एक्स्प्लोर

Jalgaon Crime : मी एसपी, आयजी, डीजीला घाबरत नाही, पालकमंत्री माझ्या खिशात, पीआयकडून महिलेवर अत्याचार; अखेर 'त्या' अधिकाऱ्याचं निलंबन

Jalgaon Crime : जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे तत्कालीन पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप झाल्यानंतर त्यांना निलंबित करण्यात आले आहे.

Jalgaon Crime : जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे तत्कालीन पोलीस निरीक्षक संदीप पाटील (Sandeep Patil) यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप झाल्यानंतर अखेर त्यांना निलंबित करण्यात आले आहे. नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांनी ही कारवाई करत त्यांच्यावर खातेअंतर्गत प्राथमिक चौकशीचे आदेश दिले आहेत. या प्रकरणामुळे जळगावमध्ये खळबळ उडाली आहे. (Jalgaon Crime News)

काय आहे प्रकरण?

29 ऑगस्ट 2025 रोजी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आमदार मंगेश चव्हाण यांनी पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्यावर एका महिलेला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप केला. विशेष म्हणजे, आमदार चव्हाण यांनी यावेळी एक ऑडिओ क्लिप सादर करत त्यातील संवाद ऐकवला, ज्यामुळे उपस्थितांमध्ये आणि प्रशासनात खळबळ माजली.

संदीप पाटील यांच्यावर निलंबनाची कारवाई

या आरोपांनंतर पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे निर्देश देण्यात आले, मात्र महिलेने ऐनवेळी तक्रार देण्यास नकार दिला. त्यामुळे गुन्हा नोंदवण्यात आला नाही. तरीही, या गंभीर आरोपांची पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी दखल घेत, सविस्तर अहवाल विशेष पोलीस महानिरीक्षकांकडे पाठवला. त्यानंतर संदीप पाटील यांच्यावर निलंबनाची कारवाई झाली.

पालकमंत्री माझ्या खिशात

संदीप पाटील यांनी 2023 साली एका गुन्ह्यात महिलेला मदत केली होती, त्यानंतर त्यांच्यात मैत्री झाली. आमदार चव्हाण यांच्या मते, संदीप पाटील यांनी तिला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर वेळोवेळी शारीरिक संबंध ठेवले. तक्रार देण्याचा इशारा दिल्यानंतर, पाटील यांनी "एसपी, आयजी, डीजी मला काही करू शकत नाहीत. पालकमंत्री माझ्या खिशात आहेत," अशी थेट धमकी दिली. इतकंच नव्हे तर "आमदारालाही गोळ्या घालून ठार मारेन" असा उल्लेख ऑडिओ क्लिपमध्ये असल्याचे आमदार चव्हाण यांनी सांगितले.

निलंबनासह खातेअंतर्गत चौकशीचे आदेश

या प्रकारानंतर आमदार मंगेश चव्हाण यांनी पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन कारवाईची मागणी केली. "जर एखादा पोलीस अधिकारी लोकप्रतिनिधीला अशा पद्धतीने धमक्या देतो, तर सामान्य नागरिकांचं काय?" असा थेट प्रश्न त्यांनी उपस्थित केला होता. आता संदीप पाटील यांच्यावर अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांच्या मार्फत खातेअंतर्गत प्राथमिक चौकशी होणार आहे. ही चौकशी पूर्ण झाल्यानंतर अधिकृत निष्कर्षानुसार पुढील शिस्तभंगाची कारवाई केली जाईल, अशी माहिती मिळत आहे.

आणखी वाचा 

Vanraj Andekar Case: 'टपका रे टपका, एक ओर टपका', संकेत की योगायोग? डीजेवर गाणं लावून आयुषला संपवलं? टोळीयुध्द पुन्हा भडकण्याची शक्यता

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Ashok Kharat: राजकारणी आणि सेलिब्रिटींचे भविष्य सांगणारा स्वयंघोषित 'ज्योतिषी' अशोक खरातची खरी कुंडली समोर; दहावी नापास अन् अंडीचोर
राजकारणी आणि सेलिब्रिटींचे भविष्य सांगणारा स्वयंघोषित 'ज्योतिषी' अशोक खरातची खरी कुंडली समोर; दहावी नापास अन् अंडीचोर
Ashok Kharat : एक दिवसाचा कायदा बदला, खरातला सुया टोचून टोचून....., भाजपच्या मंत्र्याचा संताप
एक दिवसाचा कायदा बदला, खरातला सुया टोचून टोचून....., भाजपच्या मंत्र्याचा संताप
Mumbai Crime news: शरीरसुखाची मागणी धुडकावताच अभिनेत्याने मोलकरणीला संपवलं; दारातच बॉडी दिसली अन्.. मिरारोड हादरलं
शरीरसुखाची मागणी धुडकावताच अभिनेत्याने मोलकरणीला संपवलं; दारातच बॉडी दिसली अन्.. मिरारोड हादरलं
Rupali Chakankar and Ashok Kharat: आधी रुपाली चाकणकरांची पाठराखण करणाऱ्या दत्तामामा भरणेंचा सूर एकदम बदलला, म्हणाले, 'त्यावेळी मला...'
आधी रुपाली चाकणकरांची पाठराखण करणाऱ्या दत्तामामा भरणेंचा सूर एकदम बदलला, म्हणाले, 'त्यावेळी मला...'

