एक्स्प्लोर

हृदयद्रावक! कॅन्सरच्या उपचाराला पैसे नसल्यानं पती-पत्नीनं आयुष्य संपवलं; 12 वर्षीय मुलीलाही विष दिलं, नागपुरातील खळबळजनक घटना

Nagpur Crime: कॅन्सरच्या उपचाराला पैसे नसल्यानं पती-पत्नीनं आयुष्य संपवलं, 12 वर्षीय मुलीलाही विष दिलं, नागपुरातील खळबळजनक घटना

Nagpur Crime News Updates: नागपूर : कॅन्सर पीडित (Cancer Symptoms) पत्नीच्या उपचारासाठी केरळ (Kerala) राज्यातून नागपूरला (Nagpur Crime) आलेल्या एका दाम्पत्यानं 12 वर्षीय मुलीला विष देऊन स्वतः आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना नागपूर शहरातील जरीपटका पोलीस ठाणे (Jaripatka Police Station) हद्दीतील विजयश्री नगर येथे घडली आहे. या घटनेमध्ये दाम्पत्याचा मृत्यू झाला असून त्यांची 12 वर्षांची मुलगी मात्र बचावली आहे. तिच्यावर इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालय (मेयो) येथे उपचार सुरू आहेत.

रीजु विजयन उर्फ विजय नायर (45) आणि प्रिया रीजु नायर (34) असं आत्महत्या करणाऱ्या दाम्पत्याचं नाव आहे. आत्महत्या प्रकरणाचा जरीपटका पोलीस तपास करत आहेत. 

प्रिया रीजु नायर यांना रक्ताचा कर्करोग या दुर्धर आजारानं ग्रासलं होतं. रीजु नायर यांनी प्रिया नायर यांच्यावर केरळ येथील रुग्णालयात उपचार केले. मात्र, उपचारात फारसा फायदा होत नसल्यामुळे रीजु नायर हे पत्नी प्रिया आणि मुलगी वैष्णवीला घेऊन नागपूर शहरात आले. दोन महिन्यांपासून ते नागपूर मुक्कामी होते. नागपुरातील एका खासगी पण महागड्या रुग्णालयात उपचार सुरू होते. दर आठवड्यात हजारो रुपयांचा खर्च उपचारात होत असल्यानं रीजु नायर आर्थिक विवंचनेत सापडले होते. पत्नीच्या उपचारात जवळील सर्व जमा पैसे संपल्यनंतर डोक्यावर कर्जाचा डोंगर तयार झाला होता. सध्या उपचार सुरू असताना डॉक्टरांनी सांगितलेली औषधं घेण्यासाठी पैसे शिल्लक नव्हते. त्यामुळेचं रीजु नायर यांनी पत्नी आणि मुलीला शीतपेयातून विष दिलं आणि स्वतः ही विषयुक्त शीतपेय पिऊन आत्महत्या केली. मात्र, रीजु नायर यांची 12 वर्षीय मुलगी थोडक्यात बचावली आहे.

