एक्स्प्लोर

Delhi Crime News : प्रेम, संशय, जादू आणि हत्या! प्रियकराने विदेशी प्रेयसीला संपवलं, दोन दिवस मृतदेह गाडीतच

Delhi Tilak Nagar Murder Case : प्रेमासाठी स्वित्झर्लंडहून भारतात आलेल्या विदेशी महिलेला प्रियकराने विदेशी महिलेला संपवलं. दोन दिवस तिचा मृतदेह तो गाडीतूनच घेऊन फिरत होता.

Delhi Crime News : राजधानी दिल्लीतील एक आणखी धक्कादायक घटना समोर आली आहे. दिल्लीतील टिळक नगर भागात शुक्रवारी, 20 ऑक्टोबरला सकाळी 9 वाजता एका महिलेचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचले. मृत महिलेचे हात-पाय बांधलेले होते आणि कोणीतरी तिचा खून करून मृतदेह फेकल्याचं पोलिसांना आढळून आलं. यानंतर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी रुग्णालयात पाठवला. याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू करण्यात आला.

विदेशी महिलेची हत्या

पोलिस उपायुक्त (DCP) विचित्र वीर सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतदेह सापडलेल्या ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. यानंतर पोलिसांच्या पथकाने आरोपीचा शोध घेतला. सीसीटीव्हीमध्ये पोलिसांना पांढऱ्या रंगाची सँट्रो कार दिसून आली. या कार चालकावर संशय आल्याने पोलिसांनी कारच्या नंबरवरून त्याचा शोध घेतल आणि गुरप्रीत नावाच्या आरोपीला ताब्यात घेतलं.

प्रियकराने विदेशी प्रेयसीला संपवलं

गुरप्रीत सिंहनेच विदेशी प्रेयसीची हत्या केल्याची घटना समोर आल्याने एकच खळबळ माजली आहे. इतकंच नाही, तर हत्या केल्यानंतर त्याने महिलेचा मृतदेह दोन दिवस गाडीत ठेवला आणि गाडीत मृतदेह ठेवून तसाच तो शहरात फिरत होता. पोलिसांनी ताब्यातील आरोपी गुरप्रीतची चौकशी केल्यावर त्याने गुन्ह्याची कबूली दिली. महिलेची हत्या करून तिच्या विल्हेवाट लावण्यासाठी मृतदेहा फेकल्याचं त्याने जबाबात सांगितलं.

सीसीटीव्हीत चित्रित झाली घटना

कारचा नंबर ट्रेस करून ही कार एका परदेशी महिलेच्या नावाने विकत घेतल्याचे पोलिसांना समजलं. पोलिसांनी महिलेचे कॉल डिटेल्स काढले असता त्यात गुरप्रीत सिंहचा नंबर सापडला. गुरप्रीत मृत महिलेचा मित्र होता. मृतदेहाची विल्हेवाट लावताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्यामुळे पोलिसांनी तातडीने गुरप्रीत सिंहला अटक केली.

हत्येमागचं कारण काय?

गुरप्रीत सिंहने पोलिसांना सांगितलं की, तो स्वित्झर्लंडमध्ये परदेशी महिलेला भेटला होता. त्यानंतर दोघांमध्ये मैत्री झाली. त्यानंतर गुरप्रीत सिंह अनेकदा स्वित्झर्लंडला जाऊन महिलेला भेटायचा. गुरप्रीतला संशय होता की, महिलेचे दुसऱ्या पुरुषाशीही संबंध आहेत. त्यानंतर आरोपीने महिलेला आधी भारतात बोलावलं. त्यानंतर तो तिला बहाण्याने एका खोलीत घेऊन गेला. त्याने महिलेला सांगितलं की, मी तुझे हात-पाय बांधून तुला जादू दाखवतो. यानंतर आरोपीने महिलेची हत्या केली.

दोन दिवस मृतदेह गाडीत

मिळालेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी महिलेने गुरप्रीत सिंहला लग्नासाठी विचारणा केली होती. त्यानंतर गुरप्रीतने महिलेला दिल्लीला बोलावलं. 10 ऑक्टोबरला ती महिला दिल्लीला पोहोचली आणि टागोर गार्डनमधील हॉटेलमध्ये येथे थांबली. महिला काही दिवस हॉटेलमध्ये राहिली. त्यानंतर 17 ऑक्टोबरला गुरप्रीत हॉटेलमध्ये पोहोचला. त्याने आधीच खुनाची योजना आखली होती. कारण ज्या सेकंड हँड सॅन्ट्रोमध्ये त्याने महिलेला नेले ती त्याच परदेशी महिलेच्या नावाने खरेदी केली होती. महिलेची हत्या केल्यानंतर घाबरलेला गुरप्रित मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी तो मृतदेह दोन दिवस गाडीत घेऊन फिरत होता. यानंतर दुर्गंधी सुटल्याने त्याने मृतदेह टागोर गार्डनच्या मागील भिंतीजवळ फेकला पण, ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

