Dombivli : सर्विस बुक प्राप्त न झाल्याने इन्क्रिमेंट लागली नाही, डोंबिवलीत शिक्षिकेच्या पतीचा मुख्याध्यापकावर धारधार शस्त्राने हल्ला
Dombivli Crime : आरोपीने मुख्याध्यापक भागवत गुरव यांच्या मानेवर, छातीवर धारधार शस्त्राने हल्ला केला असून या हल्ल्यात मुख्याध्यापक गंभीर जखमी झाले आहेत.
ठाणे : सर्विस बुक प्राप्त न झाल्याने इन्क्रिमेंट लागत नाही या कारणावरून डोंबिवलीत (Dombivli) मुख्याध्यापकावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला आहे. त्याच शाळेत शिकवत असलेल्या सहशिक्षिकेच्या पतीने धारदार शस्त्राने मुख्याध्यापकावर हा हल्ला केला. आरोपीला डोंबिवली लोहमार्ग पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
भिवंडी रेल्वे लाईनमधील खारबाब रेल्वे स्टेशनकडे पटरीवरून जात असताना सहशिक्षिका मिनाझ मकानदार यांचे पती शकील शेख याने मुख्यध्यापक भागवत गुरव यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला. यात मुख्याध्यापक गुरव गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्या छातीवर, मानेवर आणि कानावर गंभीर जखमा झाल्या आहेत.
आरोपी शकील यांच्या पत्नी मिनाज मकानदार यांना सर्विस बुक प्राप्त न झाल्याने त्यांची इन्क्रिमेंट लागली नाही. या कारणावरून मुख्याध्यापकावर धारदार शस्त्राने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडल्याने सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे.
जखमी मुख्याध्यापक भागवत गुरव यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर शकील शेख या आरोपीला डोंबिवली रेल्वे पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. डोंबिवली लोहमार्ग पोलिसांनी शिक्षकेच्या पतीवर खुनाचा प्रयत्न करणे, धमकावणे अशा विविध कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे.
ही बातमी वाचा :