Dhule Crime News : धुळे हादरलं! 22 वर्षीय तरुणीची धारदार शस्त्राने गळा चिरुन हत्या
Dhule Crime News : या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेने परिसरात शोककळा पसरली असून भीतीचे वातावरण आहे.
धुळे : धुळे शहरातील (Dhule City) नकाने परिसरातील विघ्नहर्ता हॉस्पिटलच्या मागे असलेल्या बालाजी नगर (Balaji Nagar) येथे एका 22 वर्षीय तरुणीची गळा चिरून निर्घुण हत्या झाल्याचे समोर आहे. ही धक्कादायक घटना आज (22 नोव्हेंबर 2023) संध्याकाळच्या सुमारास घडली. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेने परिसरात शोककळा पसरली असून भीतीचे वातावरण आहे.
धुळे शहरातील नकाने रोड येथील विघ्नहर्ता हॉस्पिटलच्या पाठीमागे असलेल्या बालाजी नगर येथे ही मृत तरुणी वास्तव्यास होती. निकिता पाटील असे या मृत तरुणीचे नाव आहे. ही तरुणी महाविद्यालयात शिक्षण घेत होती. आज संध्याकाळच्या सुमारास ही घरी एकटी असल्याचे संधी साधत अज्ञात व्यक्तीने तिच्या घरात शिरून गळ्यावर आणि पोटावर धारदार शस्त्राने वार केले. या हल्ल्यात तिची निर्घुण हत्या झाल्याची धक्कादायक घटना घडली.
ही दुर्देवी झाली त्यावेळी निकिताचे आई-वडील आणि भाऊ हे तिघेही कामानिमित्त बाहेर गेले होते. घटनेबाबत माहिती मिळतात परिसरातील नागरिकांनी या ठिकाणी गर्दी केली. काहींनी पोलिसांना तात्काळ या घटनेची माहिती दिली.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेसह, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे यांच्यासह पश्चिम देवपूर पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.
निकिता कल्याण पाटील या तरुणीची हत्या करण्यात आल्याचे प्रथमदर्शनी समोर आले. पोलिसांनी आरोपींचा शोध घेण्यासाठी दोन पथके पाठवली आली आहेत. घटनास्थळी श्वानपथक आणि ठसे तज्ज्ञांच्या पथकाकडून पुरावे गोळा करण्यात आले आहे. आरोपींचा लवकरात लवकर शोध घेण्यात येईल अशी माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे यांनी दिली आहे.
मालकावरचा राग त्याच्या मुलीवर काढला अन् थेट अपहरणाचा कट रचला; पोलिसांनी दाम्पत्याच्या मुसक्या आवळल्या
शेतीचे पैसे दिले नाही म्हणून घरकाम करणाऱ्या नोकर दाम्पत्यानं मालकाच्या मुलीचंच अपहरण (Kidnapped) केल्याचा धक्कादायक प्रकार नागपुरात (Nagpur) घडला आहे. नागपूर जिल्ह्यातील लोणार येथे ही घटना घडली. घटनेची माहिती मिळताच नागपूर ग्रामीण पोलिसांनी (Nagpur Police) तात्काळ पावलं उचलली आणि मुलीचा शोध घेण्यास सुरुवात केली. काही तासांतच पोलिसांच्या प्रयत्नांना यश आलं आणि मुलगी सुखरुप सापडली. अपहरण कर्त्यांकडून मुलीची सुखरुप सुटका करण्यात आली असून मुलीला आपल्या पालकांकडे सोपवण्यात आलं आहे. मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) सारणी येथून दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे.