एक्स्प्लोर

विरारमध्ये ICICI बँकेवर सशस्त्र दरोडा, दोन महिला कर्मचाऱ्यांवर प्राणघातक हल्ला, एकीचा मृत्यू

विरारमध्ये आयसीआयसीआय (ICICI) बँकेवर पूर्व मॅनेजरनेच सशस्त्र दरोडा टाकल्याची घटना घडलीय. यात दोन महिला कर्मचाऱ्यांवर प्राणघातक हल्ला झाला असून यातील एका महिला कर्मचाऱ्याचा मृत्यू झालाय.

विरार : शहरात बँकेच्या पूर्व मॅनेजरने बँकेतील कर्मचाऱ्यांवर चाकूने हल्ला करीत बँकेतील एक कोटी अडतीस लाखाची रोख आणि सोन घेऊन, फरार होत असताना नागरीकांच्या सतर्कतेने आरोपीला पकडण्यात यश आलं आहे. विरार पूर्व स्टेशन परिसरातील आयसीआयसीआय (ICICI) बँकेत गुरुवार रात्री आठच्या सुमारास ही घटना घडली आहे. बँक लुटणारा दुसरा तिसरा कुणी नसून बँकेचा पूर्वीचा मॅनेजर होता. या हल्ल्यात बँकेची असिस्टंट मॅनेजर महिलेचा मृत्यू झाला आहे. तर एकीवर रुग्णालयात उपचार सुरु आहे. घटनेच्या वेळी बँकेचा सुरक्षारक्षक नसल्याने बँकेच्या कार्यप्रणालीवर महिलांच्या नातेवाईकांनी नाराजी व्यक्त केली आहे.  

ज्या बँकेत मॅनेजर होता, त्याच बँकेत या आरोपीनं चोरी केली. तर आपल्याच सहयोगी साथीदारांवर चाकूने हल्ला करत एकीला ठार मारलं आहे. तर एकीवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. गुरुवारी आठ वाजता आयसीआयसीआय बँकेच्या विरार पूर्वे शाखेत असिस्टंट मॅनेजर योगिता चौधरी-वर्तक आणि श्रद्धा देवरुखकर या दोघी उशीरा सायंकाळपर्यंत बँकेतच काम करत  होत्या. बँकेचा पूर्व मॅनेजर अनिल दुबे याने ओळखीचा फायदा उचलत बँकेच्या आत प्रवेश केला. आणि चाकूने योगिताच्या गळ्यावर चेहऱ्यावर अंगावर वार केले. घटनेचं गांभीर्य ओळखून, श्रध्दा हिने बँकेच इमरजन्सी अलार्म बेल वाजवली. यामुळे बाहेरचे नागरीक सतर्क झाले. मात्र, तोपर्यंत आरोपी अनिल दुबेने श्रध्दावरही अनेक वार केले. त्यात तीही जखमी झाली. आरोपी बँकेतील एक कोटी अडतीस लाखांचे सोनं आणि रोख रक्कम बॅगेत भरुन बँकेबाहेर आला. त्याचवेळी नागरीकांनी त्याला पकडलं आणि पोलिसांना बोलावून त्यांच्या ताब्यात दिलं

बँकेचा निष्काळजीपणामुळे घटना घडल्याचा नातेवाईकांचा आरोप
यावेळी श्रद्धा आणि मृत योगिताच्या घरच्यांनी रात्रीच्या सुमारास बँकेत सुरक्षारक्षक का नव्हता? असा प्रश्न करत जर सुरक्षारक्षक असता तर नक्कीच ही घटना घडली नसती, असं म्हणत यात बँकेचा निष्काळजीपणा असल्याचा आरोप महिलांच्या नातेवाईकांनी केला आहे. मृत झालेल्या योगीताचे 5 वर्षांपूर्वी लग्न झाले होते. तिला 3 वर्षांचा एक मुलगा आहे तर त्यांचा पती हा फार्मा कंपनीत काम करतात तर जखमी श्रद्धा यांनाही 5 वर्षांचा मुलगा आहे. 

