Kerala Rape : बलात्काराच्या आरोपांत दोषीला तब्बल 135 वर्षांची शिक्षा अन् 5 लाखांचा दंड; चुलत बहिणीवरच लैंगिक अत्याचार केल्याचं प्रकरण
Kerala Rape Case: बलात्काराच्या आरोपांत दोषीला कोर्टानं सुनावली तब्बल 135 वर्षांची शिक्षा अन् 5 लाखांचा दंडअल्पवयीन चुलत बहिणीवरच लैंगिक अत्याचार केल्याचं प्रकरण
Raping Impregnating Minor Cousin: केरळ (Kerala) न्यायालयानं एका व्यक्तीला आपल्या चुलत बहिणीवर बलात्कार केल्याप्रकरणी 135 वर्षांची शिक्षा सुनावली आहे. त्यानं आपल्या चुलत बहिणीवर अनेकवेळा बलात्कार केला आणि त्यातूनच ती गरोदरही ठेवल्याचा आरोप केरळमधील एका व्यक्तीवर सिद्ध झाले आहेत. पीडितेनं बालकल्याण समितीच्या देखरेखीखाली मुलाला जन्म दिल्याचं वकिलांनी न्यायालयात सांगितलं आहे.
हरिपाद फास्ट ट्रॅक विशेष न्यायालयाचे (Fast Track Special Court) न्यायाधीश साजी कुमार यांनी 24 वर्षीय तरुणाला लैंगिक गुन्ह्यांपासून संरक्षण कायदा (Protection of Children from Sexual Offences Act), भारतीय दंड संहिता, माहिती तंत्रज्ञान कायदा (Information Technology Act) आणि बाल न्याय कायदा (Juvenile Justice Act) या कायद्यांतर्गत दोषी ठरवलं असून कायद्यांतील तरतुदींनुसार वेगवेगळ्या शिक्षा सुनावण्यात आल्या आहेत.
सरकारी वकील (Public Prosecutor) रघु के यांनी या प्रकरणाबाबत माहिती देताना सांगितलं की, सर्व प्रकरणांमध्ये, दोषीला एकूण 135 वर्षांची शिक्षा झाली आहे. तसेच, सर्व शिक्षा एकाचवेळी चालतील, असंही ते म्हणाले.
5 लाखांचा दंड
केरळमधील न्यायालयानं दोषी व्यक्तीला 5.1 लाख रुपयांचा दंडही ठोठावला आहे. घटनेच्या वेळी 15 वर्षांच्या असलेल्या अल्पवयीनं पीडितेला 4 लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचे निर्देशही जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाला (District Legal Services Authority) न्यायालयाकडून देण्यात आले होते.
देशात अल्पवयीनं मुलींवरील बलात्कारांच्या घटनांमध्ये वाढ
देशात महिला आणि अल्पवयीनं मुलींसोबत बलात्कार आणि लैंगिंक अत्याचाराच्या घटनांमध्ये दिवसागणिक वाढ होत आहे. नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो (National Crime Records Burea) च्या रिपोर्टनुसार, 2021 मध्ये अल्पवयीनं मुलींसोबत लैंगिक अत्याचार झाल्याची 36,069 प्रकरणं नोंदवण्यात आली होती. अल्पवयीन मुलांसोबतच्या गुन्ह्यांची सर्वाधिक प्रकरणं पोक्सो कायद्यांतर्गत नोंदवण्यात आली आहेत. जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 5 वर्षांपासून अल्पवयीन महिलांवरील बलात्काराच्या घटनांचा आलेख वाढला आहे.
या अहवालानुसार, राजधानी दिल्लीत सर्वाधिक गुन्हे दाखल होत आहेत. 2021 मध्ये दररोज दोन अल्पवयीन मुलींसोबत बलात्काराच्या घटना समोर येत होत्या.
महत्त्वाच्या इतर बातम्या :