एक्स्प्लोर

ट्रॅक्टर खरेदी करण्यास विरोध, पत्नीची हत्या करून मृतदेह दोरीने बांधून लटकवून ठेवला; हिंगोली जिल्ह्यातील धक्कादायक घटना

Hingoli Crime News : शेती विकून ट्रॅक्टर खरेदी करण्यास पत्नीने विरोध केल्याने पतीने एवढ्या टोकाचे पाऊल उचलले असल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आले आहे.

Hingoli Crime News : हिंगोली जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली असून, पतीनेच पत्नीची हत्या (Murder) केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे पत्नीची हत्या केल्यावर आरोपीने तीचा मृतदेह दोरीने बांधून लटकवून ठेवला होता. शेती विकून ट्रॅक्टर खरेदी करण्यास पत्नीने विरोध केल्याने पतीने एवढ्या टोकाचे पाऊल उचलले असल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आले आहे. विश्रांती ज्ञानोबा चव्हाण असे हत्या करण्यात आलेल्या महिलेचं नाव असून, ज्ञानोबा चव्हाण असे आरोपी पतीचे नाव आहे. 

अधिक माहितीनुसार, हिंगोली जिल्ह्यातील कुडाळ येथे ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी शेती विक्री करू देत नसल्याच्या कारणावरून पतीनेच पत्नीचा गळा दाबून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. वसमत तालुक्यातील कुडाळ येथील विश्रांती ज्ञानोबा चव्हाण यांचा पाच वर्षांपूर्वी ज्ञानोबा चव्हाण सोबत विवाह झाला होता. मागील काही दिवसांपासून ट्रॅक्टर खरेदी करण्याच्या कारणावरून  दोघांमध्ये वाद सुरु होते. शेती विक्री करून ट्रॅक्टर खरेदी करण्याचा निर्णय ज्ञानोबा चव्हाण यांनी घेतला होता. परंतु शेती विक्री करायला त्यांच्या पत्नी विश्रांतीचा विरोध होता. याच कारणावरून पती-पत्नीमध्ये वाद झाले होते. तर, आरोपी ज्ञानोबाने टोकाची भूमिका घेत रागाच्या भरात पत्नी विश्रांतीचा गळा दाबून खून केला. तसेच, मृतदेह दोरीने बांधून लटकवून ठेवला होता. याप्रकरणी हट्ट पोलीस ठाण्यामध्ये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पती-पत्नीमध्ये सतत वाद...

विश्रांती आणि ज्ञानोबा यांचे पाच वर्षांपूर्वी लग्न झाले होते. दोघांमध्ये सर्वकाही सुरळीत सुरू असताना, मागील काही दिवसात नव्या वादाला सुरुवात झाली. शेत विकून नवीन ट्रॅक्टर घेण्याची ज्ञानोबा यांची इच्छा होती. त्यामुळे यासाठी मागील काही दिवसांपासून त्यांच्याकडून प्रयत्न सुरू होते. मात्र, दुसरीकडे शेती विकून ट्रॅक्टर घेण्यास पत्नी विश्रांतीचा नकार होता. याच कारणावरून पती-पत्नीमध्ये मागील काही दिवसांत वाद होत होते. दरम्यान, हाच वाद एवढ्या टोकाला गेला की, ज्ञानोबा यांनी पत्नीची गळा दाबून हत्या केली. एवढेच नाही तर हत्या केल्यावर पत्नीचा मृतदेह घरात लटकून ठेवला. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. तसेच पोलिसांनी खुनाचा गुन्हा देखील दाखल केला.

घटनास्थळी पोलीस दाखल... 

पतीने पत्नीची हत्या करून घरात मृतदेह लटकावून ठेवल्याची घटना उघडकीस आल्यावर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. तसेच, पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवला आहे. तसेच, वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी देखील घटनास्थळी धाव घेत पाहणी केली आहे. तसेच, या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या: 

Crime News : चार वर्षे 'लिव्ह इन' मध्ये राहणाऱ्या महिलेने प्रियकराला संपवलं, विवस्त्र करून केली होती मारहाण

About the author माधव दिपके

माधव दिपके
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

मुंबईत पोलिसांची मोठी कारवाई; दोन वेगवेगळ्या गुन्ह्यात 12 जणांना अटक, 16 कोटींचे ड्रग्ज जप्त
मुंबईत पोलिसांची मोठी कारवाई; दोन वेगवेगळ्या गुन्ह्यात 12 जणांना अटक, 16 कोटींचे ड्रग्ज जप्त
नाशिक TCS प्रकरणी राष्ट्रीय महिला आयोगाचा धक्कादायक अहवाल समोर, 50 पानांचा अहवाल मुख्यमंत्र्यांना सादर  
नाशिक TCS प्रकरणी राष्ट्रीय महिला आयोगाचा धक्कादायक अहवाल समोर, 50 पानांचा अहवाल मुख्यमंत्र्यांना सादर  
शिवसेनेच्या नगरसेवकाकडून भाजप पदाधिकाऱ्याच्या मुलाला बेदम मारहाण, बदलापुरात राजकीय वातावरण तापलं, गुन्हा दाखल  
शिवसेनेच्या नगरसेवकाकडून भाजप पदाधिकाऱ्याच्या मुलाला बेदम मारहाण, बदलापुरात राजकीय वातावरण तापलं, गुन्हा दाखल  
Bhandara Crime News: मुलीचं पळून जाऊन लग्न, भोंदूबाबानं स्टॅम्पवर लिहून दिलं, बापाकडून 1 लाख घेतले; भंडाऱ्यात खळबळजनक घटना
मुलीचं पळून जाऊन लग्न, भोंदूबाबानं स्टॅम्पवर लिहून दिलं, बापाकडून 1 लाख घेतले; भंडाऱ्यात खळबळजनक घटना

व्हिडीओ

Sanjay Shirsat On Imtiyaz Jaleel : निदा खानला आश्रय प्रकरणाचा मास्टरमाईंड इम्तियाज जलील - शिरसाट
Kolhapur Fuel Issue : मोदींकडून पेट्रोल-डिझेल कमी वापरण्याचे आवाहन, कोल्हापूरकर म्हणाले...
Mateen Patel Case : मतीन पटेलांचं नगरसेवक पद रद्द करण्याची प्रक्रिया सुरू - महापौर संभाजीनगर
Nitesh Rane On Nida Khan Case : निदा खान हिला पाठिशी घालण्याचं काम MIM पक्षाकडून सुरु आहे
Nagpur LPG Issue : सिलेंडर बुकिंग, OTP आणि सबसिडी, नागपुरात सिलेंडरचा काळाबाजार? अफलातून प्रकार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
CM Vijay: मुख्यमंत्री बनताच विजयने सर्वांची मनं जिंकली; माजी CM स्टॅलिन यांच्या घरी जाऊन भेट, सत्कार, चर्चा
CM Vijay: मुख्यमंत्री बनताच विजयने सर्वांची मनं जिंकली; माजी CM स्टॅलिन यांच्या घरी जाऊन भेट, सत्कार, चर्चा
मुंबईत पोलिसांची मोठी कारवाई; दोन वेगवेगळ्या गुन्ह्यात 12 जणांना अटक, 16 कोटींचे ड्रग्ज जप्त
मुंबईत पोलिसांची मोठी कारवाई; दोन वेगवेगळ्या गुन्ह्यात 12 जणांना अटक, 16 कोटींचे ड्रग्ज जप्त
'वर्क फ्रॉम होम'चा पर्याय स्वीकारा! पंतप्रधान मोदींनी असं का म्हटलं? केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
'वर्क फ्रॉम होम'चा पर्याय स्वीकारा! पंतप्रधान मोदींनी असं का म्हटलं? केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
मोठी बातमी ! मुंबईकरांवर पाणीसंकट; जलाशयात घट, 15 मेपासून नळाला कमी पाणी येणार, 10 टक्के कपात
मोठी बातमी ! मुंबईकरांवर पाणीसंकट; जलाशयात घट, 15 मेपासून नळाला कमी पाणी येणार, 10 टक्के कपात
आगामी काळात मोठी महागाई, जितेंद्र आव्हाडांचे भाकीत; मोदींच्या आवाहनानंतर ठाकरेंच्या खासदारांचाही संताप
आगामी काळात मोठी महागाई, जितेंद्र आव्हाडांचे भाकीत; मोदींच्या आवाहनानंतर शिवसेना ठाकरेंच्या खासदारांचाही संताप
मंत्री बावनकुळेंनी शरद पवारांच्या आमदाराला पुढे बोलावलं; कार्यालयाचं उद्घाटन करायला लावलं, चर्चा तर होणारच
मंत्री बावनकुळेंनी शरद पवारांच्या आमदाराला पुढे बोलावलं; कार्यालयाचं उद्घाटन करायला लावलं, चर्चा तर होणारच
व्यापारी वर्षभर जगतील, पण कारागिरांनी कसे जगायचे? मोदींच्या आवाहनावर सोनं व्यापाऱ्यांचा सवाल, पुणेकरही नाराज
व्यापारी वर्षभर जगतील, पण कारागिरांनी कसे जगायचे? मोदींच्या आवाहनावर सोनं व्यापाऱ्यांचा सवाल, पुणेकरही नाराज
Nandurbar Fire News: नंदुरबारच्या नवापूर एमआयडीसीत अग्नितांडव! टेक्स्टाईल कंपनीला भीषण आग, तब्बल 15 किमी अंतरावरून दिसतायेत धुराचे लोट
नंदुरबारच्या नवापूर एमआयडीसीत अग्नितांडव! टेक्स्टाईल कंपनीला भीषण आग, तब्बल 15 किमी अंतरावरून दिसतायेत धुराचे लोट
Embed widget