एक्स्प्लोर

Dombivli: रेकी करुन घरफोड्या करणारे दोन सराईत चोर अटकेत; चोरीच्या पैशांतून बारबालांवर करायचे उधळपट्टी

Dombivli Crime: डान्स बारमधील बारबालांवर पैसे उडवण्यासाठी जवळ पैसे हवे, यासाठी रेकी करुन घरफोड्या करणाऱ्या दोघांना मानपाडा पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

Dombivli Crime: रेकी करून घरफोड्या करणाऱ्या दोन सराईत चोरांना गजाआड करण्यात मानपाडा पोलिसांना यश आलं आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने पोलिसांनी चोरांना अटक केली आहे. खळबळजनक बाब म्हणजे हे चोर चोरी केलेल्या पैशांतून डान्स बारमधील (Dance Bar) बारबालांवर उधळपट्टी करत असल्याचं समोर आलं आहे. अटक करण्यात आलेल्या दोन्ही सराईत चोरट्यांनी आतापर्यंत 18 घरफोड्या केल्याची कबुली दिली असून त्यांच्याकडून लाखोंचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. 

यापूर्वीही या दोघांना 34 घरफोड्या केल्याप्रकरणी अटक करण्यात आल्याचं पोलीस तपासातून समोर आलं आहे. युसुफ रशिद शेख (वय 38, रा. घणसोली, नवी मुंबई), नौशाद मुस्ताक आलम उर्फ सागर (वय 25, रा. कामोठे, नवी मुंबई) अशी अटक केलेल्या सराईत चोरांची नावं आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही महिन्यांपासून डोंबिवलीतील मानपाडा पोलीस ठाण्यात घरफोड्यांच्या तक्रारींची प्रकरणं वाढत होती. दिवसा आणि रात्री बंद घरांच्या घरफोडीचं प्रमाण वाढल्याने हे गुन्हे उघडकीस आणण्यसाठी पोलिसांनी विशेष पथक तयार केलं. पोलीस उप-आयुक्त सचिन गुंजाळ आणि सहाय्यक पोलीस आयुक्त सुनिल कुराडे यांनी मानपाडा पोलीस ठाण्याच्या गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुरेश मदने यांना विशेष पथक स्थापन करण्याचे निर्देश देण्यात आले.

साहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील तारमळे, वणवे यांच्यासह पोलीस पथकाची चोरांचा शोध घेण्यासाठी नेमणूक करण्यात आली. या पथकाने घरफोड्या झालेल्या इमारती आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून गुप्त बातमीदाकडून चोरा ओळख पटवली. त्यानंतर दोन्ही चोरांचा शोध सुरू झाला. दोघांनाही टिटवाळा नजीकच्या बल्याणी गावात सापळा रचून ताब्यात घेतलं. दोन्ही चोरांची पोलीस पथकाने कसून चौकशी केली असता त्यांनी मानपाडा हद्दीसह विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत 18 घरफोड्या केल्याची कबुली दिली आहे.

अटकेत असलेल्या चोरांकडून पोलिसांनी 2 लाख 20 हजार 500 रुपये किमतीचे 200 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम, 2 मोटारसायकल, 2 लॅपटॉप, 8 महागडे मोबाईल, 5 मनगटी घडयाळ, 1 कॅमेरा, 1 स्पिकर, 1 एटीएम कार्ड, प्लेट, 1 हेल्मेट आणि घरफोडी करण्यासाठी वापरले जाणारे दोन लोखंडी कटर, स्कु ड्रायव्हर, पक्कड आणि चाकू असा एकूण 20 लाख 15 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आल्याची माहिती मानपाडा पोलीस ठाण्याचे प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश मदने यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. 

दरम्यान, अटक करण्यात आलेले चोर हे सराईत गुन्हेगार असून यापुर्वी मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे आयुक्तलयाच्या परिसरातील विविध पोलीस ठाण्यांत चोर युसूफ शेख याला 23 गुन्ह्यांत यापूर्वीही अटक करण्यात आली आहे, तर चोर  नौशाद आलम यालाही यापूर्वी 11 गुन्ह्यांत अटक करण्यात आली आहे.

