मोठी बातमी! भर रस्त्यात अश्लील चाळे भोवले, माफीनामा, शरणागतीनंतर गौरव अहुजाला कराड पोलिसांंकडून अटक
आता अखेर कराडच्या डीवायएसपी पथकाने गौरव अहुजाचं माजाचं विमान खाली उतरवलंय.

Pune Crime Update: पुण्यात भर रस्त्यात अश्लील चाळे करणाऱ्या गौरव अहुजाला शनिवारी(8 मार्च) रात्री कराड पोलिसांनी अटक केलीय. शनिवारी पुण्याच्या गजबजलेल्या शास्त्रीनगर चौकात रस्त्याच्या मधोमध BMW गाडी थांबवत गौरव अहुजा नावाच्या तरुणाने अश्लील प्रकार केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. या व्हिडिओ नंतर पुण्यासह सगळीकडून या घटनेचा संताप व्यक्त केला जात होता. काल रात्री आपल्या कृत्याचा खेद वाटतो. आपण चुकलो असं म्हणत गौरव अहुजा कराड पोलिसांना शरण गेला होता. आता अखेर कराडच्या डीवायएसपी पथकाने गौरव अहुजाचं माजाचं विमान खाली उतरवलंय. (Gaurav Ahuja Arrest)
भरचौकात लघूशंका करत अश्लील कृत्य
श्रीमंतीचा माज दाखवत सिग्नलवर गाडी रस्त्याच्या मधोमध उभी करून भर चौकात लघुशंका केल्याचे विकृत दृश्य कॅमेरात कैद झाले होते . MH 12 RF 8419 या क्रमांकाच्या BMW गाडीतून आलेल्या गौरवणे कायद्याचे नियम तर धाब्यावर बसवलेच .पण अश्लील कृत्य करत मित्रासोबत वेगात गाडीतून फरार झाला होता . पुण्यातील विमानतळ पोलिस ठाण्यात 2021 साली गौरव अहुजावर जुगार आणि अपहरणाचा देखील गुन्हा दाखल आहे .क्रिकेटवर बेटिंग घेणाऱ्या टोळीचा देखील गौरव सदस्य आहे. .कराड पोलिसांना शरण येत गौरव अहुजाने पुणेकरांची तसेच पुणे पोलिसांची आणि शिंदे साहेबांची माफी मागतो असा माफीनामाही दिला .आपल्या कृत्याचा खेद वाटतोय आपण चुकलो असल्याचं सांगत गौरव अहुजा सातारा जिल्ह्यात कराड पोलिसांना शरण गेला .त्यानंतर त्याला अटक करण्यात आली .विशेष म्हणजे गौरव अहुजाने याआधीही असाच एक व्हिडिओ शेअर केला होता .त्यात आपल्या कुटुंबीयांना त्रास देऊ नये असा आवाहन केलं होतं .
दारू प्यायले होते की नाही याची तपासणी होणार
गौरव अहुजा आणि त्याच्यासोबत असलेल्या भाग्येश निबजीया या मित्रावर येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सार्वजनिक ठिकाणी उपद्रव, अश्लील आणि अश्लाघ्य वर्तन, रहदारीस अडथळा निर्माण करणे, अशा कलमांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. घटनेवेळी काढण्यात आलेल्या व्हिडिओमध्ये बीअरची बाटली दिसत आहे. त्यामुळे गाडीतील दोनही तरुणांनी मद्यप्रशान केले होते की नाही याचीही तपासणी करण्यात येणार आहे. पुण्यामध्ये मद्यधुंद अवस्थेमध्ये तरुणांनी अश्लील चाळे केले, सिग्नलवरती रस्त्याच्या मधोमध आपली बीएमडब्लू गाडी उभी करून, बाहेर येत रस्त्यावर लघुशंका केली, त्यानंतर एकाने त्या तरूणाला जाब विचारल्यानंतर त्याने पुन्हा एकदा अश्लील चाळे केले आणि भरधाव वेगात आपली कार पळवली. ही संतापजनक घटना समोर आल्याने मोठी खळबळ उडाली होती..
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

