Jalgaon Crime News : बिल्डरकडून ज्येष्ठ नागरिकाची चार लाखांची फसवणूक, जळगावमधील घटना
Jalgaon News : नाशिकच्या बिल्डरकडून जळगाव येथील ज्येष्ठ नागरिकाची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी चार संशयितांविरोधात जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
![Jalgaon Crime News : बिल्डरकडून ज्येष्ठ नागरिकाची चार लाखांची फसवणूक, जळगावमधील घटना Jalgaon Crime Senior citizen cheated of 4 lakh Rupees by builder Maharashtra Marathi News Jalgaon Crime News : बिल्डरकडून ज्येष्ठ नागरिकाची चार लाखांची फसवणूक, जळगावमधील घटना](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/01/29/2c2c8d0836c12582de4afc7e48ec30491706535455428923_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Jalgaon Crime News : नाशिकच्या (Nashik) बिल्डरकडून जळगाव (Jalgaon) येथील ज्येष्ठ नागरिकाची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी चार संशयितांविरोधात जळगाव शहर पोलीस ठाण्यात (jalgaon City Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला.
जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी फ्लॉट घेण्यासाठी टोकन व बुकिंगसाठी दिलेले चार लाख 95 हजार 390 रुपये परत न देता खोटे दस्तऐवज देऊन गोपालसिंग राजपूत (66, रा. पिंप्राळा, जळगाव) यांची फसवणूक करण्यात आली आहे.
4 लाख 95 हजार 390 रुपये दिले बिल्डरला
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नाशिक जिल्ह्यातील ठाणगाव (ता. सिन्नर) येथे गोपालसिंग राजपूत यांना प्लॉट घ्यायचा होता. राजपूत यांनी प्लॉटसाठी 2 हजार 200 रुपये टोकन दिले होते. त्यानंतर राजपूत यांनी बुकिंगसाठी 2 लाख 40 हजार 390 रुपये दिले. तसेच दुसऱ्या ठिकाणी प्लॉट घेण्यासाठी राजपूत यांनी 2 लाख 55 हजार रुपये जमा केले होते. त्यांनी एकूण 4 लाख 95 हजार 390 रुपये धनादेश आणि रोख रकमेसह बिल्डरला दिले होते.
संशयितांकडून उडवाउडवीची उत्तरे
संबंधिताने सौदा पूर्ण करून खरेदी खत करून न देता खोटे दस्तऐवज खरे भासवून ते कागदपत्र राजपूत यांनी दिले. त्यांना कागदपत्रांची शंका आल्यानंतर त्यांनी संशयितांकडे विचारपूस केली. यावेळी संशयितांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. आपली फसवणूक होऊ नये व ठरल्याप्रमाणे मिळकत मिळत नसल्याची खात्री झाल्यावर पैसे परत मागितल्यावर संशयितांनी रक्कम देखील परत दिली नाही.
जळगाव शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल
त्यामुळे फसवणूक झाल्याचे राजपूत यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर त्यांनी जळगाव शहर पोलीस ठाणे गाठले आणि संशयितांविरोधात तक्रार केली. त्याच्या तक्रारीनंतर पोलिसांनी नाशिक येथील प्रशांत शेंडे व योगेश शेंडे, राजेंद्र खैरनार यांच्यासह एकाविरुद्ध गुन्हा दाखल केला. सहाय्यक निरीक्षक किशोर पवार अधिक तपास करत आहेत.
नाशिकला दोन महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र खेचले
रस्त्याने पायी जाणाऱ्या दोन महिलांच्या गळ्यातील 24 हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी बळजबरीने खेचून नेल्याची घटना पाथर्डी फाटा येथे घडली. फिर्यादी शीला राजेश्वर निनावे (57, रा. दूर्वाकार बंगला, पाथर्डी फाटा, नाशिक) ही महिला काल रात्री सव्वाआठ वाजेच्या सुमारास घरानजीकच्या परिसरातून एका महिलेबरोबर पायी जात होती. त्यावेळी काळ्या रंगाच्या मोटारसायकलीवरून आलेल्या दोन अनोळखी इसमांपैकी पाठीमागे बसलेल्या इसमाने फिर्यादी व त्यांच्याबरोबरच्या रतना शामकांत रुमाले (रा. ज्ञानेश्वरनगर, इंदिरानगर) यांच्याही गळ्यातील मंगळसूत्र बळजबरीने खेचून चोरून नेले. या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आणखी वाचा
Nashik Crime News : बनावट सोने विक्री प्रकरणातील आणखी कारनामे समोर, पानटपरी चालकाला पाच लाखांना गंडा
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)