एक्स्प्लोर

Kalyan : कल्याण रेल्वे स्थानकात स्फोटके, 54 डेटोनेटर सापडल्याने एकच खळबळ; पोलिसांचा शोध सुरू

Kalyan railway station : कल्याण रेल्वे स्थानकात स्फोटके सापडल्याने एकच खळबळ उडाली असून पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे तपास सुरू केला आहे. 

ठाणे : कल्याण रेल्वे स्थानकावर (Kalyan railway station) बुधवारी तब्बल 54 डेटोनेटर (Detonators) सापडले. सुदैवानं कुठलाही अनुचित प्रकार घडण्याच्या आतच बॉम्बशोधक पथकानं ही स्फोटकं ताब्यात घेतली. प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वरील सरकत्या जीन्याखाली डेटोनेटरचे बॉक्स ठेवले होते. पोलिसांच्या सतर्कतेमुळे पुढचा अनर्थ टळला. मात्र रेल्वे स्थानकात स्फोटके सापडल्याने खळबळ उडाली आहे.

कल्याण रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक एकवर बुधवारी सकाळी 11.30 वाजता दोन खोक्यांमध्ये भरलेली एकूण 54 स्फोटके (डिटोनेटर्स) कल्याण लोहमार्ग पोलिसांनी जप्त केली.  पोलिसांनी रेल्वे स्थानक परिसरातील सीसीटीव्ही चित्रणाच्या आधारे आरोपींचा शोध सुरू केला आहे.

सफाई कर्मचाऱ्याने पोलिसांना माहिती दिली

कल्याण पश्चिम फलाट क्रमांक 1 वर दोन खोके आहेत, त्यात स्फोटक सदृश्य ज्वलनशील पदार्थ असल्याची माहिती रेल्वे स्थानकातील एका सफाई कामगाराने कल्याण लोहमार्ग पोलिसांना दिली. कल्याण लोहमार्ग विभागाचे उपायुक्त मनोज पाटील, कल्याण परिमंडळाचे पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ, लोहमार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरीनाथ कांदे यांनी तातडीने रेल्वे स्थानकात सहकाऱ्यांसह येऊन खोक्यांची तपासणी करून ते दोन्ही खोके ताब्यात घेतले.

पोलिसांचा सीसीटीव्हीच्या आधारे तपास सुरू

त्यानंतर तातडीने पोलिसांच्या श्वान पथकाला पाचारण करण्यात आले. श्वानाच्या साहाय्याने या खोक्यांची तपासणी करण्यात आली. ही स्फोटके रेल्वे स्थानकात कोणत्या कारणासाठी आणली होती, ती कोणी आणून ठेवली. स्फोटके रेल्वे स्थानकात आणून ठेवण्याचा उद्देश काय होता, अशा विविध अंगांनी पोलिसांच्या विशेष पथकाने तपास सुरू केला आहे.

ही स्फोटके दगड खाणीच्या खदानींमध्ये सुरूंग स्फोटासाठी, विहिरी खोदण्यासाठी वापरली जातात अशा क्षमतेची आहेत. या स्फोटकांचा तातडीने स्फोट होत नाही. ती डिटोनेटर्स जिलेटीन कांड्यांसारखी असतात. त्यांना वात असते. ती स्फोटकांशिवाय स्फोट करत नाहीत. तरीही ही स्फोटके रेल्वे स्थानकात कोणी आणली याचा तपास सुरू आहे असे लोहमार्ग पोलीस ठाण्याचे उपायुक्त मनोज पाटील यांनी सांगितले.

ही स्फोटके खरेदी करून एखादा व्यावसायिक कल्याण रेल्वे स्थानकात येऊन लोकलने प्रवास करण्याच्या विचारात असावा. त्यावेळी पोलीस किंवा अन्य हालचालींमुळे त्याने स्फोटकांचे खोके तेथेच ठेऊन पळ काढला असावा, असाही तर्क पोलिसांकडून काढला जात आहे.

ही बातमी वाचा: 

महत्त्वाच्या बातम्या

Nashik Ashram School : मुले फरशीवर झोपतात, तिथेच अभ्यास, रात्रीच्या अंधारात कपडे धुवावे लागतात; नाशिकच्या आश्रमशाळेची स्थिती, लाखोंचा निधी कुठे जातोय? 
मुले फरशीवर झोपतात, तिथेच अभ्यास, रात्रीच्या अंधारात कपडे धुवावे लागतात; नाशिकच्या आश्रमशाळेची स्थिती, लाखोंचा निधी कुठे जातोय? 
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
Junnar Pimpalwandi Case: सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
मन हेलावणारी दुर्घटना, विजेचा धक्का बसून दोन भावांचा मृत्यू, सुदैवाने आई बचावली; भोईटे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
मन हेलावणारी दुर्घटना, विजेचा धक्का बसून दोन भावांचा मृत्यू, सुदैवाने आई बचावली; भोईटे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर

व्हिडीओ

Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mobile Recharge Price Hike : मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
Ravindra Jadeja : 'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
Dharashiv School : म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
Junnar Pimpalwandi Case: सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
Ind vs Pak Hockey: जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
Embed widget