BMC : पूर्व आणि पश्चिम द्रूतगती महामार्गांवर महापालिका राबवणार विशेष स्वच्छता मोहीम
BMC : पूर्व आणि पश्चिम द्रूतगती महामार्गांवर महापालिका राबवणार विशेष स्वच्छता मोहीम
US Vice-President JD Vance : वाण नाही पण गुण लागला! आता डोनाल्ड ट्रम्पनंतर उपराष्ट्राध्यक्ष ग्रीन कार्डवर बोलले, भारतीयांना होळीच्या रंगात 'बेरंग' होण्याची वेळ
वाण नाही पण गुण लागला! आता डोनाल्ड ट्रम्पनंतर उपराष्ट्राध्यक्ष ग्रीन कार्डवर बोलले, भारतीयांना होळीच्या रंगात 'बेरंग' होण्याची वेळ
Amir Khan Girlfriend : तिसऱ्या गर्लफ्रेन्डची ओळख करुन दिल्यानंतर मुलांची-कुटुंबीयांची प्रतिक्रिया काय? आमीर खान म्हणाला...
तिसऱ्या गर्लफ्रेन्डची ओळख करुन दिल्यानंतर मुलांची-कुटुंबीयांची प्रतिक्रिया काय? आमीर खान म्हणाला...
Russia-Ukraine war : रशिया युक्रेन युद्धविराम चर्चेवर व्लादिमीर पुतीन पहिल्यांदाच बोलले; डोनाल्ड ट्रम्प आणि मोदींचा उल्लेख करत काय म्हणाले?
रशिया युक्रेन युद्धविराम चर्चेवर व्लादिमीर पुतीन पहिल्यांदाच बोलले; डोनाल्ड ट्रम्प आणि मोदींचा उल्लेख करत काय म्हणाले?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Political Holi | रंगांच सण, रंगावरूनच राजकारण; धुलवडीच्या उत्सवात रंगांची वाटणी Special ReportRajkiy Sholey Nana Patole| ऑफर भारी, मविआ-2 ची तयारी? पटोलेंची शिंदे-अजितदादांना ऑफर Special ReportABP Majha Marathi News Headlines 09 PM TOP Headlines 9PM 14 March 2025ABP Majha Marathi News Headlines 08 PM TOP Headlines 08 PM 14 March 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
BMC : पूर्व आणि पश्चिम द्रूतगती महामार्गांवर महापालिका राबवणार विशेष स्वच्छता मोहीम
BMC : पूर्व आणि पश्चिम द्रूतगती महामार्गांवर महापालिका राबवणार विशेष स्वच्छता मोहीम
US Vice-President JD Vance : वाण नाही पण गुण लागला! आता डोनाल्ड ट्रम्पनंतर उपराष्ट्राध्यक्ष ग्रीन कार्डवर बोलले, भारतीयांना होळीच्या रंगात 'बेरंग' होण्याची वेळ
वाण नाही पण गुण लागला! आता डोनाल्ड ट्रम्पनंतर उपराष्ट्राध्यक्ष ग्रीन कार्डवर बोलले, भारतीयांना होळीच्या रंगात 'बेरंग' होण्याची वेळ
Amir Khan Girlfriend : तिसऱ्या गर्लफ्रेन्डची ओळख करुन दिल्यानंतर मुलांची-कुटुंबीयांची प्रतिक्रिया काय? आमीर खान म्हणाला...
तिसऱ्या गर्लफ्रेन्डची ओळख करुन दिल्यानंतर मुलांची-कुटुंबीयांची प्रतिक्रिया काय? आमीर खान म्हणाला...
Russia-Ukraine war : रशिया युक्रेन युद्धविराम चर्चेवर व्लादिमीर पुतीन पहिल्यांदाच बोलले; डोनाल्ड ट्रम्प आणि मोदींचा उल्लेख करत काय म्हणाले?
रशिया युक्रेन युद्धविराम चर्चेवर व्लादिमीर पुतीन पहिल्यांदाच बोलले; डोनाल्ड ट्रम्प आणि मोदींचा उल्लेख करत काय म्हणाले?
Video : विमानतळावरच बोईंग विमानाच्या इंजिनाने पेट घेतला अन् प्रवासी थेट पंख्यावर पळाले, व्हिडिओ पाहून अंगाचा थरकाप
Video : विमानतळावरच बोईंग विमानाच्या इंजिनाने पेट घेतला अन् प्रवासी थेट पंख्यावर पळाले, व्हिडिओ पाहून अंगाचा थरकाप
Satish Bhosale Beed: घर पेटवून दिलं, लहान मुलींना मारहाण; सतीश भोसले उर्फ खोक्या भाईच्या बहिणीकडून न्यायाची मागणी
घर पेटवून दिलं, लहान मुलींना मारहाण; सतीश भोसले उर्फ खोक्या भाईच्या बहिणीकडून न्यायाची मागणी
Satish Bhosale Beed: प्रयागराजवरुन मुसक्या आवळून कोर्टात आणलं, बीड पोलिसांनी खोक्याला 7 दिवस कोठडीत डांबण्यासाठी कोर्टात नेमकं काय सांगितलं?
प्रयागराजवरुन मुसक्या आवळून कोर्टात आणलं, बीड पोलिसांनी खोक्याला 7 दिवस कोठडीत डांबण्यासाठी कोर्टात नेमकं काय सांगितलं?
पोलीस मोस्ट वॉन्टेड गुन्हेगाराला पकडण्यासाठी जाताच हल्ला; एएसआयचा मृत्यू, गावकऱ्यांनी थेट आरोपीची सुटका केली! प्रेतावर पत्नी धाय मोकलून रडली
पोलीस मोस्ट वॉन्टेड गुन्हेगाराला पकडण्यासाठी जाताच हल्ला; एएसआयचा मृत्यू, गावकऱ्यांनी थेट आरोपीची सुटका केली! प्रेतावर पत्नी धाय मोकलून रडली
Embed widget