एक्स्प्लोर

Crime News: इराणी कबिल्यातील सुंदरी निघाली ड्रग डीलर; तपासात ड्रग्सचे मोठे घबाड मिळण्याची शक्यता

Kalyan Crime: आंबिवली रेल्वे स्थानकाला लागूनच असलेल्या इराणी कबिल्यातील तरुणीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे, ती ड्रग डीलर असल्याची माहिती समोर आली आहे.

Crime News: कल्याण-कसारा रेल्वे मार्गावरील आंबिवली रेल्वे स्थानकाला लागूनच असलेल्या इराणी कबिल्यात गेल्या 2 वर्षांपासून आतापर्यत पोलिसांनी 100 हून अधिक सराईत गुन्हेगारांना बेड्या ठोकल्या आहेत, यातच आता इराणी कबिल्यात ब्युटी क्वीन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तरुणीला पोलिसांनी पकडताच ती ड्रग डीलर असल्याचे समोर आले आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. सबा सैय्यद असे ड्रग डीलर तरुणीचे नाव आहे. ही तरुणी पोलिसांच्या तावडीत सापडल्याने तपासात मोठे घबाड मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

कल्याण-डोंबिवली शहरासह आसपासच्या शहरांत विविध प्रकारच्या अंमली पदार्थाची विक्री मोठ्या प्रमाणात वाढली आहे. या विरोधात विविध पोलीस ठाण्यातील पोलीस पथकांकडून नशेच्या सौदागरांना सापळा रचून मुद्देमालासह अटक करण्याचे सत्र सुरुच आहे. 

कल्याण-कसारा लोहमार्गावरील आंबिवली रेल्वे स्थानकाच्या लागून असलेल्या  इराणी कबिल्यात राहणारी सबा ही आंबिवली, मोहने, तसेच आसपासच्या  परिसरात मेफेड्रॉन (एमडी) ड्रग्जसह चरस, गांजा या अंमली पदार्थांचा व्यापार करत असल्याची गुप्त माहिती कल्याणमधील खडकपाडा पोलिसांना मिळाली होती.

या  गुप्त माहितीच्या आधारे मंगळवारी खडकपाडा पोलीस पथकाने रात्रीच्या सुमारास आंबिवली परिसरात असेलेल्या एका बेकरीसमोर सापळा रचला होता. त्यावेळी  इराणी कबिल्यातील सबा ही संशयित रित्या आढळून आली असता, पोलीस पथकातील महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी तिला ताब्यात घेतले. त्यानंतर सबाची पोलिसांनी अधिक चौकशी करून झाडाझडती घेतली असता तिच्याकडे एमडी ड्रग्ससह चरसचा साठा आढळून आला . 

दरम्यान, खडकपाडा पोलिसांनी तिच्याकडून एमडी ड्रग्जसह चरस, गांजा हस्तगत करून तिच्या विरोधात खडकपाडा पोलीस ठाण्यात विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करून तिला अटक केली आहे. पोलिसांच्या अटकेत असलेल्या ड्रग डीलर सबाला बुधवारी (24 मे) कल्याण जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले असता, तिला न्यायालयाने अधिक पोलीस कोठडी सुनावली आहे. एमडी ड्रग्स आणि चरस, गांजा आरोपी सबाने  कुठून आणले? आणि ती कोणाला विक्री करत होती? याचा तपास आता खडकपाडा पोलीस करत आहेत.

तीन दिवसांपूर्वीच भिवंडीतील सौदागर मोहल्ल्यात राहणाऱ्या एका नशेच्या सौदागाराला भिवंडी गुन्हे शाखेच्या पथकाने भिवंडीतील गजबजलेल्या मंडई भागातील बाजारपेठेतून बेड्या ठोकल्या होत्या. जमशेद ताबीज अन्सारी (वय 32, रा. सौदागर  मोहल्ला, भोईवाडा) असे बेड्या ठोकलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याजवळ 1 लाख 12 हजार रुपये किमतीचा 16.50 ग्रॅम वजनाचा मेफेड्रॉन (एमडी) हा अंमली पदार्थ आढळून आला होता.

हेही बातम्या:

Kalyan Crime: फिल्मी स्टाईल पलायन; कोठडीचे लोखंडी गज वाकवून आरोपी पसार; पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

