एक्स्प्लोर

बायको नांदायला येईना, नवऱ्याची आत्महत्या, 8 जणांवर गुन्हा, खळबळजनक घटनेने जिल्हा हादरला

पत्नीला सासरी घेऊन जाण्यासाठी पती गेला होता. मात्र त्नीच्या नातेवाईकांनी शिवीगाळ केल्याचा आरोप आहे. या शिवीगाळमुळे अपमानित झाल्याने, पतीने टोकाचं पाऊल उचललं. पतीने थेट विषारी द्रव्य घेऊन आयुष्य संपवलं.

बीड: पत्नी नांदायला येत नसल्याने पतीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना बीड (Beed Maharashtra) जिल्ह्यात घडली. याप्रकरणी 8 जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. आष्टीतील (Aashti) अंभोरा पोलिसांनी (Ambhora Police) याप्रकरणी गुन्हा दाखल करुन पुढील कारवाईला सुरुवात केली आहे. पत्नीला सासरी घेऊन जाण्यासाठी पती गेला होता. मात्र त्नीच्या नातेवाईकांनी शिवीगाळ केल्याचा आरोप आहे. या शिवीगाळमुळे अपमानित झाल्याने, पतीने टोकाचं पाऊल उचललं. पतीने थेट विषारी द्रव्य घेऊन आयुष्य संपवलं.

नेमकं काय घडलं?

आष्टी तालुक्यातील पती अण्णाराव हे पत्नीला आणण्यासाठी भोजेवाडी या गावी गेले होते. सासुरवाडीला गेल्यावर सासरच्या लोकांनी अण्णाराव यांना शिवीगाळ केली. या शिवीगाळमुळे अण्णाराव यांना अपमानित झाल्यासारखं वाटलं. पत्नीच्या नातेवाईकांनी केलेली शिवीगाळ अण्णाराव यांना चांगलीच जिव्हारी लागली. अण्णाराव हे आपल्या घरी  आले. त्यानंतर त्यांनी आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार अण्णाराव यांनी  विषारी द्रव पिऊन आत्महत्या केली.

आठ जणांवर गुन्हा दाखल

दरम्यान, या आत्महत्येनंतर अण्णाराव यांच्या कुटुंबाने आक्रमक पवित्रा घेतला. अण्णाराव यांच्या कुटुंबाने पत्नीसह नातेवाईकांविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली. अण्णाराव यांच्या कुटुंबाच्या  तक्रारीनंतर अंभोरा पोलिसांनी 8 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. 

पोलिसांच्या कारवाईकडे लक्ष

कुटुंबीयांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा तर दाखल झाला आहे. मात्र आता पोलीस नेमकी काय कारवाई करणार याकडे कुटुंबीयांचं लक्ष लागलं आहे. अण्णाराव यांच्या आत्महत्येला जबाबदार धरुन कुटुंबावर कडक कारवाई करावी अशी मागणी कुटुंबीयांची आहे. 

कोल्हापुरात अल्पवयीन मुलीची आत्महत्या

दरम्यान, तिकडे कोल्हापूर जिल्ह्यात एक अल्पवयीन मुलीने आत्महत्या केली. कोल्हापूर जिल्ह्यातील (Kolhapur News) करवीर तालुक्यातील सांगरुळमध्ये विषारी औषध प्राशन केलेल्या 16 वर्षीय नववीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यींनीचा अखेर उपचारादरम्यान मृत्यू झाला. आर्या सागर खाडे असं मृत्यू झालेल्या विद्यार्थिनीचं नाव आहे. दहा दिवसापूर्वी तिनं विषारी औषध प्राशन केलं होतं. दरम्यान, विषारी औषध प्राशन करण्यामाील कारण अद्याप अस्पष्ट असून या घटनेची नोंद करवीर पोलिस ठाण्यात झाली आहे. 

संबंधित बातम्या

lalit Patil Drug Racket : ललित पाटीलचा साथीदार रेहान शेख पुणे पोलिसांच्या ताब्यात; कारखान्यासाठी मदत अन् ड्रग्ज विक्रीची करायचा डील  

Kolhapur News : विषारी औषध प्राशन केलेल्या 16 वर्षीय नववीत शिकणाऱ्या विद्यार्थीनीचा अखेर मृत्यू; मैत्रिणींचा आक्रोश 

मागील काही वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Nashik News: रिक्षाची वाट पाहत होते, भरधाव दुचाकीने धडक दिली; 24 दिवस मृत्यूशी झुंज देणाऱ्या दिलीप काळेंची प्राणज्योत मालवली, नाशिकमध्ये रस्त्यांच्या दुरवस्थेचा आणखी एक बळी
रिक्षाची वाट पाहत होते, भरधाव दुचाकीने धडक दिली; 24 दिवस मृत्यूशी झुंज देणाऱ्या दिलीप काळेंची प्राणज्योत मालवली, नाशिकमध्ये रस्त्यांच्या दुरवस्थेचा आणखी एक बळी
Nashik Crime News: कुंभमेळ्याच्या बनावट वर्कऑर्डर प्रकरणात मोठी कारवाई; जामनेरमधून आणखी तिघे पोलिसांच्या ताब्यात, नेमकं प्रकरण काय?
कुंभमेळ्याच्या बनावट वर्कऑर्डर प्रकरणात मोठी कारवाई; जामनेरमधून आणखी तिघे पोलिसांच्या ताब्यात, नेमकं प्रकरण काय?
Pune Chakan MIDC: पुण्याच्या चाकण MIDC तील रस्त्यांच्या दुरवस्थेचे आणखी दोन बळी, चिखलामुळे बाईक स्लीप होऊन कंटेनरच्या चाकाखाली आली, दोघांचा जागीच दुर्दैवी अंत
पुण्याच्या चाकण MIDC तील रस्त्यांच्या दुरवस्थेचे आणखी दोन बळी, चिखलामुळे बाईक स्लीप होऊन कंटेनरच्या चाकाखाली आली, दोघांचा जागीच दुर्दैवी अंत
Solapur Crime News : झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना

व्हिडीओ

Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Asim Sarode On Shivsena Name And Symbol Hearing Supreme Court: तोच कागदोपत्री पुरावा आता एकनाथ शिंदेंसाठी अडचण ठरणार; शिवसेना सुनावणीवर असीम सरोदे यांचं मोठं विधान, सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
तोच कागदोपत्री पुरावा आता एकनाथ शिंदेंसाठी अडचण ठरणार; शिवसेना सुनावणीवर असीम सरोदे यांचं मोठं विधान, सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
Pune Chakan MIDC: पुण्याच्या चाकण MIDC तील रस्त्यांच्या दुरवस्थेचे आणखी दोन बळी, चिखलामुळे बाईक स्लीप होऊन कंटेनरच्या चाकाखाली आली, दोघांचा जागीच दुर्दैवी अंत
पुण्याच्या चाकण MIDC तील रस्त्यांच्या दुरवस्थेचे आणखी दोन बळी, चिखलामुळे बाईक स्लीप होऊन कंटेनरच्या चाकाखाली आली, दोघांचा जागीच दुर्दैवी अंत
Sri Lankan Coach News : श्रीलंकेच्या खेळाडूने संघाच्या कोचला संपवलं; पोलिसांकडून क्रिकेटपटूला अटक, टीम इंडियाच्या कसोटी सामन्याआधी खळबळ, नेमकं काय घडलं?
श्रीलंकेच्या खेळाडूने संघाच्या कोचला संपवलं; पोलिसांकडून क्रिकेटपटूला अटक, टीम इंडियाच्या कसोटी सामन्याआधी खळबळ, नेमकं काय घडलं?
Nagpur SIR News: सव्वादोन लाख मतदार मृत, साडेचार लाख कायमस्वरूपी स्थलांतरित; नागपुरमध्ये मतदार यादीच्या SIR प्रक्रियेत धक्कादायक माहिती
सव्वादोन लाख मतदार मृत, साडेचार लाख कायमस्वरूपी स्थलांतरित; नागपुरमध्ये मतदार यादीच्या SIR प्रक्रियेत धक्कादायक माहिती
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Junior Amitabh Bachchan In Deewaar Movie: 'दीवार'चा ज्युनियर अमिताभ सध्या करतो तरी काय? भारत सोडून अमेरिकेत थाटलाय कोट्यवधींचा व्यवसाय, टेक इंडस्ट्रीत कमावलं मोठं नाव; मुली हॉलिवूड स्टार्स, ओळखलं का कोण?
'दीवार'चा ज्युनियर अमिताभ, भारत सोडून अमेरिकेत थाटलाय कोट्यवधींचा व्यवसाय, टेक इंडस्ट्रीत कमावलं मोठं नाव; मुली हॉलिवूड स्टार्स, ओळखलं का कोण?
Solapur Crime News : झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
BAN vs AUS : बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका,  पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला 
बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका, पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला
Embed widget