Kalyan Crime : दोन बहिणींकडून शेजारी राहणाऱ्या वृद्धाच्या गुप्तांगावर प्रहार; कारण जाणून तुम्हालाही बसेल धक्का
Kalyan Crime Latest News : कल्याण पश्चिम भागात शेजारी-शेजारी राहणाऱ्या कुटुंबामध्ये वाद झाला आणि दोन बहिणींनी शेजारच्या व्यक्तीला मारहाण केली.
ठाणे : शेजारी शेजारी लागून असलेल्या बंगल्यात राहणारे दोन सख्खे शेजारी पक्के वैरी झाल्याची घटना समोर आली आहे. झाडाची कुंडीसाठी कट्टा बांधल्याच्या वादातून शेजारच्या बंगल्यात राहणाऱ्या दोन बहिणींनी मिळून एका 65 वर्षीय वयोवृद्धाच्या गुप्तांगावर जोरात लाथ मारून त्यांना जखमी केले. ही घटना कल्याण पश्चिम भागातील फॉरेस्ट कॉलनीमधील बंगल्यात घडली आहे. याप्रकरणी वयोवृद्धाच्या तक्रारीवरून हल्लेखोर दोन बहिणींवर विविध कलमानुसार खडकपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. उत्तम कोमरु जाधव (वय 65) असे जखमी व्यक्तीचे नाव आहे. तर चित्रा खाडे आणि तिची मोठी बहिणी असे गुन्हा दाखल झालेल्या दोन्ही बहिणींचे नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तक्रारदार उत्तम जाधव हे कल्याण पश्चिम भागातील फॉरेस्ट कॉलनीमधील ओम सिद्धीविनायक संकुलमध्ये कुटूंबासह राहतात. तर त्यांच्या शेजाऱ्याच्या बंगल्यात आरोपी महिला राहतात. 20 जून रोजी तक्रारदार उत्तम जाधव यांनी फॉरेस्ट कॉलनीमधील बंगल्यालगतच्या सार्वजनिक भिंतीला लागून झाडांच्या कुंडी ठेवण्यासाठी सिमेंटचा कट्टा बांधला होता. मात्र या कट्टाला आरोपी बहिणींनी विरोध करून तुम्ही सार्वजनिक भिंतीला कुंडी ठेवण्यासाठी कट्टा का बांधला असा जाब विचारला. यावेळी तुम्हाला कुठं तक्रार करायची असेल तिथे करा, असे तक्रारदार उत्तम जाधव यांनी दोन्ही बहिणींशी बोलून बंगल्यात निघून गेले.
त्यानंतर काही वेळाने आरोपी दोन्ही बहिणी तक्रारदार जाधव यांच्या बंगल्यात लोखंडी पहार घेऊन घुसल्या आणि त्यांच्या दरवाज्यावर पहारने जोरजोरात ठोठावले. त्यावेळी जाधव हे बाहेर आल्यानंतर दोन्ही बहिणींनी त्यांच्यावर हल्ला केला, लाथाबुक्क्या मारल्या. या दरम्यान दोघी बहिणींनी जाधव यांच्या गुप्तांगावर जोरात लाथ मारून त्यांना जखमी केले. उपचारातून बरे झाल्यानंतर जाधव यांनी खडकपाडा पोलीस ठाण्यात दोन्ही बहिणींवर विविध कलमानुसार गुन्हा दाखल केला. या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक व्ही. एस. केदार करीत आहेत.
नाशिकमध्ये वडापावमधून गुंगीचं औषध देऊन अत्याचार
नाशिकमधून एक धक्कादायक बातमी समोर आली असून विवाहित महिलेला वडापावच्या माध्यमातून गुंगीचे औषध देऊन अत्याचार केल्याची घटना घडली आहे. विशेष म्हणजे नाशिकरोड रेल्वेस्थानकावर पाणी विकणाऱ्या कुणाल पवारने आपल्या रिक्षाचालक मित्राच्या मदतीने हे कृत्य केल्याचं समोर आले आहे. यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
ही बातमी वाचा: