वस्तीगृहात मुलींची छेड काढणाऱ्या मद्यधुंद तरुणाला विद्यार्थिनींनी दिला चोप, घटना सीसीटीव्हीत कैद, आरोपी पोलिसांच्या ताब्यात
जालन्यातील (Jalna) परतूर येथील कस्तुरबा गांधी बालिका वस्तीगृहात मुलींची छेड काढणाऱ्या मद्यधुंद तरुणाला विद्यार्थिनींनी आणि सुरक्षारक्षकाने चांगलाच चोप दिला आहे.
Jalna Crime News : जालन्यातील (Jalna) परतूर येथील कस्तुरबा गांधी बालिका वस्तीगृहात मुलींची छेड काढणाऱ्या मद्यधुंद तरुणाला विद्यार्थिनींनी आणि सुरक्षारक्षकाने चांगलाच चोप दिला आहे. सीसीटीव्हीत कैद झालेल्या या घटनेत संशयित आरोपीने संरक्षण भिंतीवर चढून वस्तीगृहात प्रवेश केला होता. यावेळी आरोपीने विद्यार्थिनींची छेड काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, विद्यार्थिनींनी धाडस दाखवत त्याला चांगला चोप देत पोलिसांच्या स्वाधीन केलं आहे.
या घटनेनंतर परतूर येथील कस्तुरबा गांधी बालिका वस्तीगृहातील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यामुळे परतूर तहसीलदारांनी वस्तीगृहात भेट देऊन सुरक्षेचा आढावा घेतला आहे. दरम्यान, एक मद्यधुंद तरुण वसतीगृहात नेमका आला कसा? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. या घटनेमुळं वसतीगृहातील मुलींच्या सुरक्षेसंदर्भात प्रश्न उपस्थित केले जात आहेत. दरम्यान, य मद्यधुद अवस्थेत आलेल्या तरुणाला विद्यार्थीनीनीं चांगलाच मार दिल्याचं पाहायला मिळालं.
महत्वाच्या बातम्या:























