एक्स्प्लोर

Delhi UPSC Student Murder Case: फॉरेन्सिक सायन्सच्या विद्यार्थिनीचा एक्स बॉयफ्रेंड सिलेंडरवाला; नव्या प्रियकराला फ्लॅटमध्ये जिवंत जाळलं, लव्हस्टोरीचा भयानक शेवट

Delhi UPSC Student Murder Case: लव्हस्टोरीचा भयानक शेवट; दिल्लीतील अंगावर काटा आणणारी घटना, नेमकं काय घडलं?

Delhi UPSC Student Murder Case: दिल्लीतील तिमारपुर भागात 5 ऑक्टोबर रोजी यूपीएससीची तयारी करणाऱ्या रामकेश मीणा (32)ची (Ramkesh Meena) आग लागल्यामुळे मृत्यू झाल्याची (Delhi UPSC Student Murder Case) माहिती समोर आली होती. मात्र आता या प्रकरणात नवीन ट्विस्ट आला आहे. रामकेश मीणाचा आगामुळे मृत्यू झाला नसून त्याची हत्या करण्यात आली होती. पोलिसांनी या खळबळजनक खून प्रकरणाचा उलगडा करत तीन आरोपींना अटक केली आहे. यामध्ये अमृता चौहान (21), सुमित कश्यप (27) आणि संदीप कुमार (29) यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे रामकेश मीणासोबत सहमतीने राहणाऱ्या अमृता चौहान हीने हा सगळा कट रचल्याची माहिती समोर आली आहे.  

अमृता चौहान फॉरेन्सिक सायन्सची विद्यार्थिनी होती. अमृता चौहानने संदीप कुमार आणि सुमित कश्यपसोबत मिळून रामकेश मीणाची हत्या करण्याचा कट रचला होता. आरोपी सुमित कश्यप हा आधी अमृता चौहानचा प्रियकर होता. तर सुमित कश्यप गॅसच्या कंपनीत काम करत होता. त्यामुळे गॅस चालू ठेवल्यानंतर किती वेळेनंतर स्फोट होईल, याबाबत सुमित कश्यपला सगळी माहिती होती. पोलिसांनी सगळा तपास केल्यानंतर अमृता चौहनने घटनेची कबुली दिली आहे. 

नेमकं काय घडलं? (Delhi UPSC Student Murder Case)

पोलिसांच्या चौकशीदरम्यान, अमृताने गुन्ह्याची कबुली दिली आणि घटनाक्रम सविस्तर सांगितला. अमृता चौहान म्हणाली की, मे 2025 पासून तिचे मृत रामकेश मीणासोबत संमतीने संबंध होते. रामकेशला अश्लील फोटो आणि व्हिडीओ डिलीट करण्यास सांगितले असता, त्याने नकार दिला. यानंतर अमृताने हा सगळा प्रकार माजी प्रियकर सुमित कश्यपला सांगितला. सुमितने त्याचा मित्र संदीप याला या हत्येत सामील केले. 5-6 ऑक्टोबरच्या रात्री तिघांनीही रामकेशचा गळा दाबून खून केला. नंतर त्यांनी खोलीत पेट्रोल आणि दारू ओतून मृतदेह पेटवून दिला. सुमित हा मुरादाबादमध्ये गॅस सिलिंडर वितरक आहे. त्याने सिलिंडर उघडून आग लावली जेणेकरून स्फोट अपघातासारखा भासेल.

नेमकं प्रकरण काय? (Ramkesh Meena Murder Case)

6 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी दिल्ली पोलिसांना गांधी विहारमधील एका इमारतीच्या चौथ्या मजल्यावर आग लागल्याची माहिती मिळाली. अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली, पण आतील दृश्य धक्कादायक होते. तिथे एक जळालेला मृतदेह पडला होता. तो 32 वर्षीय रामकेश मीणाचा असल्याचे समजले, जो तिथेच राहतो आणि यूपीएससीची तयारी करत होता. सुरुवातीला हा गॅस गळतीचा अपघात असल्याचे मानले जात होते, परंतु मृतदेहाची स्थिती आणि खोलीत विखुरलेल्या वस्तुंमुळे पोलिसांना संशय निर्माण झाला. घटनेनंतर, जेव्हा गुन्हे पथक आणि एफएसएल पथक घटनास्थळी पोहोचले, तेव्हा जवळच्या सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली असता, संपूर्ण कट उलगडू लागला. 5 आणि 6 ऑक्टोबरच्या रात्री सुमारे 2.20 वाजता, दोन पुरुष तोंड झाकून इमारतीत घुसले आणि त्यानंतर फक्त एकच बाहेर पडला. पहाटे 2.57 वाजता, एक महिला, ज्याची नंतर ओळख पटली, ती तिच्या प्रियकरासह इमारतीतून बाहेर पडताना दिसली. काही मिनिटांनंतर आग लागली. पोलिसांनी अमृताचा मोबाईल डेटा आणि कॉल रेकॉर्ड मिळवले आणि त्यांचे स्थान त्या रात्री गांधी विहारजवळच होतो. या सगळ्या तपासानंतर संपूर्ण गुन्हा उघडकीस आला. 

राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या बातम्या, VIDEO:

ही बातमीही वाचा:

Mumbai Crime News: ब्रेकअपनंतर भेटले, संतापलेल्या सोनूने 'ती'च्यावर केले वार, नर्सिंग होममध्ये जीव वाचवण्यासाठी गेली, पण...; काळाचौकी परिसरात नेमकं काय घडलं?

