एक्स्प्लोर

लग्नासाठी मुलगी मिळेना, 26 वर्षीय तरुणानं विष घेत उचललं टोकाचं पाऊल

विजयनगर : कर्नाटकमधील विजयनगरमध्ये (Vijayanagara) धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. लग्न (marriage) जमत नसल्यामुळे एका तरुणाने स्वत:ला संपवलेय.

विजयनगर : कर्नाटकमधील विजयनगरमध्ये (Vijayanagara) धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. लग्न (marriage) जमत नसल्यामुळे एका तरुणाने स्वत:ला संपवलेय. कुडलिगी तालुक्यातील गुडेकोटे या गावात हा धक्कादायक प्रकार घडलाय. लग्न जमत नसल्यामुळे 26 वर्षीय तरुण त्रस्त झाला होता. त्यामुळे त्याला दारुचे व्यसनही (alcohol) जडले होते. त्यातच त्याने विष प्राशन करुन स्वत:ला संपवलं. या धक्कादायक प्रकारानंतर गुडेकोटे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी (Police) घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी तरुणाचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवला आहे. 

लग्न होत नसल्यामुळे 26 वर्षीय तरुणाने विष प्राशन करुन आत्महत्या केली. तरुणाच्या मृत्यूनंतर कुटुंबियांमध्ये दु:खाचं वातावरण आहे. आईनं टाहो फोडला.. तर इतर कुटुंबियांच्या डोळ्यातही अश्रू होते. गावातील लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, 26 वर्षीय तरुण लग्न जमत नसल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून त्रस्त होता.  त्याला दारुचं व्यसनही जडलं होतं. लग्न जमत नसल्यामुळे तो तरुण दररोज दारु पीत होता. या टेन्शनमध्येच तरुणाने टोकाचं पाऊल उचलले. पोलिसांनी तरुणाच्या मृत्यूचं कारण आत्महत्या असल्याचे रिपोर्टमध्ये नमूद केलेय. त्याशिवाय पोलिसांनी या प्रकरणाचा कसून तपास सुरु केला आहे. गावातील आणि कुटुंबातील लोकांची चौकशी केली जात आहे. आत्महत्याच केली की इतर कोणत्या कारणामुळे तो मृत झालाय? याचा तपास पोलिस करत आहेत.

लग्न जमत नसल्यामुळे तरुण त्रस होता - 

मीडिया रिपोर्ट्सनुसार,  गुडेकोटे गावातील 26 वर्षीय बी मधुसूदन हा लग्न जमत नसल्यामुळे त्रस्त होता. त्याचं नात्यामध्ये अथवा इतर कुठेही सोयरीक जुळत नव्हती. लग्न जमत नसल्यामुळे मधुसूदन मानसिकरित्या खचला होता. या कारणामुळे त्याला दारुचे व्यसनही जडलं होतं. तो दारुच्या प्रचंड आहारी गेला होता. त्याच्या या कृत्यमुळेही त्याला मुलगी देण्यास कुणीही तयार नव्हतं. मधुसूदन याच्या या व्यवहाराची, कृत्याची गावभर चर्चा होती. 

विष प्राशन करत संपवलं -

मीडिया रिपोर्ट्सनुसार, लग्न जमत नसल्यामुळे 26 वर्षीय मधुसूदन याने विष प्राशन केले होतं. त्याची तब्येत बिघडल्यामुळे त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले.  बेल्लारी येथील बीम्स रुग्णालयात त्याला उपचारासाठी आणलं होतं. येथे डॉक्टरांनी मधुसूदन याच्या उपचार सुरु केले. पण प्रकृती अधिक बिघडल्यामुळे मधुसूदन याचा मृत्यू झाला. मधुसूदन याने विष प्राशन करताना लग्न होत नसल्याचं सांगितलं होतं. मधुसूदन याच्या निधनानंतर कुटुंबात दुखाचं वातावरण आहे. याप्रकरणाची माहिती गुडेकोटे पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी मधुसूदन याचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आलाय. त्याशिवाय पोलिसांकडून याप्रकरणाची कसून चौकशी करण्यात येत आहे.  

