एक्स्प्लोर

Ketan Agrawal Case : केतनला संपवण्याच्या कटाची 'त्या' तिसऱ्या तरुणाला पूर्ण कल्पना! चेतनच्या मित्राला पुणे पोलिसांनी उचललं, बीड कनेक्शन उघड, त्याने...

Ketan Agrawal Case : केतन अग्रवाल यांच्या हत्येचा कट किती पूर्वनियोजित होता, हे आता स्पष्ट होऊ लागले आहे.

पुणे: पुण्यातील प्रसिद्ध रिअल इस्टेट व्यावसायिक केतन अग्रवाल यांच्या क्रूर हत्या प्रकरणाचा तपास जसजसा पुढे सरकत आहे, तसतसे रोज नवे आणि चक्रावून टाकणारे खुलासे समोर येत आहेत. आता या संपूर्ण हत्या प्रकरणात आणि खुनाचा कट रचण्यामध्ये आणखी एका तिसऱ्या तरुणाचे नाव समोर आल्याने खळबळ उडाली आहे. हा तरुण मुख्य आरोपी चेतन चौधरी याचा वर्गमित्र (Classmate) असल्याची माहिती तपासात निष्पन्न झाली असून, त्याला पुणे ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

Ketan Agrawal Case : खुनाचे 'प्लॅनिंग' आधीच केले होते डिस्कस!

मिळालेल्या माहितीनुसार, केतन अग्रवाल यांच्या हत्येचा कट किती पूर्वनियोजित होता, हे आता स्पष्ट होऊ लागले आहे. आरोपी चेतन चौधरी आणि केतनची होणारी पत्नी सिया गोयल या दोघांनी मिळून हत्येचा संपूर्ण आराखडा (Planning) या वर्गमित्रासोबत आधीच डिस्कस म्हणजेच शेअर केला होता. इतकेच नाही तर, गुन्ह्याच्या दिवशी म्हणजेच १८ जून रोजी केतनला ज्या लोहगडावर नेऊन दरीत ढकलण्यात आले, तिथे सोबत चालण्यासाठी चेतन आणि सियाने या मित्राकडे वारंवार आग्रह धरला होता. मात्र, काही कारणास्तव तो तरुण १८ जून रोजी त्यांच्यासोबत लोहगडावर गेला नाही आणि एका मोठ्या गुन्ह्यात थेट सहभागी होण्यापासून वाचला.

Ketan Agrawal Case : हत्या केल्यानंतर चेतन सर्वात आधी 'त्यालाच' भेटला!

या प्रकरणातील सर्वात खळबळजनक आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, लोहगडावर केतन अग्रवाल यांचा दरीत ढकलल्यानंतर आरोपी चेतन चौधरी हा इतर कोणालाही न भेटता थेट याच आपल्या वर्गमित्राला जाऊन भेटला होता. केतनचा खून केल्याची कबुली किंवा माहिती त्याने सर्वप्रथम याच मित्राला दिल्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. केवळ चेतनच नाही, तर दुसरी मुख्य आरोपी सिया गोयल हिने देखील या तरुणाशी संपर्क साधून संवाद साधला होता, अशी माहिती पोलीस तपासात समोर आली आहे.

Ketan Agrawal Case : कोण आहे हा तिसरा तरुण? 'बीड' कनेक्शन समोर

पोलिसांनी ताब्यात घेतलेला हा संशयित तरुण मूळचा बीड जिल्ह्यातील आहे. तो सध्या पुण्यात स्थायिक असून बालेवाडी परिसरातील एका नामांकित खासगी कंपनीत नोकरी करतो. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून तो सतत आरोपी चेतन चौधरीच्या संपर्कात होता. त्यांच्यात नियमित संवाद सुरू होता आणि याच काळात केतनला संपवण्याचा कट रचला जात होता.

Ketan Agrawal Case : "खून करू नका..." तरुणाने दिला होता सल्ला?

