एक्स्प्लोर

गॅलरीतून जम्प कर, कागदावरील स्केचनं उलगडलं मृत्यूचं गूढ; गेममधील टास्क पूर्ण, 10 वीतील मुलाने संपवलं जीवन

काही वर्षांपूर्वी पोकेमॅन, पब्जी यांसारख्या गेममध्ये शालेय मुलं वेडी झाल्याचं दिसून आलं होतं. आजही तीच परिस्थिती काही ठिकाणी दिसून येते

पुणे : सोशल मीडिया आणि स्मार्टफोनच्या जमान्यात लहान मुलं, शालेय मुलंही मोबाईलच्या अधीन झाली आहेत. मोबाईलवर (Mobile) रिल्स पाहणं, गेमिंगच्या नादी लागणं हा काहींचा नित्यक्रम बनला आहे. मुलांचं हे व्यसन सोडविण्यासाठी कुटुंबीयांकडूनही प्रयत्न केले जातात. अनेकदा, समुपदेशनच्या माध्यमातून ह्या मुलांना या गेमिंच्या झोनमधून बाहेर काढण्याचा प्रयत्न कुटुंबीयांकडून केला जातो. तर, कधी-कधी दाप देऊन, रागावून, भीती दाखवूनही आई-वडिल आपल्या मुलांना या गेमिंग व मोबाईलच्या वेडापासून दूर करण्याचा प्रयत्न करत असतात. मात्र, पिंपरी चिंचवडमध्ये (Pimpari Chinchwad) एक धक्कादायक घटना घडली आहे. एका गेमच्या नादात मुलाने चक्क 14 व्या मजल्यावरुन 10 वीच्या विद्यार्थ्याने उडी घेतली. या घटनेनं पिंपरी चिंचवड हादरुन गेलं असून पोलिसांनीही (Police) पालकांना महत्त्वांचं आवाहन केलं आहे. 

काही वर्षांपूर्वी पोकेमॅन, पब्जी यांसारख्या गेममध्ये शालेय मुलं वेडी झाल्याचं दिसून आलं होतं. आजही तीच परिस्थिती काही ठिकाणी दिसून येते. पिंपरी चिंचवडमध्ये दहावीत शिकणाऱ्या मोबाईल गेमचं व्यसन जडलं. या व्यसनाच्या आहारी तो इतका गेला की, त्याला इमारतीच्या चौदाव्या मजल्यावरून उडी मारण्याचा टास्क मिळाला. विशेष म्हणजे या मुलाने तो टास्क फॉलो केला. यातच या मुलाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या मृत्यूच्या घटनेनंतर पोलिसांनी घराची तपासणी केली असता, एका कागदावर मुलाने गेममधील टास्क लिहल्याचे पाहायला मिळाले. त्यातूनच, त्याने गेमिंच्या झोनमध्ये स्वत:चं जीवन संपवल्याचं उघडकीस आलं आहे.  

पिंपरी चिंचवडच्या किवळे भागात ही घटना घडली आहे. 26 जुलैची रात्र या मुलासाठी अखेरची ठरली. गेल्या सहा महिन्यांपासून हा मुलगा गेमच्या आहारी गेला होता. त्यानंतर तो स्वतःला बेडरूममध्ये तीन-तीन तास कोंडून घेत असे. खोलीत एकटाच बडबड करत असायचा. आजवर घाबरणारा मुलगा थेट किचनमधील चाकूची मागणी करायला लागला होता. वेगवेगळे टास्क त्याला येऊ लागले, जे तो फॉलो करत गेला. हा बदल पाहून आई-वडील ही चिंतेत होते. अतिवृष्टीमुळं 25 जुलैला शाळांना सुट्टी होती, तो ही दिवस त्याने गेम खेळण्यातचं घालवला. मग रात्री अनेक विनवण्या केल्यानंतर तो जेवणासाठी बाहेर पडला. मात्र, जेवण केल्यावर पुन्हा तो खोलीतचं जाऊन बसला. आई दुसऱ्या मुलाला ताप आल्यानं त्या चिंतेत होती. रात्रीचा एक वाजला मुलाचा ताप काय उतरेना, त्यामुळं आई जागीचं होती. त्याचवेळी सोसायटीच्या व्हाट्सएपवर एक मुल जखमी अवस्थेत खाली पडल्याचा मेसेज आला. तो मेसेज मुलाच्या आईने वाचला अन् तिला थोडी कुणकुण लागली. मग ती खोलीच्या दिशेने गेली, खोली आतून बंद होती. दुसरी चावी घेऊन खोली उघडली पण मुलगा आत नव्हता, त्यानंतर धावाधाव करत ती जखमी अवस्थेत पडलेल्या मुलाजवळ पोहचली, बघते तर काय? तो तीचाचं मुलगा होता. 

गॅलरीतून जम्प कर, टास्कचा कागद सापडला

रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या पोटच्या लेकाला पाहून, आईची पायाखालची जमीनचं सरकली. मुलाला उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. घरात गेममधील कोडिंगच्या भाषेत लिहिलेली अनेक कागदं आढळली. त्यावर घराचं स्केच होतं आणि गॅलरीतून जम्प कर, असा टास्क ही नमूद होता. जो त्याने फॉलो करत 14व्या मजल्यावरून उडी घेत संपवला. मोबाईल गेमच्या आहारी गेलेल्या मुलांसाठी आणि त्याकडे कानाडोळा करणाऱ्या पालकांसाठी ही अतिशय चिंतेची बाब आहे. या घटनेतून ते धडा घेतील आणि अशा धक्कादायक घटनेची पुनरावृत्ती होणार नाही. याची ते आत्ताच तातडीनं खबरदारी घेतील, अशी अपेक्षा आहे. तसेच, सरकारने अशा गेमिंग वर कायमस्वरूपी बंदी आणावी अशी मागणी ही आत्महत्या करणाऱ्या मुलाच्या आई-वडिलांनी एबीपी माझाशी बोलताना केली आहे.

