मुंबईतील वर्ल्डकप सेमीफायनलच्या तिकीटांची चौपट दरांत विक्री, मुंबई पोलिसांनी सापळा रचला, एकजण ताब्यात
ICC World Cup 2023 Semifinal: टीम इंडिया (Team India) न्यूझीलंडच्या (New Zealand) सेमीफायनल सामन्याचं तिकीट मूळ किंमतीपेक्षा चार ते पाच पटींनी वाढीव किंमतीनं विकणाऱ्या आरोपीला मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
IND vs NZ : सध्या देशात विश्वचषकाच्या (ICC World Cup 2023) फिवर पाहायला मिळत आहे. अशातच स्पर्धा अत्यंत रंजक वळणावर येऊन ठेपली आहे. स्पर्धेतील सेमीफायनलचे (ICC World Cup 2023 Semifinal) चार संघ मिळाले असून आता सेमीफायनलचा थरार रंगणार आहे. टीम इंडिया (Team India) विरुद्ध न्यूझीलंड (New Zealand) यांच्यात पहिला सेमीफायनलचा सामना खेळवण्यात येणार आहे. तर ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात दुसरा सेमीफायनलचा सामना खेळवण्यात येणार आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, सेमीफायनल 1 टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर रंगणार असून सेमीफायनलचं तिकीट मिळवण्यासाठी साऱ्यांचीच धडपड सुरू आहे. अशातच मुंबई पोलिसांनी याचप्रकरणी कारवाई करत टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड सेमीफायनल सामन्याचं तिकीट मूळ किंमतींपेक्षा चार ते पाच पटींनी वाढीव किमतींनी विकाणाऱ्या एकाला अटक केली आहे.
टीम इंडिया न्यूझीलंडच्या सेमीफायनल सामन्याचं तिकीट मूळ किंमतीपेक्षा चार ते पाच पटींनी वाढीव किंमतीनं विकणाऱ्या आरोपीला मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. आकाश कोठारी असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे. मुंबई पोलिसांनी सापळा रचून त्याला मालाड येथील राहत्या घरातून ताब्यात घेतलं. तसेच, त्याची कसून चौकशीही करण्यात आली आहे.
सापळा रचला अन् मुसक्या आवळल्या
मुंबई पोलिसांनी मिळालेल्या माहितीवरुन कट रचला. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचत मालाड येथील राहत्या घरातून आरोपीला ताब्यात घेतलं. सापळा रचून त्याच्या मालाड येथील राहत्या घरातून ताब्यात घेवून त्याच्याकडे चौकशी करून कारवाई करण्यात आली आहे. नोव्हेंबर 15 ला टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड सेमीफायनल सामन्याच्या तिकीटांचा काळाबाजार करून क्रिकेट सामन्याच्या आयोजकांची फसवणूक करत असल्याची माहिती मुंबई पोलिसांना मिळाली होती. त्याप्रमाणे पोलीस उपायुक्त डॉ. प्रवीण मुंडे यांच्या आदेशानुसार, ही कारवाई करून जे. जे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
आरोपीच्या व्हाट्सअॅप मेसेजमध्ये विविध स्लॉटचे तिकीट रेट
जे. जे. पोलीस ठाण्यात भादवि कलम 420 आणि 511 या कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलं आहे. या आरोपीनं तिकीट कुठून मिळवली त्याचबरोबर याच्यामध्ये अजून आरोपींचा सहभाग आहे का? याचा तपास पोलीस करत आहेत. पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, तिकीट उपलब्धता संदर्भात व्हाट्सअॅपवर एक मेसेजसुद्धा आरोपीकडून व्हायरल करण्यात आला होता. त्या व्हाट्सअॅप मेसेजमध्ये विविध स्लॉटचे तिकीट रेट देण्यात आले होते. आरोपीला ताब्यात घेऊन त्याला कायदेशीर नोटीस देऊन पुन्हा सोडण्यात आलं आहे.
दरम्यान, विश्वचषकाच्या रणांगणात रोहित शर्माच्या भारतीय क्रिकेट संघासमोर आता सेमीफायनलचं आव्हान आहे. या सामन्यात टीम इंडियाचा मुकाबला न्यूझीलंडशी होत असून, हा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर उद्या (बुधवारी) खेळवण्यात येणार आहे.