एक्स्प्लोर

Goa Airport : बॅगमध्ये 28 आयफोन आणि पँटमध्ये सुमारे 4 कोटींचं सोनं, दुबईहून तस्करी करणाऱ्या तीन जणांना अटक जप्त; मोपा विमानतळावर मोठी कारवाई

Goa iPhone and Gold Seized Airport : गोव्यातील मोपा विमानतळावरून 28 आयफोन आणि सुमारे चोर कोटींचं सोनं जप्त केलं आहे.

Goa Mopa Airport : गोवा विमानतळावर (Goa Airport) सोने तस्करी (Gold Smuggling) विरोधात मोठी कारवाई करण्यात आली आहे. गोव्यातील मोपा विमानतळ (Goa Mopa Airport) येथे 28 आयफोन (iPhone Seized) आणि सुमारे चार कोटींचं सोनं (Gold Seized) जप्त करण्यात आलं आहे. डीआरआय गोवा विभागाने गोव्याच्या मोपा येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमातळावर तस्करीप्रकरणी मोठी कारवाई केली आहे. याप्रकरणी तीन प्रवाशांना अटक करण्यात आली आहे. या प्रवाशांच्या बॅगमध्ये आयफोन आणि सोनं आढळून आल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. 

28 आयफोन आणि सुमारे 4 कोटींचं सोनं जप्त

गोव्यातील मोपा येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमातळावर डीआरआय गोवा विभागाच्या अधिकाऱ्यांनी तस्करीप्रकरणी मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत तीन प्रवाशांकडून 3 कोटी 92 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. अबुधाबीहून गोव्यातील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आलेल्या एका विमानातील तीन प्रवाशांची तपासणी केली. या तपासणी दरम्यान डीआरआय अधिकाऱ्यांना चेक-इन केलेल्या बॅगमध्ये एका पॅकेटमध्ये आयफोन गुंडाळलेले सापडले. तर सोन्याची पेस्ट एका प्रवाशाच्या कमरेकडे लपवून ठेवली होती.

तीन प्रवाशांना अटक, पुढील चौकशी सुरु

तीनही प्रवाशांना बेकायदेशीररित्या सात किलो सोन्याची पेस्ट आणि आयफोनची तस्करीकेल्याप्रकरणी अटक करण्यात आली. तसेच हा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. मुंबई आणि दुबई दरम्यान कार्यरत असलेल्या सोन्याच्या तस्करी रॅकेटचा भाग असल्याचा डीआरआयला संशय असल्याने त्यांची करून चौकशी केली जात आहे.

87 लाखांच्या सोन्यासह दोघांना अटक

याआधी नागपूर विमानतळावर अशी कारवाई करण्यात आली होती. नागपूर विमानतळावर (Nagpur Airport) सोन्याची तस्करी करण्याचा प्रकार समोर आला आहे. कस्टम विभागानं नागपूर विमानतळावर कतारवरुन आलेल्या दोन जणांना अटक केली आहे. त्यांच्याकडून 87 लाखांचं सोनं जप्त करण्यात आलं आहे. मोहम्मद शाहिद आणि पीरबाबा सौदागर अशी अटक केलेल्या दोघांची नावं आहेत. हे दोघेही कर्नाटकचे रहिवासी आहेत.

असा झाला तस्करीचा भांडाफोड

डीआरआय गोवा विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, मोपा विमानतळावरून तस्करी होणार असल्याची माहिती गुप्त माहिती सुत्रांकडून मिळाली होती. त्यानंतर केंद्रीय महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (डीआरआय) अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली आहे. तिघे आरोपी अबूधाबीहून गोवा प्रवास करत होते. या आरोपींच्या बॅगमध्ये आयफोन गुंडाळलेले होते, त्याशिवाय कपड्यांमध्ये कमरेकडे सोन्याची पेस्ट लपवून ठेवली होती. 

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Nagpur : सोने तस्करीसाठी अनोखी शक्कल, कॉफी मेकर मशिनमधून आणले दोन कोटी रुपयांचे सोने

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar : आता कुणी दम दिला तर मला कळवा, तुमच्यासह त्यांच्या घरी येतो, मग चेअरमन असो की कोणी असो, शरद पवारांचा थेट इशारा
मला या रस्त्यानं जायचं नाही, माणसं आपली आहेत, त्यांना कुणीतरी दम दिला असेल, त्यांना एक सांगणं.. : शरद पवार
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vidhan Sabha Election : राज्यात 157 बंडखोर रिंगणात, पक्षांकडून बंडखोरांवर धडक कारवाईKolhapur Vidhan Sabha Election : कोल्हापुरातली नामुष्की काँग्रेस कशी पुसून टाकणार? Special ReportSharad Pawar Retirement : पवारांचे पुन्हा निवृत्तीचे संकेत, बारामतीकरांसमोर सहानुभूती कार्डचा वापर?Vidhan sabha Superfast :  महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज : 5 नोव्हेंबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar : आता कुणी दम दिला तर मला कळवा, तुमच्यासह त्यांच्या घरी येतो, मग चेअरमन असो की कोणी असो, शरद पवारांचा थेट इशारा
मला या रस्त्यानं जायचं नाही, माणसं आपली आहेत, त्यांना कुणीतरी दम दिला असेल, त्यांना एक सांगणं.. : शरद पवार
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
Embed widget