रीजु नायर यांनी पत्नी प्रियाला शीतपेयामध्ये विष घालून पिण्यासाठी दिलं, त्यानंतर तेचं शीतपेय 12 वर्षीय मुलगी वैष्णवीला दिल्यानंतर स्वतःही विष प्राशन केलं. वैष्णवीनं ते कोल्डड्रिंक पिल्यानंतर काही वेळात तिनं उलट्या केल्या, त्यामुळे पोटात गेलेलं विष बाहेर पडलं आणि ती थोडक्यात बचावली. सध्या तिच्यावर नागपूरच्या इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. रीजु नायर यांच्या पत्नी प्रिया नायर यांच्या आधारकार्डवर कोल्हापूरचा पत्ता असल्याचं पाहायला मिळालं. जरीपटका पोलिसांनी घटनास्थळाची पहाणी केली असता त्यांना तिथे मृतक रीजु नायर आणि प्रिया नायर यांचे आधारकार्ड आढळलं. त्यावर प्रिया यांच्या आधारकार्डवर कोल्हापूर जिल्ह्यातील आंबेवाडी येथील निवासी पत्त्याची नोंद असल्याचं आढळलं. सध्या पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मराठा आरक्षणावर शरद पवारांकडे कोणता मार्ग आहे? पवारांनी भूमिका जाहीर करावी; अजितदादांच्या राष्ट्रवादीचे आवाहन
मराठा आरक्षणावर शरद पवारांकडे कोणता मार्ग आहे? पवारांनी भूमिका जाहीर करावी; अजितदादांच्या राष्ट्रवादीचे आवाहन
''एक निवडणूक हारले म्हणून अशांततेच वातावरण तयार केलं जातंय''; विशालगडावरुन अस्लम शेख थेट DG ऑफिसला
''एक निवडणूक हारले म्हणून अशांततेच वातावरण तयार केलं जातंय''; विशालगडावरुन अस्लम शेख थेट DG ऑफिसला
पूजा खेडकरच्या कुटुंबीयांची सगळी कुंडलीच बाहेर निघणार? इन्कम टॅक्सकडून मागवला डेटा, वडिलांचा रेकॉर्डही चेक होणार
पूजा खेडकरच्या कुटुंबीयांची सगळी कुंडलीच बाहेर निघणार? इन्कम टॅक्सकडून मागवला डेटा, वडिलांचा रेकॉर्डही चेक होणार
Video : ठाकरे-शं‍कराचार्यांच्या भेटीवरुन महंतांचे सवाल? उद्धव ठाकरेंवरही जोरदार टीका; विश्वासघातकी असाही उल्लेख
Video : ठाकरे-शं‍कराचार्यांच्या भेटीवरुन महंतांचे सवाल? उद्धव ठाकरेंवरही जोरदार टीका; विश्वासघातकी असाही उल्लेख
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Superfast : महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर : 16 July 2024 : ABP MajhaPooja Khedkar Case : अपंगत्वाचं प्रमाणपत्र रेशन कार्ड दाखवून मिळवलं : विजय कुंभारABP Majha Headlines : 03 PM : 16 Jully 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सShatrughna Kate Chinchwad : चिंचवडमध्ये  शत्रुघ्न काटे बंडखोरी करण्याच्या तयारीत?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मराठा आरक्षणावर शरद पवारांकडे कोणता मार्ग आहे? पवारांनी भूमिका जाहीर करावी; अजितदादांच्या राष्ट्रवादीचे आवाहन
मराठा आरक्षणावर शरद पवारांकडे कोणता मार्ग आहे? पवारांनी भूमिका जाहीर करावी; अजितदादांच्या राष्ट्रवादीचे आवाहन
''एक निवडणूक हारले म्हणून अशांततेच वातावरण तयार केलं जातंय''; विशालगडावरुन अस्लम शेख थेट DG ऑफिसला
''एक निवडणूक हारले म्हणून अशांततेच वातावरण तयार केलं जातंय''; विशालगडावरुन अस्लम शेख थेट DG ऑफिसला
पूजा खेडकरच्या कुटुंबीयांची सगळी कुंडलीच बाहेर निघणार? इन्कम टॅक्सकडून मागवला डेटा, वडिलांचा रेकॉर्डही चेक होणार
पूजा खेडकरच्या कुटुंबीयांची सगळी कुंडलीच बाहेर निघणार? इन्कम टॅक्सकडून मागवला डेटा, वडिलांचा रेकॉर्डही चेक होणार
Video : ठाकरे-शं‍कराचार्यांच्या भेटीवरुन महंतांचे सवाल? उद्धव ठाकरेंवरही जोरदार टीका; विश्वासघातकी असाही उल्लेख
Video : ठाकरे-शं‍कराचार्यांच्या भेटीवरुन महंतांचे सवाल? उद्धव ठाकरेंवरही जोरदार टीका; विश्वासघातकी असाही उल्लेख
घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरणात दोन IPS  अधिकारी आमने-सामने, 300 पानांच्या आरोपपत्रात 102 जणांचे जबाब
घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरणात दोन IPS अधिकारी आमने-सामने, 300 पानांच्या आरोपपत्रात 102 जणांचे जबाब
Suchitra Krishnamoorthi Attends Nude Party :  नेकेड पार्टीत पोहचली भारतीय अभिनेत्री, काही मिनिटांतच काढला पळ, म्हणाली...
नेकेड पार्टीत पोहचली भारतीय अभिनेत्री, काही मिनिटांतच काढला पळ, म्हणाली...
Rakul Preet Singh : अभिनेत्री रकुल प्रीत सिंहच्या भावाला ड्रग्स प्रकरणात अटक, 2 कोटींचे अंमली पदार्थ जप्त, अमनसह पाच जण तुरुंगात
अभिनेत्री रकुल प्रीत सिंहच्या भावाला ड्रग्स प्रकरणात अटक, 2 कोटींचे अंमली पदार्थ जप्त, अमनसह पाच जण तुरुंगात
Gargi Phule : अलका कुबल-समीर आठल्येंची तक्रार थेट अजित पवारांकडे, निळू फुलेंची मुलगी मैदानात, नेमकं प्रकरण काय?
अलका कुबल-समीर आठल्येंची तक्रार थेट अजित पवारांकडे, निळू फुलेंची मुलगी मैदानात, नेमकं प्रकरण काय?
Embed widget