व्हिडीओ

Dattatray Bharne Pune : मला माहित नव्हतं हा भोंदूबाबा कसा आहे,खरात प्रकरणावर दत्ता भरणेंचा युटर्न
Sushma Andhare Pune : महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकरांकडे एवढा पैसा कसा आला?
Sanjay Raut PC : एकट्या चाकणकर नाही, केसरकर स्वतः म्हणतात मीच का? 40 आमदार जात होते
Rupali Thombre Patil : अजितदादा असते तर Rupali Chakankar यांचा लगेच सुपडा साफ केला असता
Ashok Kharat : महिलांसोबत केलेलं कृत्य विधीचा भाग, अशोक खरातच्या जबाबात काय? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur News: कोल्हापुरात गर्भलिंग निदान करणाऱ्या डाॅ. युवराज पाटील टोळीकडून सैतानी कृत्य; डॉक्टरनेच एजंटांचं जाळ पसरवून आईच्या गर्भातच लेकी संपवल्या; भ्रूणाची विल्हेवाट लावण्यासाठी सुद्धा स्वतंत्र 'व्यवस्था'
कोल्हापुरात गर्भलिंग निदान करणाऱ्या डाॅ. युवराज पाटील टोळीकडून सैतानी कृत्य; डॉक्टरनेच एजंटांचं जाळ पसरवून आईच्या गर्भातच लेकी संपवल्या; भ्रूणाची विल्हेवाट लावण्यासाठी सुद्धा स्वतंत्र 'व्यवस्था'
माये गं माये... लेकरांना पाठीवर घेऊन अस्वल मातेची 2-3 किमी पायपीट, अमरावतीतील प्रेमळ व्हिडिओ व्हायरल
माये गं माये... लेकरांना पाठीवर घेऊन अस्वल मातेची 2-3 किमी पायपीट, अमरावतीतील प्रेमळ व्हिडिओ व्हायरल
DGCA VVIP flights Rule: 'तर नेत्यांकडून दबाव टाकता येणार नाही...' अजितदादांचा विमान अपघातात बळी गेला अन् डीजीसीएकडून आता नियमात बदल
'तर नेत्यांकडून दबाव टाकता येणार नाही...' अजितदादांचा विमान अपघातात बळी गेला अन् डीजीसीएकडून आता नियमात बदल
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा आजही होऊ शकते, पण मुळात चर्चेसाठी येण्याची गरज; वरिष्ठ नेत्यांमध्ये खलबतं
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा आजही होऊ शकते, पण मुळात चर्चेसाठी येण्याची गरज; वरिष्ठ नेत्यांमध्ये खलबतं
अजित पवारांच्या आठवणीत सुनेत्रा पवार भावुक; म्हणाल्या, तुमची उणीव प्रकर्षणाने जाणवते, शब्दात मांडणे अशक्य
अजित पवारांच्या आठवणीत सुनेत्रा पवार भावुक; म्हणाल्या, तुमची उणीव प्रकर्षणाने जाणवते, शब्दात मांडणे अशक्य
BMC Garbage van: मुंबईत कचरा उचलण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज गाड्या
BMC Garbage van: मुंबईत कचरा उचलण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज गाड्या
Video: स्ट्रेट ऑफ होर्मुझ रोखत इराणनं अवघ्या जगाचं नाकं दाबलं, पण त्याच होर्मुझच्या समुदात हाकेच्या अंतरावर तेल जहाज पेटत असतानाही इराणच्या निर्भिड चिमुकलीचा किनाऱ्यावर उंच माझा झोका!
Video: स्ट्रेट ऑफ होर्मुझ रोखत इराणनं अवघ्या जगाचं नाकं दाबलं, पण त्याच होर्मुझच्या समुदात हाकेच्या अंतरावर तेल जहाज पेटत असतानाही इराणच्या निर्भिड चिमुकलीचा किनाऱ्यावर उंच माझा झोका!
एकनाथ शिंदेंनी संस्कृती दाखवत 'साहेब' म्हटलं, पण उद्धव ठाकरेंनी...; ज्योती वाघमारेंची बोचरी टीका
एकनाथ शिंदेंनी संस्कृती दाखवत 'साहेब' म्हटलं, पण उद्धव ठाकरेंनी...; ज्योती वाघमारेंची बोचरी टीका
Embed widget