Jalgaon Bribe News : एक लाखाची लाच स्वीकारताना ग्रामपंचायत ऑपरेटर एसीबीच्या जाळ्यात, ग्रामसेवक पसार
Jalgaon Bribe : एक लाखाची लाच स्वीकारताना ग्रामपंचायत ऑपरेटरला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे. तर ग्रामसेवक संपल्याची कुणकुण लागताच पसार झाला आहे.
Jalgaon Bribe News जळगाव : एक लाखाची लाच (Bribe) स्वीकारताना ग्रामसेवकासह ग्रामपंचायत ऑपरेटर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (ACB) जाळ्यात सापडला आहे. चुंचाळेचे ग्रामसेवक हेमंत कमलाकर जोशी (Hemant Joshi) (ता. यावल जि. जळगांव) व ग्रामपंचायत ऑपरेटर सुधाकर धुळकू कोळी (Sudhakar Koli) (35 रा. चुंचाळे ता. यावल) अशी लाचखोरांची नावे आहेत
याबाबत सविस्तर वृत्त असे की, तक्रारदरांचे चुंचाळे (ता. यावल) गावी वडीलांच्या नावाची संस्था आहे. या संस्थेत 15 व्या वित्त आयोगाच्या शिफारशीमधून गावात शिलाई मशिन प्रशिक्षण देवून ग्रामीण भागातील महिला व युवतींना स्वावलंबी करण्याच्या योजनेचा केंद्र शासनाकडून दोन लाख रुपये निधी मंजूर झाला होता. मंजूर रकमेतून पन्नास टक्के म्हणजेच एक लाख रुपये लाचेची मागणी ग्रामसेवकाने केली.
एक लाखांची लाच घेताना ग्रामपंचायत ऑपरेटर पकडले रंगेहाथ
याप्रकरणी तक्रारदारांनी रोजी लाच लुचपत प्रतिबंधक विभाग जळगांव येथे तक्रार दाखल केली होती. त्यांच्या तक्रारीनुसार लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला. ग्रामसेवक हेमंत जोशी यांच्या सांगण्यानुसार ग्रामपंचायत ऑपरेटर सुधाकर कोळी या एक लाखांच्या लाचेची मागणी केली. ग्रामपंचायत ऑपरेटरला एक लाख रुपयाची लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंध विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले.
सापळ्याची कुणकुण लागताच ग्रामसेवक पसार
दरम्यान, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचल्यानंतर ग्रामसेवकाने लाचेची रक्कम ऑपरेटर यांच्याकडे देण्यास तक्रारदाराला सांगितली. ऑपरेटर सुधाकर कोळी यांनी लाच स्वीकारताच त्यास अटक करण्यात आली. तर ग्रामसेवक हेमंत जोशी हे पसार झाले आहेत. दोघांविरोधात यावल पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला.
यांनी केली कारवाई
ही कारवाई पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर, अपर अधीक्षक माधव रेड्डी, पोलीस उप अधीक्षक नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उप अधीक्षक सुहास देशमुख, पोलीस निरीक्षक अमोल वालझाडे, सफौ दिनेशसिंग पाटील, पो.ना. बाळू मराठे, पोना सुनिल वानखेडे, एन. एन. जाधव, पोलीस निरीक्षक स. फौ. सुरेश पाटील, पो. ह. रविंद्र घुगे, शैला धनगर, पो. ना. किशोर महाजन, पो.कॉ. प्रदीप पोळ, पो.कॉ. पो. कॉ. प्रणेश ठाकूर, पो. कॉ. अमोल सूर्यवंशी यांनी केली.
इतर महत्वाच्या बातम्या