पुणे ग्रामीण पोलिसांनी या तरुणाला ताब्यात घेतले असून त्याची कसून चौकशी सुरू आहे. प्राथमिक चौकशीदरम्यान या तरुणाने पोलिसांना एक महत्त्वाचा दावा केला आहे. चेतन आणि सिया जेव्हा केतनच्या खुनाचा प्लॅन आखत होते, तेव्हा "केतनचा खून करू नका, असे पाऊल उचलणे महागात पडेल," असा सल्ला आपण त्या दोघांना दिला होता, अशी माहिती या तरुणाने पोलिसांना दिली आहे.

जरी या तरुणाने त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला असल्याचा दावा केला असला, तरी एका व्यक्तीच्या खुनाचा कट रचला जात आहे हे माहीत असूनही त्याने ही माहिती पोलिसांपासून का लपवली? गुन्ह्याची माहिती असून ती दडपल्याप्रकरणी त्याच्यावर काय कारवाई होणार? आणि हत्येनंतर चेतन त्याला का भेटला? या सर्व बाबींचा शोध आता पुणे ग्रामीण पोलीस घेत आहेत. या नव्या खुलाशामुळे केतन अग्रवाल हत्या प्रकरणाला आता एक वेगळे वळण मिळाले आहे.

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Crime News: आधी गळा आवळून 35 वर्षीय व्यक्तीला संपवलं, नंतर हात बांधून बॉडी पाण्याच्या टाकीत फेकली अन्...; मुंबई हादरली!
आधी गळा आवळून 35 वर्षीय व्यक्तीला संपवलं, नंतर हात बांधून बॉडी पाण्याच्या टाकीत फेकली अन्...; मुंबई हादरली!
Pimpri Chinchwad Crime: पिंपरी चिंचवडच्या कुटुंबाने आयुष्य संपवण्यासाठी निवडला भयानक वेदनादायी मार्ग, विषारी सोडियम नायट्रेटचा धूर फुफ्फुसात गेला अन्....
पिंपरी चिंचवडच्या कुटुंबाने आयुष्य संपवण्यासाठी निवडला भयानक वेदनादायी मार्ग, विषारी सोडियम नायट्रेटचा धूर फुफ्फुसात गेला अन्....
Thane Accident News : रस्त्यावरच्या खड्ड्याने TDRF च्या जिगरबाज जवानाचा बळी घेतला, आई,बायको अन् जुळ्या मुली पोरक्या झाल्या
रस्त्यावरच्या खड्ड्याने TDRF च्या जिगरबाज जवानाचा बळी घेतला, आई,बायको अन् जुळ्या मुली पोरक्या झाल्या
Thane Bhiwandi Accident : काल फ्लॅट बघायला जाताना दुचाकी खड्ड्यात गेली, महिला थेट ट्रकच्या चाकाखाली, आज TDRF चा जवानाचं डिव्हायडरवर डोकं आपटलं, भिवंडीत खड्ड्यांचे बळी
काल फ्लॅट बघायला जाताना दुचाकी खड्ड्यात गेली, महिला थेट ट्रकच्या चाकाखाली, आज TDRF चा जवानाचं डिव्हायडरवर डोकं आपटलं, भिवंडीत खड्ड्यांचे बळी
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Abhijeet Dipke On Narendra Modi : मोदींची डिग्री खरी असावी.. अभिजीत दिपके थेटच बोलले..
Sanjay Raut PC : संघामध्ये मोदी-शाहांनी आपले चमचे पेरले आहेत,संजय राऊतांचा हल्लाबोल
Balasaheb Fadnavis On Devendra Fadnavis: माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; देवेंद्र फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Special Report on Palghar : खड्ड्यांत महामार्ग, धोक्यात प्रवास, मनोर-भिवंडी मार्ग मृत्यूचा प्रवास | ABP Majha
