एक्स्प्लोर

Gauri Garje Palve Death Case: पंकजा मुंडेंचे पीए अनंत गर्जेंच्या अडचणी वाढणार? ऑडिओ क्लिपमध्ये गर्जे यांनी पत्नीला मारहाण केल्याची कबुली, जुन्या प्रेमप्रकरणांबाबतचाही उल्लेख, नेमकं प्रकरण काय?

Gauri Garje Palve Death Case: पती-पत्नीमध्ये सतत होणाऱ्या वादातून मानसिक तणाव वाढत गेला आणि त्यातूनच पत्नीने घरातच गळफास घेऊन टोकाचे पाऊल उचलल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

मुंबई : राज्याच्या मंत्री पंकजा मुंडे यांच्या सहायक (पीए) अनंत गर्जे यांच्या पत्नीच्या (Gauri Garje Palve Death Case) आत्महत्येप्रकरणी वरळी पोलिसांनी तब्बल ११०० पानांचे विस्तृत आरोपपत्र दाखल केले आहे. या प्रकरणात आरोपी अनंत गर्जे यांना यापूर्वी अटक करण्यात आली होती. मात्र सध्या ते जामिनावर बाहेर असून, या संपूर्ण प्रकरणाची सुनावणी मुंबई सत्र न्यायालयात सुरू आहे. वरळी पोलिसांच्या तपासानुसार, कौटुंबिक वाद हे या आत्महत्येमागील (Gauri Garje Palve Death Case) मुख्य कारण ठरले आहे. पती-पत्नीमध्ये सतत होणाऱ्या वादातून मानसिक तणाव वाढत गेला आणि त्यातूनच पत्नीने घरातच गळफास घेऊन टोकाचे पाऊल उचलल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या घटनेनंतर संपूर्ण प्रकरणाने राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडवली होती.(Gauri Garje Palve Death Case)

दाखल करण्यात आलेल्या आरोपपत्रात तज्ज्ञ डॉक्टरांचा वैद्यकीय अहवाल, मृत महिलेच्या कुटुंबीयांचे जबाब, तसेच घटनास्थळी करण्यात आलेल्या तपासाची सविस्तर माहिती समाविष्ट करण्यात आली आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. पोलिसांनी तपासादरम्यान सर्व बाजूंनी पुरावे गोळा करत, प्रकरण अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न केल्याचेही समोर आले आहे. या प्रकरणातील एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे अनंत गर्जे यांचा मोबाईल फोन हा मोबाईल न्यायवैद्यक प्रयोगशाळेकडे (FSL) तपासणीसाठी पाठवण्यात आला होता. तपासणी दरम्यान मोबाईलमधून काही ऑडिओ क्लिप्स पोलिसांच्या हाती लागल्या असून, त्या आता न्यायालयासमोर सादर करण्यात आल्या आहेत.(Gauri Garje Palve Death Case)

या ऑडिओ क्लिप्समध्ये अनंत गर्जे आणि त्यांच्या पत्नीमधील संभाषण असल्याचे स्पष्ट होते. विशेष म्हणजे, एका ऑडिओ क्लिपमध्ये गर्जे यांनी पत्नीला मारहाण केल्याची कबुली दिल्याचे समोर आले आहे. यातून काही ऑडिओ क्लिप ज्यात गर्जे यांचं त्यांच्या पत्नीशी संवादात संभाषण आहे ते न्यायालयासमोर आणलं आहे. यात एका ऑडिओ क्लिपमध्ये अनंत गर्जेंनी पत्नीला मारहाण केल्याचे कबूल केले आहे, तसेच जुन्या प्रेमप्रकरणे बद्दल घरच्यांचा काही सांगितल्यास आत्महत्या करण्याची धमकी देत असल्याचे समोर आले आहे, मुंबई सत्र न्यायालयात या प्रकरणी सुनावणी सुरू आहे. पुढील सुनावणीदरम्यान न्यायालय कोणती भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.(Gauri Garje Palve Death Case)

नेमकं प्रकरण काय?

भाजप नेत्या आणि मंत्री पंकजा मुंडे यांचे स्वीय सहाय्यक अनंत गर्जे याच्या पत्नीने डॉक्टर गौरी पालवे गर्जे (Gauri Garje Palve Death Case) यांनी आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. त्यांनी मुंबईतील वरळी परिसरातील आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन जीवन संपवलं. आत्महत्येची (Gauri Garje Palve Death Case) ही घटना समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली. या प्रकरणी पोलिसांनी पती अनंत गर्जे याच्यासह दीर आणि नणंदेवर गुन्हा दाखल केला असून अनंत गर्जेला (Gauri Garje Palve Death Case) अटकही केली आहे. या प्रकरणी सखोल तपास व्हावा, आमच्या मुलीची आत्महत्या नसून तिची हत्या झाल्याचा दावा पालवे कुटूंबाने केला आहे. तर या प्रकरणाच्या तपासात अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत.(Gauri Garje Palve Death Case) 

About the author सुरज सावंत

सुरज सावंत हे जवळपास 10 वर्षांपासून माध्यमात कार्यरत आहेत. राजकारण, क्राईम यावर त्यांचा विशेष पकड आहे.
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ritu Tawde: मुंबईच्या महापौर रितू तावडेंचं गुजरातच्या मुख्यमंत्र्यांना पत्र; भूपेंद्रभाई पटेलांकडे केली मोठी मागणी
मुंबईच्या महापौर रितू तावडेंचं गुजरातच्या मुख्यमंत्र्यांना पत्र; भूपेंद्रभाई पटेलांकडे केली मोठी मागणी
BJP Working Committee: राज्यसभा निवडणुकीच्या धामधुमीत भाजपकडून कार्यकारिणीची घोषणा, उज्ज्वल निकमांच्या मुलावर मोठी जबाबदारी
भाजपकडून मुंबई प्रदेश कार्यकारिणीची घोषणा, उज्ज्वल निकमांच्या मुलावर मोठी जबाबदारी
Rajya Sabha Election 2026 Maharashtra Candidate Full List: भाजप, शिवसेना, ठाकरे गटपासून दोन्ही राष्ट्रवादीपर्यंत...राज्यसभेसाठी महाराष्ट्रातून कुणाला उमेदवारी?, पाहा संपूर्ण यादी...
भाजप, शिवसेना, ठाकरे गटपासून दोन्ही राष्ट्रवादीपर्यंत...राज्यसभेसाठी महाराष्ट्रातून कुणाला उमेदवारी?, पाहा संपूर्ण यादी...
Rajya Sabha Election 2026 Jyoti Waghmare: एकनाथ शिंदेंचा मास्टरस्ट्रोक, आंबेडकरी चळवळीतील आक्रमक चेहऱ्याला शिवसेनेकडून राज्यसभा निवडणुकीसाठी संधी, कोण आहेत ज्योती वाघमारे?
एकनाथ शिंदेंचा मास्टरस्ट्रोक, आंबेडकरी चळवळीतील आक्रमक चेहऱ्याला राज्यसभा निवडणुकीसाठी संधी, कोण आहेत ज्योती वाघमारे?
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Sanjay Raut Mumbai PC : गणित जमत नसल्यानं प्रियंका चतुर्वेदी राज्यसभेपासून दूर - संजय राऊत
Special Report Iran vs America : ब्रिटनच्या वेगळ्या भूमिकेवरुनही ट्रम्प यांचा संताप
Special Report Raj Thackeray - Uddhav Thackeray : मनसे-ठाकरेसेनेतील नाराजीवर तोडगा निघाला?
Special Report Rajya Sabha : राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपच्या उमेदवारांची घोषणा
Jalgaon Banana : केळीचे दर 2.500 रुपयांवरुन 1500 रुपयांवर, युद्धाचा उत्पादकांना फटका

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nitish Kumar: नितीशकुमारांच्या बिहारी राजकारणाच्या पर्वाचा अखेर शेवट; राज्यसभेत दुसरी इनिंग सुरु करणार! नवा मुख्यमंत्री भाजपचा की जेडीयूचा होणार?
नितीशकुमारांच्या बिहारी राजकारणाच्या पर्वाचा अखेर शेवट; राज्यसभेत दुसरी इनिंग सुरु करणार! नवा मुख्यमंत्री भाजपचा की जेडीयूचा होणार?
Rajya Sabha Election 2026 Shivsena Shinde Group Candidate: राज्यसभेच्या तिकिटासाठी तेंडुलकरच्या लग्नमंडपातून धावपळ; शिंदेंच्या कारच्या मागे शायना एनसी धावत सुटल्या, नेमकं काय घडलं?, VIDEO
राज्यसभेच्या तिकिटासाठी तेंडुलकरच्या लग्नमंडपातून धावपळ; शिंदेंच्या कारच्या मागे शायना एनसी धावत सुटल्या, नेमकं काय घडलं?, VIDEO
Rajya Sabha Election 2026 Jyoti Waghmare: एकनाथ शिंदेंचा मास्टरस्ट्रोक, आंबेडकरी चळवळीतील आक्रमक चेहऱ्याला शिवसेनेकडून राज्यसभा निवडणुकीसाठी संधी, कोण आहेत ज्योती वाघमारे?
एकनाथ शिंदेंचा मास्टरस्ट्रोक, आंबेडकरी चळवळीतील आक्रमक चेहऱ्याला राज्यसभा निवडणुकीसाठी संधी, कोण आहेत ज्योती वाघमारे?
अमेरिका इस्त्रायलच्या इराण हल्ल्याचे 100 तास; एक हजारांवर मृत्यूमुखी, 17 इराणी जहाजे बुडाली; 9 देशातील 14 अमेरिकन लष्करी तळ उद्ध्वस्त, भारताच्या हद्दीतही अमेरिकेची थेट घुसखोरी
अमेरिका इस्त्रायलच्या इराण हल्ल्याचे 100 तास; एक हजारांवर मृत्यूमुखी, 17 इराणी जहाजे बुडाली; 9 देशातील 14 अमेरिकन लष्करी तळ उद्ध्वस्त, भारताच्या हद्दीतही अमेरिकेची थेट घुसखोरी
BJP Working Committee: राज्यसभा निवडणुकीच्या धामधुमीत भाजपकडून कार्यकारिणीची घोषणा, उज्ज्वल निकमांच्या मुलावर मोठी जबाबदारी
भाजपकडून मुंबई प्रदेश कार्यकारिणीची घोषणा, उज्ज्वल निकमांच्या मुलावर मोठी जबाबदारी
बिहारमधील नितीशपर्व संपल्यात जमा! राज्यसभेला आज अर्ज दाखल करण्याची शक्यता, अमित शाह आजच पाटण्यात येणार; कार्यकर्त्याचा सीएम निवासस्थानासमोर आक्रोश, 'म्हणाले, ही गद्दारी, हा निर्णय त्यांचा नाही...'
बिहारमधील नितीशपर्व संपल्यात जमा! राज्यसभेला आज अर्ज दाखल करण्याची शक्यता, अमित शाह आजच पाटण्यात येणार; कार्यकर्त्याचा सीएम निवासस्थानासमोर आक्रोश, 'म्हणाले, ही गद्दारी, हा निर्णय त्यांचा नाही...'
Sharad Ponkshe On Kerala Story 2: 'प्रत्येक हिंदू माणसानं...', 'द केरला स्टोरी 2' सिनेमाबाबत शरद पोंक्षेंनी स्पष्टच सांगितलं, हिंदी सिनेस्टार्सनाही सुनावलं
'प्रत्येक हिंदू माणसानं...', 'द केरला स्टोरी 2' सिनेमाबाबत शरद पोंक्षेंनी स्पष्टच सांगितलं, हिंदी सिनेस्टार्सनाही सुनावलं
Pune Crime News: पुण्यात लेकीची छेड काढणाऱ्या विद्यार्थ्याला बापाने लोळवून लोळवून मारलं, हुल्लडबाजाला बेदम चोप
पुण्यात लेकीची छेड काढणाऱ्या विद्यार्थ्याला बापाने लोळवून लोळवून मारलं, हुल्लडबाजाला बेदम चोप
Embed widget