Crime : ज्या लेकीला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपली, तीच प्रियकरासोबत पळून गेल्याने आई-वडिलांनी संपवले जीवन, केरळमधील धक्कादायक घटना
Kerala Crime : एक दिवस मुलगी प्रियकरासह घरातून पळून गेली. तिच्या जाण्यानंतर आई-वडील फार दु:खी झाले. नैराश्यात जगू लागले.
Kerala Crime : आई आणि वडील आपल्या मुलांना मोठ्या इच्छेने वाढवतात. त्यांना लिहायला, वाचायला शिकवतात. त्यांना पात्र बनवतात. पण काही मुले स्वतःच्या स्वार्थासाठी पालकांच्या इच्छेचा त्याग करतात. केरळमधील कोल्लम जिल्ह्यात असाच एक प्रकार समोर आला आहे. येथे एक मुलगी कॉलेजमध्ये शिकत होती. आणि तिथल्या एका मुलावर प्रेम करू लागली. तिच्या घरच्यांना या प्रेमप्रकरणाची माहिती मिळताच त्यांनी तिला विरोध केला. पालकांचा असा विश्वास होता तो मुलगा त्यांच्या मुलीसाठी लायक नव्हता.
...आणि एक दिवस मुलगी प्रियकरासह घरातून पळून गेली
आई-वडिलांचा विरोध पाहून एक दिवस मुलगी प्रियकरासह घरातून पळून गेली. तिच्या जाण्यानंतर आई-वडील फार दु:खी झाले. नैराश्यात जगू लागले. त्यांच्या उपचारासाठी औषधे घेणे सुरू केले. औषधांच्या अतिसेवनामुळे दोघांचा मृत्यू झाला. कोल्लम जिल्ह्यातील पावुंबा येथील रहिवासी उन्नीकृष्ण पिल्लई आणि त्यांची पत्नी बिंदू पिल्लई अशी मृतांची नावे आहेत. मुलीच्या अशा कृत्यामुळे हे दाम्पत्य मानसिकदृष्ट्या अस्वस्थ होते, असे पोलिसांनी सांगितले.
28 वर्षीय प्रशिक्षणार्थी डॉक्टरची आत्महत्या
गेल्या वर्षी केरळमधील तिरुवनंतपुरममध्ये आत्महत्येची खळबळजनक घटना समोर आली होती. येथे एका 28 वर्षीय प्रशिक्षणार्थी डॉक्टरने आत्महत्या केली होती. लग्नासाठी मृताच्या प्रियकराने तिच्याकडे हुंड्याची मागणी केल्याचे सांगण्यात आले. पोलिसांना सुसाईड नोटही सापडली होती. मृत शहाना ही तिरुअनंतपुरम मेडिकल कॉलेजच्या शस्त्रक्रिया विभागात पीजीची विद्यार्थिनी होती. 5 डिसेंबर 2023 रोजी ती महाविद्यालयाजवळील भाड्याच्या घरात मृतावस्थेत आढळली. ती आरोपी डॉक्टर रुवाईजशी लग्न करणार होती.
हेही वाचा>>>
UP Crime : प्रॉपर्टीचा वाद, आईची आज्ञा आणि दोन मुलांनी जन्मदात्याच्याच हत्येचा रचला कट, पोलिसांचा तपास सुरू