(Source: ECI/ABP News/ABP Majha)
ITBP जवानाची सर्व्हिस रिव्हॉल्व्हरने गोळी झाडून आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये सांगितले कारण
ITBP जवान कॉन्स्टेबल दोन आठवड्यांपूर्वीच 30 दिवसांच्या रजेवरून कर्तव्यावर परतले होते.
ITBP Jawan Suicide : ITBP जवान कॉन्स्टेबल वाय. रेड्डी दोन आठवड्यांपूर्वीच कर्तव्यावर परतले होते. मात्र अचानक रविवारी पहाटे पाचच्या सुमारास ते मृतावस्थेत आढळून आले आणि त्यांची सर्व्हिस रिव्हॉल्व्हर त्यांच्या शेजारी पडली होती. सोबतच एक सुसाईड नोटही बाजूला होती. काय लिहिले होते त्यात?
दोन आठवड्यांपूर्वीच 30 दिवसांच्या रजेवरून कर्तव्यावर परतले होते.
दिल्लीतील चाणक्यपुरी येथील नेहरू तारांगण संकुलात सुरक्षा कर्तव्यासाठी तैनात असलेल्या 31 वर्षीय इंडो-तिबेटन बॉर्डर पोलिस (ITBP) जवानाने आपल्या सर्व्हिस रायफलने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, कॉन्स्टेबल वाय. रेड्डी हे रविवारी पहाटे पाचच्या सुमारास मृतावस्थेत आढळून आले आणि त्यांची सर्व्हिस रिव्हॉल्व्हर त्यांच्या शेजारी पडली होती. घटनेची माहिती मिळताच पोलीस पथक तात्काळ घटनास्थळी पोहोचले. तेथे रक्ताने माखलेल्या जवानाला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. दोन आठवड्यांपूर्वीच ते 30 दिवसांची सुट्टी काढून कर्तव्यावर परतले होते
रेड्डी मूळचे कर्नाटकचे असून सुमारे दोन आठवड्यांपूर्वी ३० दिवसांच्या रजेवरून कर्तव्यावर परतले होते. त्याच वेळी, नवी दिल्लीचे पोलिस उपायुक्त दीपक यादव यांनी सांगितले की, रेड्डी सध्या चाणक्यपुरीतील नेहरू तारांगणात सुरक्षेसाठी तैनात होते. डीसीपी म्हणाले, "प्राथमिक दृष्टया असे दिसते की, कॉन्स्टेबलने त्यांच्याकडील रायफलने स्वत: च्या छातीत गोळी झाडली." अशातच मृत जवानाच्या बिछान्याजवळ एक कथित सुसाईड नोट सापडली आहे,
सुसाईड नोटमध्ये सांगितले कारण..
मृत जवानाच्या बिछान्याजवळ एक कथित सुसाईड नोट सापडली आहे, ज्यामध्ये त्याने पत्नी आणि सासरच्या मंडळींवर मानसिक छळ केल्याचा आरोप केला आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. आणि वैवाहिक जीवनातील कलहाचाही उल्लेख आहे. या तरुणाचे गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये लग्न झाले होते. पोलिसांनी सांगितले की, जवानाच्या कुटुंबीयांना याची माहिती देण्यात आली आहे. ते आल्यानंतरच शवविच्छेदन केले जाईल.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Trending News : फोटोमध्ये दडलाय 7 अंकी नंबर, आम्हाला सापडलाय, पाहा तुम्हाला जमतंय का?
- Exam: अशी कोणती वस्तू आहे जी कोरडी असताना 1 किलो, ओली झाली तर 2 किलो आणि जळाली तर 3 किलो होते?
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह | ABP Majha