मुलगी अपशकुनी असल्याच्या संशयावरून उपाशी ठेवलं.. मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी आईवडिलांना अटक
जळगाव शहरात धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मुलगी अपशकुनी असल्याच्या संशयावरून पित्यानेच तिला उपाशी ठेऊन मारल्याची घटना घडली आहे.

जळगाव : अकरा वर्षीय मुलगी अपशकुनी असल्याच्या अंधश्रधेतून तिला उपाशी ठेऊन मारल्याची माणुसकीला काळीमा फासणारी घटना नुकतीच जळगाव शहरात उघडकीला आली होती. या प्रकरणी पोलिसांनी तिच्या आई आणि वडिलांच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे.
जळगाव शहरात पिंप्राळा हुडको परिसरात राहणाऱ्या जावेद शेख यांना अकरा वर्षांची कनीज नावाची मुलगी होती. या मुलीच्या जन्मानंतर तिच्या आईला मुलीचं जन्माला आल्या होत्या. या शिवाय काही अशुभ घटना त्यांच्या परिवारात घडल्या होत्या. या सर्व घटनांच्या पार्श्वभूमीवर तिचे वडील जावीद शेख हे तिला अपशकुनी समजून नेहमीच तिचा द्वेष करत असे. मारहाण करत होते. गेल्या तेवीस तारखेला तिचा संशयस्पद मृत्यू झाल्यानंतर तिच्या आई वडिलांनी कोणालाही न सांगता तिचा दफन विधी केला होता.
या घटनेनंतर कणीजच्या मामाने शहरातील रामानंद नगर पोलिसात तक्रार अर्ज देत मुलीचा घातपात झाला असल्याचा संशय व्यक्त केला होता. या घटनेच्या पार्शवभूमीवर काल पोलिसांनी कनीजचा गाडलेला मृतदेह बाहेर काढत त्याचे शवविच्छेदन करण्याचा निर्णय घेतला होता. या अहवालनुसार प्राथमिक चौकशीत तिला उपाशी ठेऊन आणि उपचारापासून वंचित ठेवण्यात आल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. या अंदाजानुसार तिच्या आई आणि वडिलांच्या विरोधात रामानंद नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे























