एक्स्प्लोर

Solapur News : ऐन गणेशोत्सवात मश्रूम गणपती मंदिराच्या सोन्याचा कळस चोरीला, कळस दुसऱ्यांदा चोरीला गेल्याने भाविक संतप्त

Solapur News : ऐन गणेशोत्सवाच्या काळात सोलापुरातील प्रसिद्ध मश्रूम गणपतीच्या सोन्याचा कळस पुन्हा एकदा चोरीला गेला आहे. यापूर्वी 2017 साली देखील मश्रूम गणपतीच्या मंदिरावरील कळस चोरीला गेला होता. 

Solapur News : एकीकडे राज्यासह देशभरात गणपती बाप्पाचं जल्लोषात आगमन होत आहे. परंतु दुसरीकडे सोलापुरातील (Solapur) प्रसिद्ध मश्रूम गणपती मंदिराचा सोन्याचा कळस पुन्हा एकदा चोरीला गेला आहे. ऐन गणेशोत्सवाच्या (Ganesh Utsav 2022) काळात मध्यरात्री मंदिराचा सोन्याचा कळस चोरीला गेल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. सोन्याचा कळस दुसऱ्यांदा चोरीला गेल्याने भक्तगण संतप्त झाले आहेत. यापूर्वी 2017 साली देखील मश्रूम गणपतीच्या मंदिरावरील कळस चोरीला गेला होता. 

सोलापूर-तुळजापूर महामार्गावरील तळेहिप्परगा गावात मश्रूम गणपतीचे मंदिर आहे. सोलापूरचे ग्रामदैवत श्री. सिद्धरामेश्वरांनी या मश्रूम गणपती स्थापन केला होता. या मंदिरावर सोन्याचा कळस भाविकांच्या योगदानातून गणपतीच्या मंदिरावर हा कळस बसवण्यात आला होता. 25 किलो वजनाच्या कळसावर 28 तोळे सोन्याचा मुलामा चढवला आहे. मश्रूम गणेश मंदिराचे पुजारी संजय किसनराव पतंगे काल (31 ऑगस्ट) पहाटे मंदिरात आल्यावर त्यांना कळस चोरीला गेल्याचं समजलं. यानंतर त्यांनी याची माहिती पोलिसात दिली. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊ पाहणी केली. या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे  

25 किलो वजनाच्या पंचधातूच्या कळसावर 28 तोळे सोन्याचा मुलामा
तक्रारीनुसार, संजय पतंगे हे मश्रूम मंदिराचे पुजारी असून ते देखरेख देखील करतात. 30 ऑगस्टच्या रात्री साडेनऊ वाजता नेहमीप्रमाणे मंदिर बंद करुन ते घरी गेले. पण 31 ऑगस्टच्या मध्यरात्री एक ते साडेतीनच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी श्री मश्रूम गणपती मंदिरावरील स्थापित असलेला अंदाजे 25 किलो वजनाचा पंचधातूचा कळस चोरीला गेला. या कळसावर 28 तोळे सोन्याचा मुलामा चढवला आहे. या कळसाची अंदाजे किंमत 14 लाख रुपये आहे.

2016 मध्येही मंदिराचा कळस चोरीला
याआधी 2016 मध्ये मुसळधार पाऊस सुरु असतानाच आणि वीज पुरवरठा खंडित झालेला असतानाच या मंदिरावरील कळस चोरीला गेला होता. त्यावेळीही मोठी खळबळ सोलापूर जिल्ह्यात माजली होती. मंदिरावरील कळस चोरीला गेल्याने आरोपींना तातडीने अटक करुन कडक कारवाई करा अशी मागणी करण्यात येत आहे. मंदिराबाबत अशा वारंवार घटना घडत असल्याने भाविकांसह नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. दुसऱ्यांदा कळस चोरीला गेल्याने मंदिराच्या सुरक्षिततेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे.

Solapur Mashrum Ganpati Mandir : सोलापुरातील मश्रूम गणपती मंदिराचा सोन्याचा कळस चोरीला

मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेचे शिक्षण घेतलेलं असून एबीपी माझामध्ये मागील 9 वर्षांपासून कार्यरत आहे. मुंबईत assistant प्रोड्यूसर म्हणून काम केल्यानंतर मागील 7 वर्षांपासून सोलापूर जिल्हा प्रतिनिधी पदावर कार्यरत.

Read More

महत्त्वाच्या बातम्या

Gadchiroli Snake Bite Case : सर्पदंशामुळे 3 मुलींचा मृत्यू, माजी खासदार आणि पुत्रासह पाच जणांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
सर्पदंशामुळे 3 मुलींचा मृत्यू, माजी खासदार आणि पुत्रासह पाच जणांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
देवदर्शनाहून परतणाऱ्या भाविकांच्या बोलेरोला अपघात, स्विफ्ट कारची जोरदार धडक; 12 जखमी, 6 गंभीर
देवदर्शनाहून परतणाऱ्या भाविकांच्या बोलेरोला अपघात, स्विफ्ट कारची जोरदार धडक; 12 जखमी, 6 गंभीर

व्हिडीओ

Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sunetra Pawar : महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
Embed widget