Maharashtra Freedom Conversion Act : धर्मांतरावर बंधन, कायद्याचं संरक्षण, विरोधकांचं आक्षेप का?
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vinesh Phogat On Brij Bhushan Sharan Singh: लैंगिक छळाच्या आरोपातून बृजभूषण सिंह यांची निर्दोष मुक्तता; विनेश फोगाट यांची पहिली प्रतिक्रिया, सगळं सांगून टाकलं!
लैंगिक छळाच्या आरोपातून बृजभूषण सिंह यांची निर्दोष मुक्तता; विनेश फोगाट यांची पहिली प्रतिक्रिया, सगळं सांगून टाकलं!
Bankipur By-election Prashant Kishor: प्रशांत किशोरांची बांकीपुरात निर्णायक आघाडीकडे वाटचाल, भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्यात तगडा हादरा बसल्याने पक्षासह ऑफिसमध्येही अभुतपूर्व सन्नाटा
प्रशांत किशोरांची बांकीपुरात निर्णायक आघाडीकडे वाटचाल, भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्यात तगडा हादरा बसल्याने पक्षासह ऑफिसमध्येही अभुतपूर्व सन्नाटा
'बिग बॉस मराठी' विनर झाल्यानंतर तन्वी कोलतेचं पहिलं वहिलं अल्बम साँग; नव्या लूकची चाहत्यांना पडलीय भूरळ, PHOTOs
'बिग बॉस मराठी' विनर झाल्यानंतर तन्वी कोलतेचं पहिलं वहिलं अल्बम साँग; नव्या लूकची चाहत्यांना पडलीय भूरळ, PHOTOs
Thane Accident News : रस्त्यावरच्या खड्ड्याने TDRF च्या जिगरबाज जवानाचा बळी घेतला, आई,बायको अन् जुळ्या मुली पोरक्या झाल्या
रस्त्यावरच्या खड्ड्याने TDRF च्या जिगरबाज जवानाचा बळी घेतला, आई,बायको अन् जुळ्या मुली पोरक्या झाल्या
Pimpri Chinchwad Crime: पिंपरी चिंचवडच्या कुटुंबाने आयुष्य संपवण्यासाठी निवडला भयानक वेदनादायी मार्ग, विषारी सोडियम नायट्रेटचा धूर फुफ्फुसात गेला अन्....
पिंपरी चिंचवडच्या कुटुंबाने आयुष्य संपवण्यासाठी निवडला भयानक वेदनादायी मार्ग, विषारी सोडियम नायट्रेटचा धूर फुफ्फुसात गेला अन्....
Tukaram Mundhe Marathi News: तरुणाई गुलामगिरीत अडकली, बाहरे निघण्यासाठी आता फक्त एकमेव मार्ग; तुकाराम मुंढेंचं आवाहन, नेमकं काय म्हणाले?
तरुणाई गुलामगिरीत अडकली, बाहरे निघण्यासाठी आता फक्त एकमेव मार्ग; तुकाराम मुंढेंचं आवाहन, नेमकं काय म्हणाले?
दोन दोन उपमुख्यमंत्री मराठ्यांचे, तुम्ही ओबीसींवर अन्याय करता? विजय वडेट्टीवारांचा थेट सवाल, सरकारला हल्लाबोल
दोन दोन उपमुख्यमंत्री मराठ्यांचे, तुम्ही ओबीसींवर अन्याय करता? विजय वडेट्टीवारांचा थेट सवाल, सरकारला हल्लाबोल
कोल्हापूरच्या प्रसिद्ध बाळूमामा मंदिरात तब्बल 60 कोटी 75 लाखांच्या गैरव्यवहाराचा आरोप; उपनिबंधक रागिणी खडके फरार, तिघांविरोधात गुन्हा दाखल
कोल्हापूरच्या प्रसिद्ध बाळूमामा मंदिरात तब्बल 60 कोटी 75 लाखांच्या गैरव्यवहाराचा आरोप; उपनिबंधक रागिणी खडके फरार, तिघांविरोधात गुन्हा दाखल
Embed widget