कर्जबाजारी झाल्याने उचललं टोकाचं पाऊल
आरोपी अनिल दुबे हा सध्या नायगांव येथे अॅक्सिस बँकेचा मॅनेजर आहे. आरोपी दुबे हा कर्जबाजारी झाला होता. तो आर्थिक चणचणीत होता. त्यामुळे हे टोकाचं पाऊल उचलल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. विरार पोलिसांनी आज वसई न्यायालयात अनिल दुबेला हजरं केलं असता, वसई न्यायलयाने आरोपीला 6 ऑगस्टपर्यंत 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Crime Navy Sailor: मुंबईत एकाच घरात सापडले 4 मृतदेह, नौदल कर्मचाऱ्याने पत्नी अन् दोन मुलांना संपवलं, मग स्वतःही आयुष्याचा केला शेवट, नेमकं काय घडलं?
मुंबईत एकाच घरात सापडले 4 मृतदेह, नौदल कर्मचाऱ्याने पत्नी अन् दोन मुलांना संपवलं, मग स्वतःही आयुष्याचा केला शेवट, नेमकं काय घडलं?
Sangli: कचरा टाकण्याच्या वादातून महिलेचा बळी घेतला, पतीवरही जीवघेणा हल्ला; आमदार गोपीचंद पडळकरांचा गंभीर आरोप, म्हणाले, आरोपीचा एन्काऊंटर करा..
सांगलीच्या कुपवाडमध्ये कचरा टाकण्याच्या वादातून महिलेचा बळी घेतला, पतीवरही जीवघेणा हल्ला; आमदार गोपीचंद पडळकरांचा गंभीर आरोप, म्हणाले, आरोपीचा एन्काऊंटर करा..
Ambernath MNS-BJP Clash : अंबरनाथमधील भाजप-मनसे राडा प्रकरणी भाजप नगरसेवकासह सहा जणांविरोधात अखेर गुन्हा दाखल; मनसेचा मोर्चा तूर्तास स्थगित
अंबरनाथमधील भाजप-मनसे राडा प्रकरणी भाजप नगरसेवकासह सहा जणांविरोधात अखेर गुन्हा दाखल; मनसेचा मोर्चा तूर्तास स्थगित
Nalasopara Crime Cake Shop: चामुंडा डेअरीतून वाढदिवसाचा केक घेतला, खाताना मेलेली पाल दिसली अन् ज्याची भीती होती तेच घडलं, नालासोपाऱ्यातील धक्कादायक घटना
चामुंडा डेअरीतून वाढदिवसाचा केक घेतला, खाताना मेलेली पाल दिसली अन् ज्याची भीती होती तेच घडलं, नालासोपाऱ्यातील धक्कादायक घटना

व्हिडीओ

Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शाळेत शिक्षक नाही, रस्ते नाहीत, शिक्षणाची ऐशी तैशी झाली, प्रयागराजबरोबर स्पर्धा करत कुंभमेळ्यावर इतका पैसा खर्च करण्याची गरज काय? 20 हजार कोटी गिळंकृत करायचा डाव; विजय वडेट्टीवारांचा हल्लाबोल
शाळेत शिक्षक नाही, रस्ते नाहीत, शिक्षणाची ऐशी तैशी झाली, प्रयागराजबरोबर स्पर्धा करत कुंभमेळ्यावर इतका पैसा खर्च करण्याची गरज काय? 20 हजार कोटी गिळंकृत करायचा डाव; विजय वडेट्टीवारांचा हल्लाबोल
जातनिहाय जनगणनेबाबत छगन भुजबळ धादांत खोटं बोलतायंत; ओबीसी नेते हरिभाऊ राठोडांचा दावा, म्हणाले, ते भाजपकडे झुकलेत
जातनिहाय जनगणनेबाबत छगन भुजबळ धादांत खोटं बोलतायंत; ओबीसी नेते हरिभाऊ राठोडांचा दावा, म्हणाले, ते भाजपकडे झुकलेत
Video: 'म्हणून मी डान्स करायचा नाही का?' टीम इंडियाची क्रिकेटर श्रेयंका पाटीलचा 'बबली बदमाश है' वर भन्नाट डान्स व्हायरल, ट्रोल करणाऱ्यांनाही सडेतोड प्रत्युत्तर
Video: 'म्हणून मी डान्स करायचा नाही का?' टीम इंडियाची क्रिकेटर श्रेयंका पाटीलचा 'बबली बदमाश है' वर भन्नाट डान्स व्हायरल, ट्रोल करणाऱ्यांनाही सडेतोड प्रत्युत्तर
माजी उपसभापती, मंत्री अन् पाचवेळा आमदार; थेट पक्षाच्या कार्यालयातच लटकलेल्या अवस्थेत आढळल्याने खळबळ; लिहून ठेवलेली नोट सुद्धा सापडली, कार्यकर्त्यांचा विश्वास बसत नसल्याने प्रकरणाचे गूढ वाढलं
माजी उपसभापती, मंत्री अन् पाचवेळा आमदार; थेट पक्षाच्या कार्यालयातच लटकलेल्या अवस्थेत आढळल्याने खळबळ; लिहून ठेवलेली नोट सुद्धा सापडली, कार्यकर्त्यांचा विश्वास बसत नसल्याने प्रकरणाचे गूढ वाढलं
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये आले असते तर त्यांचे प्राण वाचले असते; संजय राऊतांचा खळबळजनक दावा, सांगितला इतिहास
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये आले असते तर त्यांचे प्राण वाचले असते; संजय राऊतांचा खळबळजनक दावा, सांगितला इतिहास
नगर- मनमाड रस्त्याचं काम अमेरिका-इराण युद्धामुळे रखडलंय, ट्रम्पसारखा वेडा माणूस मी कधीही पाहिला नाही; सुजय विखेंच्या नवीन वक्तव्याची चर्चा

Embed widget