महत्त्वाच्या बातम्या

Nashik Crime News: नाशिकमध्ये पुन्हा पर्यटकांवर हल्ला, हरिहर किल्ल्यावरून परतणाऱ्या गाडीचा पाठलाग करत तोडफोड, 10 जणांविरोधात गुन्हा
नाशिकमध्ये पुन्हा पर्यटकांवर हल्ला, हरिहर किल्ल्यावरून परतणाऱ्या गाडीचा पाठलाग करत तोडफोड, 10 जणांविरोधात गुन्हा
Solapur Crime News: 'तुझ्या आमदाराला गोळ्या घालून ठार कर, तुला पैसे देतो'; आमदाराच्या वाहन चालकाला आमिष दाखवलं अन्...; सोलापुरातील खळबळजनक घटना
'तुझ्या आमदाराला गोळ्या घालून ठार कर, तुला पैसे देतो'; आमदाराच्या वाहन चालकाला आमिष दाखवलं अन्...; सोलापुरातील खळबळजनक घटना
Mumbai Crime News: विक्रोळीतील ज्या घरात वडील-मुलाचा दुर्दैवी अंत झाला, आता 'सील' केलेल्या त्याच घराला लागली भीषण आग; सिलिंडरचाही स्फोट, नेमकं काय घडलं?
विक्रोळीतील ज्या घरात वडील-मुलाचा दुर्दैवी अंत झाला, आता 'सील' केलेल्या त्याच घराला लागली भीषण आग; सिलिंडरचाही स्फोट, नेमकं काय घडलं?
कौटुंबिक वाद विकोपाला, सख्या चुलतभावानेच संपवलं भावाला, धक्कादायक घटनेनं अकोला हादरलं
कौटुंबिक वाद विकोपाला, सख्या चुलतभावानेच संपवलं भावाला, धक्कादायक घटनेनं अकोला हादरलं

व्हिडीओ

Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jharkhand Student Protest: झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
Video: पावसासाठी चक्क मगरीच्या तोंडासमोर बसून पूजा; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल, कृष्णा नदीच्या काठावर आली होती मगर
Video: पावसासाठी चक्क मगरीच्या तोंडासमोर बसून पूजा; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल, कृष्णा नदीच्या काठावर आली होती मगर
विरोधकांच्या एकमुखी एल्गारानंतर अखेर अमित शाह जंतरमंतर आंदोलनावर संसदेत उत्तर देणार, मात्र कधी बोलणार याची माहिती नाही, दिल्ली पोलिसांनी विद्यार्थ्यांना सोलून काढल्यानंतर संसदेत फिरकलेच नाहीत
विरोधकांच्या एकमुखी एल्गारानंतर अखेर अमित शाह जंतरमंतर आंदोलनावर संसदेत उत्तर देणार, मात्र कधी बोलणार याची माहिती नाही, दिल्ली पोलिसांनी विद्यार्थ्यांना सोलून काढल्यानंतर संसदेत फिरकलेच नाहीत
शाळकरी मुलींचं रस्त्यातील खड्ड्यांबाबत रिपोर्टींग; व्हायरल व्हिडिओवर आमदार थोरवेंचं स्पष्टीकरण
शाळकरी मुलींचं रस्त्यातील खड्ड्यांबाबत रिपोर्टींग; व्हायरल व्हिडिओवर आमदार थोरवेंचं स्पष्टीकरण
Ranchi Student Protest : रांचीत विद्यार्थी अन् पोलिसांमध्ये धुमश्चक्री; पेपरफुटीविरोधात आंदोलन, विद्यार्थ्यांविरोधात अश्रूधुराच्या नळकांड्या अन् लाठीचार्ज
रांचीत विद्यार्थी अन् पोलिसांमध्ये धुमश्चक्री; पेपरफुटीविरोधात आंदोलन, विद्यार्थ्यांविरोधात अश्रूधुराच्या नळकांड्या अन् लाठीचार्ज
Abhijeet Dipke On Jharkhand Student Protest: झारखंडमध्ये विद्यार्थ्यांच्या आंदोलनात पोलिसांकडून लाठीचार्ज, पाण्याचा मारा; अभिजीत दीपकेंची पहिली प्रतिक्रिया, तीन शब्दांत विषय संपवला!
झारखंडमध्ये विद्यार्थ्यांच्या आंदोलनात पोलिसांकडून लाठीचार्ज; अभिजीत दीपकेंची पहिली प्रतिक्रिया, तीन शब्दांत विषय संपवला!
देवेंद्र फडणवीस आजवर मनोज जरांगेंना कधी भेटले का? भास्कर जाधवांचा सवाल, म्हणाले, बदनाम करण्याचा प्रयत्न
देवेंद्र फडणवीस आजवर मनोज जरांगेंना कधी भेटले का? भास्कर जाधवांचा सवाल, म्हणाले, बदनाम करण्याचा प्रयत्न
108 रुग्णवाहिकेसाठी 7 वेळा फोन, 2 तास वाट पाहिली, तरी आलीच नाही; गर्भवतीसह बाळाचा मृत्यू, 5 जणांविरुद्ध गुन्हा
108 रुग्णवाहिकेसाठी 7 वेळा फोन, 2 तास वाट पाहिली, तरी आलीच नाही; गर्भवतीसह बाळाचा मृत्यू, 5 जणांविरुद्ध गुन्हा
Embed widget