सैफ अली खान हल्ला प्रकरण, हल्लेखोर मोहम्मद शहजादला 5 दिवसाची पोलिस कोठडी
सैफ अली खान हल्ला प्रकरण, हल्लेखोर मोहम्मद शहजादला 5 दिवसाची पोलिस कोठडी
Ajit Pawar : बीडचे पालकमंत्रिपद मिळताच अजितदादांचा मोठा निर्णय, राष्ट्रवादीच्या शिबिरातून सांगितली पुढील रणनीती
बीडचे पालकमंत्रिपद मिळताच अजितदादांचा मोठा निर्णय, राष्ट्रवादीच्या शिबिरातून सांगितली पुढील रणनीती
Dhananjay Munde: बीडची बदनामी आम्ही नव्हे तुमच्या वाल्मिक कराडने केली; तुम्ही आता राजीनाम्याची तयारी करा; अंजली दमानियांनी धनंजय मुंडेंना सुनावले खडेबोल
बीडची बदनामी आम्ही नव्हे तुमच्या वाल्मिक कराडने केली; तुम्ही आता राजीनाम्याची तयारी करा; अंजली दमानियांनी धनंजय मुंडेंना सुनावले खडेबोल
Praful Patel NCP Shirdi Shibir: लोकसभेचा निकाल बघून अजितदादा अन् मी एकमेकांचा चेहराच पाहत बसलो होतो, प्रफुल पटेलांनी सांगितला 'तो' किस्सा
लोकसभेच्या निकालानंतर अजितदादा अन् मी एकमेकांचे चेहरे पाहत होतो, पण खचायचं नाही हे ठरवलं: प्रफुल पटेल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Saif ali khan Case Update : नाश्ताचे पैसे आरोपीने Gpay केलं आणि आरोपी पोलिसांच्या ताब्यातDhananjay Munde : मी स्वत:च दादांना विनंती केली, बीड पालकमंत्री पदावरून धनंजय मुंडे म्हणाले..Hasan Mushrif Washim : श्रद्धा-सबुरी ठेवली पाहिजे, वाशिम पालकमंत्री पदावरून मुश्रीफ म्हणाले...Chhagan Bhujbal : जे काही काम करू शकत नाही त्यांचे बदल झाले पाहिजे :छगन भुजबळ

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सैफ अली खान हल्ला प्रकरण, हल्लेखोर मोहम्मद शहजादला 5 दिवसाची पोलिस कोठडी
सैफ अली खान हल्ला प्रकरण, हल्लेखोर मोहम्मद शहजादला 5 दिवसाची पोलिस कोठडी
Ajit Pawar : बीडचे पालकमंत्रिपद मिळताच अजितदादांचा मोठा निर्णय, राष्ट्रवादीच्या शिबिरातून सांगितली पुढील रणनीती
बीडचे पालकमंत्रिपद मिळताच अजितदादांचा मोठा निर्णय, राष्ट्रवादीच्या शिबिरातून सांगितली पुढील रणनीती
Dhananjay Munde: बीडची बदनामी आम्ही नव्हे तुमच्या वाल्मिक कराडने केली; तुम्ही आता राजीनाम्याची तयारी करा; अंजली दमानियांनी धनंजय मुंडेंना सुनावले खडेबोल
बीडची बदनामी आम्ही नव्हे तुमच्या वाल्मिक कराडने केली; तुम्ही आता राजीनाम्याची तयारी करा; अंजली दमानियांनी धनंजय मुंडेंना सुनावले खडेबोल
Praful Patel NCP Shirdi Shibir: लोकसभेचा निकाल बघून अजितदादा अन् मी एकमेकांचा चेहराच पाहत बसलो होतो, प्रफुल पटेलांनी सांगितला 'तो' किस्सा
लोकसभेच्या निकालानंतर अजितदादा अन् मी एकमेकांचे चेहरे पाहत होतो, पण खचायचं नाही हे ठरवलं: प्रफुल पटेल
Ajit Pawar : जे वादळ उठलं होतं, ते आज थांबवण्याचं काम...; अजित पवारांनी धनंजय मुंडेंबाबत बोलताच टाळ्यांचा कडकडाट; राष्ट्रवादीच्या शिबिरात नेमकं काय घडलं?
जे वादळ उठलं होतं, ते आज थांबवण्याचं काम...; अजित पवारांनी धनंजय मुंडेंबाबत बोलताच टाळ्यांचा कडकडाट; राष्ट्रवादीच्या शिबिरात नेमकं काय घडलं?
Jalgaon Crime: धक्कादायक! रात्रीचा वाद पुन्हा उफाळला,टोळक्यानं कोयते तलवारी उपसल्या, बापासमोरच मुलाला संपवलं
धक्कादायक! रात्रीचा वाद पुन्हा उफाळला,टोळक्यानं कोयते तलवारी उपसल्या, बापासमोरच मुलाला संपवलं
Nitesh Rane : राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असतं तर त्यांनी बांगलादेशींची आरतीच केली असती; मंत्री नितेश राणेंची बोचरी टीका
राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असतं तर त्यांनी बांगलादेशींची आरतीच केली असती; मंत्री नितेश राणेंची बोचरी टीका
Mumbai High Court : ब्रेकअपनंतर आत्महत्येला प्रियकर जबाबदार नाही, लग्नास नकार म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त करणे नव्हे; हायकोर्टाकडून तरुणाची निर्दोष मुक्तता
ब्रेकअपनंतर आत्महत्येला प्रियकर जबाबदार नाही, लग्नास नकार म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त करणे नव्हे; हायकोर्टाकडून तरुणाची निर्दोष मुक्तता
Embed widget