हेही वाचा:

Ratnagiri News :  लग्नाची बोलणी करण्यासाठी गेलेल्या तरुणावर प्राणघातक हल्ला

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

आपले सरकार सेवा केंद्रांची संख्या वाढवणार, 5000 पेक्षा कमी लोकसंख्येच्या गावात 2 केंद्र, सुधारित दर लागू करणार, आशिष शेलार यांची घोषणा
आपले सरकार सेवा केंद्रांची संख्या वाढवणार, 5000 पेक्षा कमी लोकसंख्येच्या गावात 2 केंद्र : आशिष शेलार
ऊसतोड कामगारांसाठी टास्क फोर्स स्थापन करण्याचे निर्देश; बीडच्या महिलांसंदर्भातील अहवाल सादर
ऊसतोड कामगारांसाठी टास्क फोर्स स्थापन करण्याचे निर्देश; बीडच्या महिलांसंदर्भातील अहवाल सादर
कल्याणमधील चोराचा चेन्नईत एन्काऊंटर; विमानाने फिरुन टाकायचा दरोडे, 10 किलो सोनं अन् चकमकीचा थरार
कल्याणमधील चोराचा चेन्नईत एन्काऊंटर; विमानाने फिरुन टाकायचा दरोडे, 10 किलो सोनं अन् चकमकीचा थरार
रमजान ईदसाठी घराची साफसफाई; कुलरचा शॉक लागून सख्ख्या जावांचा मृत्यू, गावावर शोककळा
रमजान ईदसाठी घराची साफसफाई; कुलरचा शॉक लागून सख्ख्या जावांचा मृत्यू, गावावर शोककळा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Uddhav Thackeray Video | उद्धव ठाकरे हरामखोर कुणाला म्हणाले? राम कदम यांची प्रतिक्रियाUddhav Thackeray : हरामखोर आहेत ते...उद्धव ठाकरेंचारोख कुणावर? पाहा संपूर्ण व्हिडीओ ABP MAJHAMaharashtra Superfast : महाराष्ट्रातील सुपरफास्ट बातम्यांचा आढावा : 26 March 2025 : 5 PMABP Majha Marathi News Headlines 5 PM TOP Headlines 5PM 26 March 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आपले सरकार सेवा केंद्रांची संख्या वाढवणार, 5000 पेक्षा कमी लोकसंख्येच्या गावात 2 केंद्र, सुधारित दर लागू करणार, आशिष शेलार यांची घोषणा
आपले सरकार सेवा केंद्रांची संख्या वाढवणार, 5000 पेक्षा कमी लोकसंख्येच्या गावात 2 केंद्र : आशिष शेलार
ऊसतोड कामगारांसाठी टास्क फोर्स स्थापन करण्याचे निर्देश; बीडच्या महिलांसंदर्भातील अहवाल सादर
ऊसतोड कामगारांसाठी टास्क फोर्स स्थापन करण्याचे निर्देश; बीडच्या महिलांसंदर्भातील अहवाल सादर
कल्याणमधील चोराचा चेन्नईत एन्काऊंटर; विमानाने फिरुन टाकायचा दरोडे, 10 किलो सोनं अन् चकमकीचा थरार
कल्याणमधील चोराचा चेन्नईत एन्काऊंटर; विमानाने फिरुन टाकायचा दरोडे, 10 किलो सोनं अन् चकमकीचा थरार
रमजान ईदसाठी घराची साफसफाई; कुलरचा शॉक लागून सख्ख्या जावांचा मृत्यू, गावावर शोककळा
रमजान ईदसाठी घराची साफसफाई; कुलरचा शॉक लागून सख्ख्या जावांचा मृत्यू, गावावर शोककळा
‘गद्दार’वरून उत्तर प्रदेशातही वाद पेटला, खासदाराच्या घरावर हल्ला; दगडफेकीत अनेक पोलिसांची डोकी फुटली!
‘गद्दार’वरून उत्तर प्रदेशातही वाद पेटला, खासदाराच्या घरावर हल्ला; दगडफेकीत अनेक पोलिसांची डोकी फुटली!
संभाजीराजेंनी इतिहास समजून घ्यावा, मगच...; वाघ्या कुत्र्याच्या समाधीवरुन इतिहास अभ्यासक सोनवणींचा सल्ला
संभाजीराजेंनी इतिहास समजून घ्यावा, मगच...; वाघ्या कुत्र्याच्या समाधीवरुन इतिहास अभ्यासक सोनवणींचा सल्ला
Kunal Kamra : पीएम मोदी म्हणाले ‘टीका भारतीय लोकशाहीचा आत्मा, पण...! ‘गद्दारी’वरून सुरु झालेला राजकीय विडंबनाचा वाद आता अमेरिकेत पोहोचला!
पीएम मोदी म्हणाले ‘टीका भारतीय लोकशाहीचा आत्मा, पण...! ‘गद्दारी’वरून सुरु झालेला राजकीय विडंबनाचा वाद आता अमेरिकेत पोहोचला!
ही उद्धव ठाकरेंची फसवणूक, शिवसैनिकांचा विश्वासघात; स्नेहल जगतापांच्या राष्ट्रवादी प्रवेशाने नेते संतप्त
ही उद्धव ठाकरेंची फसवणूक, शिवसैनिकांचा विश्वासघात; स्नेहल जगतापांच्या राष्ट्रवादी प्रवेशाने नेते संतप्त
Embed widget