनचा पुतळा लोहगडावरुन खाली ढकलला- (Ketan Agrawal Pune Marathi News)

केतन अग्रवाल हत्या प्रकरणी तपासाला आता वेग आला आहे. सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी अटकेत आहेत. न्यायालयाने सिया गोयल आणि चेतन चौधरीला 3 जुलैपर्यंत पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. केतन अग्रवाल हत्या प्रकरणात सिया गोयलचा प्रियकर आरोपी चेतन चौधरीचं काल (1 जूलै) लोहगडावर रिक्रिएशन करण्यात आलं. लोणावळा पोलिसांनी गुन्ह्याचं रिक्रिएशन केलं. यावेळी लोहगडावरील ज्या ठिकाणहून केतनला दरीत ढकलण्यात आलं. त्याचं जागेवरुन रिक्रिएशनवेळी सियाच्या प्रियकराने केतनचा पुतळा लोहगडावरुन खाली ढकलला. केतनच्या हत्येच्या दिवशी चेतन ज्या विषभूशेत आला होता, त्याच विषभूशेत त्याला लोहगडावर आणलं होतं. साधारण 2 तास 40 मिनिटं गुन्ह्याचं रिक्रिएशन सुरु होतं. केतनच्या हत्येच्या दिवशी सीसीटीव्हीत दिसलेला चेतनचं होता याची पोलिसांनी पडताळणी केली. दरम्यान, 28 जून रोजी सिया गोयलला देखील लोहगडावर घेऊन जाऊन पोलिसांनी गुन्ह्याचं रिक्रिएशन केलं होतं. त्यानंतर काल चेतन चौधरीला लोहगडावर नेऊन पोलिसांनी केतनच्या हत्ये गुन्ह्याचं रिक्रिएशन केलं. रिक्रिएशनवेळी सियाच्या प्रियकराने केतनचा पुतळा लोहगडावरुन खाली ढकलला. केतनच्या हत्येच्या दिवशी नेमकं कशा पद्धतीने त्याला लोहगडावरून ढकलण्यात आलं, याची माहिती पोलिसांनी घेतली.

पोलिसांना पुष्टी देणारे पुरावे सादर करावे लागतील- (Siya Goyal Ketan Agrawal Lohagadh Case Pune)

चेतन चौधरीवर हे सर्व सध्या केवळ आरोप आहेत. हे आरोप सिद्ध होणे गरजेचे आहे आणि पोलिसांना पुष्टी देणारे पुरावे सादर करावे लागतील. त्यांनी मांडलेला घटनाक्रम प्रत्यक्षात घडला होता, हे दर्शवण्यासाठी त्यांना काहीतरी ठोस पुरावा दाखवावा लागेल. पोलीस त्यांचे काम करत आहेत; गेल्या सात दिवसांपासून तपास सुरू आहे. घटनास्थळाचे पुनर्निर्मिती (सीन रिक्रिएशन) करण्यापासून ते चालण्याच्या पद्धतीचे विश्लेषण (गेट ॲनालिसिस) करण्यापर्यंत उपलब्ध असलेल्या सर्व साधनांचा ते वापर करतील. तपास पूर्ण झाल्यानंतरच समजेल की, या सिद्धांतांना पुष्टी देण्यासाठी पोलिसांकडे नेमके कोणते पुरावे आहेत. आरोपीचे बचाव पक्ष म्हणून, आमचे लक्ष एखादा पर्यायी सिद्धांत मांडण्यापेक्षा पोलिसांकडून सादर केलेल्या पुराव्यांच्या अचूकतेची आणि त्रुटींची बारकाईने तपासणी करण्यावर आहे, अशी प्रतिक्रिया चेनत चौधरीचे वकील राधेशिकेश उत्तरवार यांनी दिली होती. 

संबंधित बातमी:

Ketan Agrawal Lohagadh Case Pune: रिक्रिएशनवेळी सियाच्या प्रियकराने केतनचा पुतळा लोहगडावरुन खाली ढकलला तेव्हा...; थरकाप उडवणारा VIDEO

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nashik Ashram School : मुले फरशीवर झोपतात, तिथेच अभ्यास, रात्रीच्या अंधारात कपडे धुवावे लागतात; नाशिकच्या आश्रमशाळेची स्थिती, लाखोंचा निधी कुठे जातोय? 
मुले फरशीवर झोपतात, तिथेच अभ्यास, रात्रीच्या अंधारात कपडे धुवावे लागतात; नाशिकच्या आश्रमशाळेची स्थिती, लाखोंचा निधी कुठे जातोय? 
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
Junnar Pimpalwandi Case: सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
मन हेलावणारी दुर्घटना, विजेचा धक्का बसून दोन भावांचा मृत्यू, सुदैवाने आई बचावली; भोईटे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
मन हेलावणारी दुर्घटना, विजेचा धक्का बसून दोन भावांचा मृत्यू, सुदैवाने आई बचावली; भोईटे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
Advertisement

व्हिडीओ

Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mobile Recharge Price Hike : मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
Ravindra Jadeja : 'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
Dharashiv School : म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
Junnar Pimpalwandi Case: सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
Ind vs Pak Hockey: जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
Embed widget