हेही वाचा

तुझ्या बापाला पाडलंय, तू कोण? भाजप आमदार मंदा म्हात्रेंचा संदीप नाईकांवर हल्ला, बेलापुरात भाजपचा अंतर्गत वाद चव्हाट्यावर

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Beed : सुटीवर असलेल्या पोलिसाचा कर्तव्यदक्षपणा, चोराकडे सापडले 63 मोबाईल, आंतरराज्यीय टोळीचा छडा लागला
सुटीवर असलेल्या पोलिसाचा कर्तव्यदक्षपणा, चोराकडे सापडले 63 मोबाईल, आंतरराज्यीय टोळीचा छडा लागला
न्या. आलोक आराधे मुंबई हायकोर्टाचे नवे मुख्य न्यायमूर्ती; राजभवनमध्ये शपथविधी संपन्न
न्या. आलोक आराधे मुंबई हायकोर्टाचे नवे मुख्य न्यायमूर्ती; राजभवनमध्ये शपथविधी संपन्न
Video: भरत गोगावलेंची तटकरेंवर थेट टीका, बंगल्याबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी; पालकमंत्रीपदावरुन महायुतीत जुंपली
Video: भरत गोगावलेंची तटकरेंवर थेट टीका, बंगल्याबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी; पालकमंत्रीपदावरुन महायुतीत जुंपली
फाडफाड इंग्रजी बोलणारं राज्य कोणतं? भारताचा जगात कितवा क्रमांक; काय सांगतय सर्वेक्षण
फाडफाड इंग्रजी बोलणारं राज्य कोणतं? भारताचा जगात कितवा क्रमांक; काय सांगतय सर्वेक्षण
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11 PM 21 January 2024Special Report Donald Trump : नागरिकत्व ते मंगळवार स्वारी...निर्णयांचा धडाका; कशी असेल ट्रम्प सरकारची भविष्यातील वाटचाल?Special Report Walmik Karad CCTV : आवादा कंपनीला खंडणी मागितली 'त्या' दिवशीचं सीसीटीव्ही फुटेजSpecial Report Sanjay Shirsat VS Abdul Satta : शिरसाट विरुद्ध अब्दुल सत्तार वादाचा नवा अंक, पालकमंत्री शिरसाट आक्रमक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Beed : सुटीवर असलेल्या पोलिसाचा कर्तव्यदक्षपणा, चोराकडे सापडले 63 मोबाईल, आंतरराज्यीय टोळीचा छडा लागला
सुटीवर असलेल्या पोलिसाचा कर्तव्यदक्षपणा, चोराकडे सापडले 63 मोबाईल, आंतरराज्यीय टोळीचा छडा लागला
न्या. आलोक आराधे मुंबई हायकोर्टाचे नवे मुख्य न्यायमूर्ती; राजभवनमध्ये शपथविधी संपन्न
न्या. आलोक आराधे मुंबई हायकोर्टाचे नवे मुख्य न्यायमूर्ती; राजभवनमध्ये शपथविधी संपन्न
Video: भरत गोगावलेंची तटकरेंवर थेट टीका, बंगल्याबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी; पालकमंत्रीपदावरुन महायुतीत जुंपली
Video: भरत गोगावलेंची तटकरेंवर थेट टीका, बंगल्याबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी; पालकमंत्रीपदावरुन महायुतीत जुंपली
फाडफाड इंग्रजी बोलणारं राज्य कोणतं? भारताचा जगात कितवा क्रमांक; काय सांगतय सर्वेक्षण
फाडफाड इंग्रजी बोलणारं राज्य कोणतं? भारताचा जगात कितवा क्रमांक; काय सांगतय सर्वेक्षण
उद्धव ठाकरे-शरद पवार लवकरच केंद्रात मोदींसोबत दिसतील; माजी मंत्र्यांचा खळबळजनक दावा
उद्धव ठाकरे-शरद पवार लवकरच केंद्रात मोदींसोबत दिसतील; माजी मंत्र्यांचा खळबळजनक दावा
संजय राऊतांना काळा फासणाऱ्याला 1 लाख रुपये बक्षीस; शिंदेंच्या शिवसेना शहरप्रमुखाची घोषणा 
संजय राऊतांना काळा फासणाऱ्याला 1 लाख रुपये बक्षीस; शिंदेंच्या शिवसेना शहरप्रमुखाची घोषणा 
Manoj Jarange Patil : ही धनंजय मुंडेंची टोळी, तिचा नायनाट होणे गरजेचे; CCTV फुटेज समोर येताच मनोज जरांगेंनी सगळंच काढलं
ही धनंजय मुंडेंची टोळी, तिचा नायनाट होणे गरजेचे; CCTV फुटेज समोर येताच मनोज जरांगेंनी सगळंच काढलं
Saif ali khan हलकी स्माईल, डोळ्यावर गॉगल; डिस्चार्जनंतर सैफ अली खानचा नवाबी लूक, मानेवर दिसली पट्टी
हलकी स्माईल, डोळ्यावर गॉगल; डिस्चार्जनंतर सैफ अली खानचा नवाबी लूक, मानेवर दिसली पट्टी
Embed widget