डोंबिवलीतील 'ती' आग लागली नव्हती तर लावली; पतीनं पत्नीला पेटवून दिलं अन् बनाव रचला
Kalyan Crime News : डोंबिवलीत एक पतीनं पत्नीला जीवंत जाळलं. त्यानंतर आग लागल्याचा बनाव रचला. पण पोलिसांना संशय आल्यामुळे प्रकरणाचा उलगडा झाला.
Kalyan Crime News : कल्याणमध्ये (Kalyan) घडलेल्या एका धक्कादायक घटनेनं संपूर्ण शहर हादरलं आहे. एका घरात आग लागल्यानं पती, पत्नी, दोन मुली गंभीर जखमी झाल्याची घटना शनिवारी पहाटेच्या सुमारास डोंबिवली भोपर गावात घडली होती. पण घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर पोलिसांना संशय आल्यामुळं पोलिसांनी तपासाची सूत्र हलवली. त्यानंतर जे समोर आलं ते सर्वांनाच हादरवणारं होतं.
शनिवारी पहाटेच्या सुमारास कल्याण डोंबिवलीमधील एका घरात आग लागली होती. या घटनेमुळं घरातील पती, पत्नी, दोन मुली गंभीर जखमी झाले. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच ते घटनास्थळी रवाना झाले. मात्र घटनास्थळी पोहोचल्यावर या घटनेत मानपाडा पोलिसांना संशय होता. त्यामुळे त्यांनी अधिक तपास केला. त्यानंतर पोलीस तपासात जो धक्कादायक प्रकार समोर आला तो हादरवणारा होता. पोलिसांनी पत्नीच्या हत्येचा कट रचणाऱ्या निर्दयी पतीचा बनाव उघड केला आहे. पती प्रसाद पाटीलनं कौटुंबिक वादातून पत्नी प्रीतीला पेटवून दिलं. या आगीत त्यांच्या दोन मुली देखील गंभीर जखमी झाल्या. तर निर्दयी पती प्रसाद देखील जखमी झाला होता. या चौघांवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान पत्नीचा मृत्यू झाला. प्रीती पाटील असं मृत्यू झालेल्या महिलेचं नाव असून याप्रकरणी निर्दयी पती प्रसाद पाटील यांच्या विरोधात मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.
डोंबिवली भोपर परिसरात प्रसाद पाटील आपली पत्नी प्रीती, मुलगी समीरा आणि समीक्षा यांच्यासोबत राहत होता. प्रसाद आणि प्रीतीमध्ये कौटुंबिक वाद सुरू होते. पती शारीरिक आणि मानसिक देखील त्रास देत होता. त्यानं यापूर्वीही पत्नी प्रीतीला मारण्याचा प्रयत्न केला होता. शनिवारी पहाटेच्या सुमारास त्यांच्या घराला आग लागली. या आगीत प्रसाद त्याची पत्नी प्रीती आणि दोन्ही मुली जखमी झाल्या. रुग्णालयात उपचार सुरू होते. या घटनेचा तपास मानपाडा पोलीस करत होते. जखमी पत्नी प्रीतीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या दरम्यान पोलिसांना संशय आला. तपासानंतर धक्कादायक माहिती समोर आली. कौटुंबिक वादातून प्रसादनं पत्नी प्रीती हिला पेटवलं. या आगीत त्याच्या दोन्ही मुली देखील जखमी झाल्या होत्या. प्रसादला देखील काही प्रमाणात भाजलं होतं. प्रसादनं प्रीतीला ठार मारण्यासाठी आगीचा बनाव रचला. मात्र या आगीत तिच्या दोन मुली देखील जखमी झाल्या. पत्नी प्रीती हिला संपवण्याच्या नादात प्रसादनं मुलींच्या आयुष्याचा पण खेळ केला. या दोन्ही मुली रुग्णालयात जगण्यासाठी झगडत आहेत. या प्रकरणी मानपाडा पोलिसांनी प्रसाद पाटील विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या दोन्ही मुलींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. प्रसादवर देखील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी मानपाडा पोलीस अधिक तपास करत आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :