एक्स्प्लोर

Gauri Garje Palve Death Case: गौरी पालवे प्रकरणी व्हॉइस रेकॉर्डिंग संदर्भात धक्कादायक खुलासा; एसआयटीकडून चार्जशीटही दाखल

Gauri Garje Palve Death Case: महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरलेल्या डॉ. गौरी पालवे आत्महत्याप्रकरणी एसआयटीने अखेर न्यायालयात चार्जशीट दाखल केली आहे.

Gauri Garje Palve Death Case: महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरलेल्या डॉ. गौरी पालवे आत्महत्याप्रकरणी (Gauri Garje Palve Death Case) एसआयटीने अखेर न्यायालयात चार्जशीट दाखल केली आहे. या चार्जशीटमध्ये मंत्री पंकजा मुंडे यांचे माजी पीए अनंत गर्जे याला मुख्य आरोपी ठरवण्यात आले आहे. तपासात अनंत गर्जे केवळ पत्नीचा शारीरिक व मानसिक छळ करत नव्हता, तर तिची सामाजिक बदनामी करण्याची धमकी देत तिला आत्महत्येच्या उंबरठ्यावर नेल्याचा आरोप केला आहे. घटनास्थळावरून पोलिसांनी एक काळी डायरी जप्त करण्यात आली असून, त्यामध्ये डॉ. गौरी पालवे (Gauri Palve) यांनी आपल्या आयुष्यातील वेदना, मानसिक तणाव आणि पतीकडून होणाऱ्या छळाची सविस्तर नोंद केली होती. डिसेंबर 2024चा लॅपटॉप जप्त करण्यात आला असून, त्यामध्ये अनेक डिजिटल पुरावे सापडले आहेत.

व्हॉइस रेकॉर्डिंग संदर्भात सर्वात धक्कादायक खुलासा- (Gauri Garje Palve Death Case)

तपासातील सर्वात धक्कादायक खुलासा व्हॉइस रेकॉर्डिंग्स संदर्भात झाला आहे. 22 नोव्हेंबर 2025 रोजी, घटनेच्या दिवशी, अनंत गर्जे याने मुद्दाम स्वतः आणि गौरी यांच्यातील वादाचे रेकॉर्डिंग केले. या ऑडिओ क्लिपमध्ये तो वारंवार गौरीला “तू मर” असे म्हणताना स्पष्ट ऐकू येत असल्याचे चार्जशिटमध्ये म्हटल्याची सूत्रांची माहिती आहे. या रेकॉर्डिंग्स समाजात व नातेवाईकांमध्ये पसरवून गौरीची प्रतिमा खराब करण्याची धमकी अनंत देत होता. या सततच्या मानसिक दबावामुळेच डॉ. गौरी यांनी आत्महत्येचा टोकाचा निर्णय घेतल्याचे SIT चे म्हणणे आहे.

डॉ. गौरी यांनी प्रणिता अस्वले हिला एकाच वेळी 17 व्हॉइस क्लिप्स पाठवल्या- (Gauri Garje Palve Death Case)

मृत्यूपूर्वी डॉ. गौरी यांनी आपली मैत्रीण डॉ. प्रणिता अस्वले हिला एकाच वेळी 17 व्हॉइस क्लिप्स पाठवल्या होत्या. या क्लिप्समध्ये त्यांनी अनंतकडून होत असलेल्या शारीरिक व मानसिक छळाची संपूर्ण कहाणी सांगितली होती. चार्जशीटमध्ये 22 नोव्हेंबर 2025 च्या दुपारच्या हालचालींचा सविस्तर उल्लेख आहे दुपारी 03:02 वाजता CCTV फुटेजनुसार डॉ. गौरी ‘बे-लीफ सैलून’ मध्ये गेल्या होत्या आणि 03:19 वाजता बाहेर पडल्या. त्या दिवशी सैलूनच्या रजिस्टरमध्ये कोणतीही नोंद नव्हती. (शेवटची नोंद 9 नोव्हेंबरची). त्यामुळे पोलिसांचा संशय बळावला. मात्र तांत्रिक तपासणी आणि जवळील ‘स्किन स्पेशालिस्ट क्लिनिक’च्या कॅमेऱ्यांमुळे गौरींची उपस्थिती निश्चित झाली.

डॉ. गौरी यांच्या मृत्यूचं कारणही समोर- (Gauri Garje Palve Death Case)

डॉ. गौरी यांच्या पोस्टमार्टम रिपोर्टनुसार, मृत्यू पोस्टमार्टमच्या 12 ते 24 तास आधी झाला होता. मृत्यूचे कारण “Asphyxia following Hanging” (फाशी घेतल्याने झाला) असे नमूद करण्यात आले असून, SIT ने ही घटना अप्राकृतिक मृत्यू म्हणून नोंदवली आहे. या प्रकरणात SIT ने अनंत गर्जे (पती) याच्याविरुद्ध ठोस पुरावे मिळाल्याने त्यालाच मुख्य आरोपी करण्यात आले आहे. शीतल आंधले (नणंद) व अजय गर्जे (देवर) यांच्याविरुद्ध छळाचे पुरेसे पुरावे न आढळल्याने त्यांना चार्जशीटमधून वगळत क्लीनचिट देण्यात आली आहे. अनंत गर्जे याने आपल्या पूर्वीच्या संबंधांची माहिती लपवून विश्वासघात केला, सतत “तू मर” असे शब्द वापरले, तसेच ऑडिओ क्लिप्सच्या माध्यमातून ब्लॅकमेल करून डॉ. गौरी पालवे यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याचं चार्जशीटमध्ये स्पष्ट नमूद करण्यात आले आहे.  

नेमकं प्रकरण काय? (Gauri Garje Palve Death Case)

भाजप नेत्या आणि मंत्री पंकजा मुंडे यांचे स्वीय सहाय्यक अनंत गर्जे याच्या पत्नीने डॉक्टर गौरी पालवे गर्जे (Gauri Garje Palve Death Case) यांनी आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. त्यांनी मुंबईतील वरळी परिसरातील आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन जीवन संपवलं. आत्महत्येची ही घटना समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली. या प्रकरणी पोलिसांनी पती अनंत गर्जे याच्यासह दीर आणि नणंदेवर गुन्हा दाखल केला असून अनंत गर्जेला अटकही केली आहे. या प्रकरणी सखोल तपास व्हावा, आमच्या मुलीची आत्महत्या नसून तिची हत्या झाल्याचा दावा पालवे कुटूंबाने केला आहे. तर या प्रकरणाच्या तपासात अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत.(Gauri Garje Palve Death Case) 

संबंधित बातमी:

Gauri Garje Palve Death Case: पंकजा मुंडेंचे पीए अनंत गर्जेंच्या अडचणी वाढणार? ऑडिओ क्लिपमध्ये गर्जे यांनी पत्नीला मारहाण केल्याची कबुली, जुन्या प्रेमप्रकरणांबाबतचाही उल्लेख, नेमकं प्रकरण काय?

महत्त्वाच्या बातम्या

Nashik : मुलाने-व्याह्याने छळले, मालमत्तेसाठी त्रास दिला; RTO अधिकाऱ्याच्या प्रकरणाला वेगळं वळण, पत्नीने हकीकत सांगितली
मुलाने-व्याह्याने छळले, मालमत्तेसाठी त्रास दिला; RTO अधिकाऱ्याच्या प्रकरणाला वेगळं वळण, पत्नीने हकीकत सांगितली
Pune Crime News: कारच्या वादातून तरुणाचं अपहरण; हॉटेलमधून जबरदस्तीने नेलं, रिव्हॉल्वरचा धाक दाखवला, बेदम मारहाण अन्..., पुण्यातील थरारक घटना
कारच्या वादातून तरुणाचं अपहरण; हॉटेलमधून जबरदस्तीने नेलं, रिव्हॉल्वरचा धाक दाखवला, बेदम मारहाण अन्..., पुण्यातील थरारक घटना
Buldhana Crime: चक्क शेतातील गोठ्यात गर्भलिंग निदान चाचणी; बोगस डॉक्टरसह तिघांना पकडलं रंगेहात, बुलढाण्यासह वाशिममधील अनेक डॉक्टर्स पीसीपीएनडीटी पथकाच्या रडारवर
चक्क शेतातील गोठ्यात गर्भलिंग निदान चाचणी; बोगस डॉक्टरसह तिघांना पकडलं रंगेहात, बुलढाण्यासह वाशिममधील अनेक डॉक्टर्स पीसीपीएनडीटी पथकाच्या रडारवर
Pune FDA Action: पुण्यातील आठ हॉटेलांचे परवाने एफडीएकडून निलंबित; अस्वच्छता, कीटकांचा प्रादुर्भाव, बुरशी अन् मुदतबाह्य पदार्थ सापडले, कोणकोणत्या हॉटेल्सचा समावेश?
पुण्यातील आठ हॉटेलांचे परवाने एफडीएकडून निलंबित; अस्वच्छता, कीटकांचा प्रादुर्भाव, बुरशी अन् मुदतबाह्य पदार्थ सापडले, कोणकोणत्या हॉटेल्सचा समावेश?

व्हिडीओ

Mann Suddha Tujha Season 3 : नात्यातला दुरावा | मन सुद्ध तुझं | Episode 7 | ABP Majha
Solapur Drought Farmer Special Report : सोलापुरातील दुष्काळाची दाहकता, शेतकऱ्यांचा जीवघेणा संघर्ष
Shruti Sadolikar Katkar Majha Katta : शास्त्रीय संगीताचं चालतं बोलतं विद्यापीठ, श्रृती सडोलीकरांशी गप्पा | ABP Majha
Ratnagiri Water Shortage : कोकणातील पाणीटंचाईवर श्रमदानातून मात! Special Report
Kolhapur Milk Price Hike : गोकुळ आणि वारणा दूध संघाकडून दुधाच्या विक्री दरात वाढ Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Night Shift Heart Health Risk : नाईट शिफ्ट करणाऱ्यांनो सावधान! रात्रीच्या जागरणामुळे होतोय थेट हृदयावर परिणाम; नव्या रिसर्चमधून धक्कादायक खुलासा
नाईट शिफ्ट करणाऱ्यांनो सावधान! रात्रीच्या जागरणामुळे होतोय थेट हृदयावर परिणाम; नव्या रिसर्चमधून धक्कादायक खुलासा
Sujay Vikhe Patil : शेजाऱ्याचं कुंपण काढायला मदत नाही अन् देशाला शहाणपण शिकवायला निघालाय; सुजय विखेंचा अभिजीत दिपकेंवर जोरदार हल्लाबोल
शेजाऱ्याचं कुंपण काढायला मदत नाही अन् देशाला शहाणपण शिकवायला निघालाय; सुजय विखेंचा अभिजीत दिपकेंवर जोरदार हल्लाबोल
PM Modi Speech :
"1,000 वर्षांच्या गुलामगिरीनंतर पहिल्यांदाच 50 कोटी लोक गरिबीतून बाहेर"; गुजरातमधील भाजप कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात पंतप्रधान मोदींचा दावा
भाजपच्या कार्यक्रमात तुम्ही व्यासपीठावर का आलात? जिल्हाध्यक्षाचा थेट शिवसेनेच्या आमदाराला सवाल, पालघरमध्ये महायुतीत ठिणगी
भाजपच्या कार्यक्रमात तुम्ही व्यासपीठावर का आलात? जिल्हाध्यक्षाचा थेट शिवसेनेच्या आमदाराला सवाल, पालघरमध्ये महायुतीत ठिणगी
Ajinkya Rahane : आंतरराष्ट्रीय मैदानातला बुम ते थेट लेकीच्या शाळेतला माईक; अजिंक्य रहाणे प्रसन्नतेच्या गावात, चिमुकल्यांशी संवाद
आंतरराष्ट्रीय मैदानातला बुम ते थेट लेकीच्या शाळेतला माईक; अजिंक्य रहाणे प्रसन्नतेच्या गावात, चिमुकल्यांशी संवाद
शरद पवारांच्या गोविंद बागेत AI तंत्रज्ञानाचा कमाल वापर; एकरी 120 टन ऊसाचे उत्पादन, तब्बल दुप्पटीनं वाढ
शरद पवारांच्या गोविंद बागेत AI तंत्रज्ञानाचा कमाल वापर; एकरी 120 टन ऊसाचे उत्पादन, तब्बल दुप्पटीनं वाढ
निसर्गाचा दणका, बळीराजाला मोठा फटका, अकवान चक्रवादळामुळं भात उत्पादक संकटात, हातातोंडाशी आलेला घास वाया जाण्याच्या मार्गावर
निसर्गाचा दणका, बळीराजाला मोठा फटका, अकवान चक्रवादळामुळं भात उत्पादक संकटात, हातातोंडाशी आलेला घास वाया जाण्याच्या मार्गावर
मुख्यमंत्री होण्याची इच्छा आहे का? पुण्यातील कार्यक्रमानंतर सवाल; तुकाराम मुंढेंचं उत्तर, म्हणाले हा केवळ विश लिस्टचा भाग
मुख्यमंत्री होण्याची इच्छा आहे का? पुण्यातील कार्यक्रमानंतर सवाल; तुकाराम मुंढेंचं उत्तर, म्हणाले हा केवळ विश लिस्टचा भाग
Embed widget