दारूच्या नशेत पतीनं जाळून घेतल्याचा बनाव केला, शवविच्छेदनात डोक्यावरचा मार दिसला अन् पत्नीचं बिंग फुटलं
पतीच्या मृत्यूनंतर सुमित्रा घाबरली आणि पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी तिने बनाव केला .मृत कैलास च्या अंगावर पेट्रोल टाकून त्याला पेटवून देत पोलिसांना पतीने दारूच्या नशेत स्वतःला पेटवून दिल्याचा सांगितले .

Hingoli Crime: हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे .दारूच्या नशेत पतीने स्वतःला पेटवून घेतल्याचा बनाव केला, मात्र या बनावात आता पत्नीच अडकली आहे . पत्नीने पतीचा खून करून त्याला पेटवून दिल्याची कबूल दिल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे . याप्रकरणी आरोपी पत्नी सुमित्रा गलांडे विरोधात गोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय . (Hingoli Crime)
नेमके प्रकरण काय ?
हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यात बाबुळगाव मध्ये कैलास गलांडे आणि सुमित्रा गलांडे हे पती पत्नी राहत होते . कैलास हा नेहमी दारूचा नशेत पत्नीला मारहाण करत असे .घटनेच्या दिवशीही तो दारू पिऊन हातात कच्चे घेऊन पत्नी सुमित्रावर हल्ला करण्यासाठी पुढे आला .मात्र सुमित्राने त्याच्या हातून कधी हिसकावून ते त्याच्या डोक्यात मारली .या गावामुळे कैलास चा जागीच मृत्यू झाला .पतीच्या मृत्यूनंतर सुमित्रा घाबरली आणि पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी तिने बनाव केला .मृत कैलास च्या अंगावर पेट्रोल टाकून त्याला पेटवून देत पोलिसांना पतीने दारूच्या नशेत स्वतःला पेटवून दिल्याचा सांगितले .
घटनेनंतर गोरेगाव पोलीस घटनास्थळी दाखल झाले .घटनेचा पूर्ण पंचनामा करत मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला .मात्र शवविच्छेदनाच्या अहवालात कैलासच्या डोक्याला गंभीर मार आढळल्याचे दिसून आले . डोक्याला लागलेला मार दिसून आल्याने आरोपी सुमित्रा गलंडे हिचे बिंग फुटले . याप्रकरणी पत्नी सुमित्राच्या विरोधात गोरेगाव पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे .घटनेनंतर मोठी खळबळ उडाली असून अधिक तपास सुरू आहे .
डोक्यावर वार करून हत्या
संजय सासे हे 'बाबागिरी' करत असल्याचा संशय होता, अशी माहिती स्थानिकांनी दिली आहे. सोमवारी मध्यरात्री काही अज्ञात व्यक्तींनी संजय सासे यांच्या डोक्यावर गंभीर वार करून त्यांचा निर्घृण खून केला. या प्रकरणी संजय सासे यांची पत्नी रुपाली संजय सासे यांनी पंचवटी पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरुद्ध तक्रार दाखल केली आहे.पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. पोलिसांकडून आतापर्यंत एका संशयित आरोपीला अटक केल्याची माहिती मिळत आहे.
ही घटना पंचवटी पोलीस ठाण्याच्या (Panchavati Police Station) हद्दीतील महापालिकेच्या 56 नंबर शाळेजवळील प्रवीण किराणा दुकानाजवळ घडली. मृताचे नाव संजय तुळशीराम सासे (40, रा. घर क्र. 1288, महालक्ष्मी चाळ, महाराणा प्रताप नगर, पेठ रोड, पंचवटी) असे आहे.