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2019 पासून लोकमत ऑनलाईनमधून पत्रकारितेची सुरुवात. राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा, क्राईम, क्रीडा, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस. 

Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

कृषी समृद्धी योजनेला मंजुरी, शेतकऱ्यांना ड्रोन, शेततळे, सुविधा केंद्र, बीबीएफ यंत्रासाठी अनुदान मिळणार, 5668 कोटी मंजूर : दत्तात्रय भरणे
कृषी समृद्धी योजनेतून शेतकऱ्यांना ड्रोन, शेततळे, सुविधा केंद्र, बीबीएफ यंत्रासाठी अनुदान : दत्तात्रय भरणे
Asia Cup : आशिया कप ट्रॉफीसाठी बीसीसीआयचं मोठं पाऊल, आयसीसीच्या बैठकीत मुद्दा मांडला, अखेर काय ठरलं?
आशिया कप साठी बीसीसीआयचं मोठं पाऊल, ICC च्या बैठकीत मुद्दा मांडला, काय घडलं? 
Rahul Gandhi on Parth Pawar : मतचोरी करुन बनलेल्या सरकारची जमीन चोरी, मोदीजी तुमचं शांत राहणं खूप काही सांगतं, पार्थ पवार जमीन घोटाळा प्रकरणी राहुल गांधींचा हल्लाबोल
पार्थ पवार जमीन घोटाळा प्रकरण, राहुल गांधींचा राज्य सरकारवर हल्लाबोल अन् थेट मोदींना सवाल
नितेश राणेंनी पालकमंत्री म्हणून भान ठेवलं पाहिजे; महायुतीवरुन दीपक केसरकरांचा राणेंना घरचा अहेर
नितेश राणेंनी पालकमंत्री म्हणून भान ठेवलं पाहिजे; महायुतीवरुन दीपक केसरकरांचा राणेंना घरचा अहेर
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Pune Land Scam: '…या प्रकरणी कारवाई केली जाईल', पोलीस आयुक्त Amitesh Kumar यांचा इशारा
Parth Pawar Land Scam:: रद्द केला व्यवहार, वाचणार पार्थ पवार? Special Report
Lonar Lake : लोणारच्या खाऱ्या पाण्यात चक्क मासे, पर्यावरणाला मोठा धोका Special Report
Manoj Jarange vs Dhananjay Munde : जरांगेंच्या हत्येचा कट? कोण जानी दुश्मन? Special Report
Devendra Fadnavis : जमीन व्यवहार प्रकणात कुणालाही सोडणार नाही,दोषींवर कारवाई होणार

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कृषी समृद्धी योजनेला मंजुरी, शेतकऱ्यांना ड्रोन, शेततळे, सुविधा केंद्र, बीबीएफ यंत्रासाठी अनुदान मिळणार, 5668 कोटी मंजूर : दत्तात्रय भरणे
कृषी समृद्धी योजनेतून शेतकऱ्यांना ड्रोन, शेततळे, सुविधा केंद्र, बीबीएफ यंत्रासाठी अनुदान : दत्तात्रय भरणे
Asia Cup : आशिया कप ट्रॉफीसाठी बीसीसीआयचं मोठं पाऊल, आयसीसीच्या बैठकीत मुद्दा मांडला, अखेर काय ठरलं?
आशिया कप साठी बीसीसीआयचं मोठं पाऊल, ICC च्या बैठकीत मुद्दा मांडला, काय घडलं? 
Rahul Gandhi on Parth Pawar : मतचोरी करुन बनलेल्या सरकारची जमीन चोरी, मोदीजी तुमचं शांत राहणं खूप काही सांगतं, पार्थ पवार जमीन घोटाळा प्रकरणी राहुल गांधींचा हल्लाबोल
पार्थ पवार जमीन घोटाळा प्रकरण, राहुल गांधींचा राज्य सरकारवर हल्लाबोल अन् थेट मोदींना सवाल
नितेश राणेंनी पालकमंत्री म्हणून भान ठेवलं पाहिजे; महायुतीवरुन दीपक केसरकरांचा राणेंना घरचा अहेर
नितेश राणेंनी पालकमंत्री म्हणून भान ठेवलं पाहिजे; महायुतीवरुन दीपक केसरकरांचा राणेंना घरचा अहेर
शरद पवारांच्या खासदारकीची गोपीचंद पडळकरांना चिंता; म्हणाले, 10 आमदारांवर राज्यसभेत कसं जाणार?
शरद पवारांच्या खासदारकीची गोपीचंद पडळकरांना चिंता; म्हणाले, 10 आमदारांवर राज्यसभेत कसं जाणार?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 नोव्हेंबर 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 नोव्हेंबर 2025 | शुक्रवार
मोठी बातमी! अखेर पुण्यातील जमिनीचा व्यवहार रद्द, अजित पवारांनी दिली माहिती; कुणाचे फोन आले, कुणी मदत केली सर्व चौकशी होणार
मोठी बातमी! अखेर पुण्यातील जमिनीचा व्यवहार रद्द, अजित पवारांनी दिली माहिती; कुणाचे फोन आले, कुणी मदत केली सर्व चौकशी होणार
Shiv Nadar : दररोज एक दोन नव्हे तब्बल 7 कोटी रुपये दान, शिव नादर यांनी एका वर्षात किती कोटी रुपये दान केलं? पहिल्या स्थानावर कोण?
दररोज एक दोन नव्हे तब्बल 7 कोटी रुपये दान, शिव नादर यांनी एका वर्षात किती कोटी रुपये दान केलं? पहिल्या स्थानावर कोण?
Embed widget