Hingoli : शिक्षकी पेशाला काळिमा, आंघोळ करतानाचे फोटो व्हायरल करण्याची धमकी देत महिलेवर बलात्कार
हिंगोली जिल्ह्यात शिक्षकी पेशाला काळिमा फासणारी घटना घडली आहे. महिलेचे आंघोळ करतानाचे फोटो काढून ते व्हायरल करण्याची धमकी देत शिक्षकाने तिच्यावर बलात्कार केला.
हिंगोली : शिक्षक हा केवळ विद्यार्थीच नाही तर समाज घडवतो, असं म्हटलं जातं. परंतु हिंगोली जिल्ह्यात शिक्षकी पेशाला काळिमा फासणारी घटना घडली आहे. महिलेचे आंघोळ करतानाचे फोटो काढून त्याद्वारे तिला ब्लॅकमेल करुन वारंवार बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. हिंगोलीतील सेनगाव इथे हा प्रकार घडला आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल झाला असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, सेनगाव इथला रहिवासी असलेला शिक्षक मारोती कोटकर याने संबंधित महिलेसोबत भाऊ असल्याचं सांगून जवळीक निर्माण केली. या शिक्षकाने महिलेचा पती घरी नसल्याची आणि ती घरात एकटीच असल्याची संधी साधत, तिचे आंघोळ करतानाचे फोटो काढले. हे फोटो व्हायरल करण्याची धमकी देत शिक्षकाने महिलेवर बलात्कार केला.
या घटनेने जिल्ह्यात खळबळ माजली आहे. या प्रकरणी हिंगोली ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी शिक्षक पसार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
पुण्यात शिकवणीसाठी घरी येणार्या शिक्षिकेचं बाथरुममध्ये मोबाईल लपवून चित्रीकरण
शिकवणीसाठी घरी येणार्या शिक्षिकेचं बाथरुममधे मोबाईल लपवून 16 वर्षाच्या मुलाने चित्रीकरण केल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात घडला. हा मुलगा सध्या दहावीत शिकत असून त्याच्या आई वडिलांनी त्याच्यासाठी मागील पाच वर्षांपासून इंग्रजी विषयाची खाजगी शिकवणी लावली होती. मुलगा 10-11 वर्षाचा असल्यापासून संबंधित शिक्षिका या मुलाला इंग्रजी शिकवते. त्यासाठी ही शिक्षिका कोथरुडमधील त्याच्या घरी त्याला शिकवायला जात होती. काल ही शिक्षिका त्याच्या घरातील बाथरुमचा वापर करण्यासाठी गेली असता तिला आतमधील साबणाच्या खोक्याच्या मागे काहीतरी चमकताना दिसलं. साबणाचे खोके बाजूला केलं असता त्या पाठीमागे मोबाईल लपवला असल्याचं आणि त्यामध्ये व्हिडीओ रेकॉर्डिंग होत असल्याचे तिला आढळून आलं. यानंतर शिक्षिकेने पुण्यातील अलंकार पोलीस ठाण्यात 16 वर्षांच्या अल्पवयीन मुलाविरुद्ध तक्रार दिली.
हे ही वाचा