Kalwa Crime News: कळव्यात बनावट शस्त्राचा धाक दाखवून अडीच लाखाला लुटले, उत्तर प्रदेशमधून चौघांना अटक
Kalwa Crime News: बनावट शस्त्राचा धाक दाखवून एका व्यक्तीला अडीच लाखाचा लुटल्याची धक्कादायक घटना कळव्यातील खारेगाव (kharegaon, kalwa) येथे घडली आहे.
Kalwa Crime News: बनावट शस्त्राचा धाक दाखवून एका व्यक्तीला अडीच लाखाचा लुटल्याची धक्कादायक घटना कळव्यातील खारेगाव (kharegaon, kalwa) येथे घडली आहे. या प्रकरणी कळवा पोलिसांनी (kalwa police station) कुठलेही पुरावे नसताना कसोशीने तपास करून 4 जणांना अटक (criminal arrested) केली आहे. या चौघांपैकी एक जण अल्पवयीन आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई-नाशिक महामार्गावरील (mumbai nashik highway) कळवा खारेगाव टोळनाका (kharegaon toll naka) येथे एका टोळीने दुचाकी स्वारला अतडवून त्याला बनावट बंदुकीचा धाक दाखवून लुटल्याची घटना कळवा पोलीस ठाण्यात घडली. फिर्यादी यांचे भिवंडीमध्ये दुकान आहे. फिर्यादी 16 जानेवारी रोजी आपलं दुकान बंद करून रात्री 11 वाजण्याच्या सुमारास फिर्यादी आपल्या घरी परतत होते. त्याच दरम्यान अज्ञात टोळीने त्यांचा पाठलाग करून खारेगाव टोळ नाका येथे रस्त्याचे काम सुरू असलेल्या निर्जन स्थळी गाडी आडवी लावून सोबत असलेली पैशाची बॅग हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी आरोपींनी बनावट बंदूक काढून धाक दाखवून फिर्यादीकडे असलेले अडीच लाख रुपये रोख रक्कम आणि 3 मोबाईल घेऊन पोबारा केला. या प्रकरणी फिर्यादी यांनी कळवा पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींच्या विरोधात कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.
या प्रकरणी कळवा पोलीस ठाण्याचे (kalwa police station) वरिष्ठ पोलीस निरीक्षक कन्हैया थोरात यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत तपासला सुरुवात करण्यासाठी पथक नेमले. महामार्ग असल्यामुळे परिसरात अंधार आणि कुठलाही सीसीटिव्ही नसल्याने पोलिसांकडे कुठलाही पुरावा नव्हता. पोलिसांनी तांत्रिक यंत्रणा आणि गुप्तबातमीदारांच्या मदतीने कुठलेही पुरावे नसताना कसोशीने तपास केला असता या प्रकरणातील आरोपी हे उत्तर प्रदेश (uttar pradesh) येथे आपल्या मूळ गावी पळून घेल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले.
पोलिसांनी पथक उत्तर प्रदेश (uttar pradesh) ठिकाणी पथक रवाना करून या प्रकरणात चार जणांना अटक केली आहे. या चौघांपैकी एक आरोपी हा अल्पवयीन आहे. जकाउल्ला बताउल्ला चौधरी (23), सोहेल अहमद जुनेद अहमद शेख (20), अली उल्हा सलाम खान (19) आणि एक 17 वर्षीय तरुण असे आरोपींची नावे आहे. या चौघांकडून कळवा पोलिसांनी लुटली अडीच लाख रुपये रक्कम 3 मोबाईल फोन आणि 3 बनावट बंदूक पोलिसांनी (police) हस्तगत केली आहे.
इतर बातमी:
पतीला संपवण्यासाठी पत्नीने तांत्रिकाला दिली सुपारी, हत्या प्रकरणी वसईत चौघांना अटक