एक्स्प्लोर

Cyber Crime Indian Army : सायबर चोरांची फसवणुकीसाठी आयडिया; आता थेट भारतीय जवानांच्या नावाने फसवणूक

Cyber Crime News : सायबर गुन्हेगार मी भारतीय सैन्यातून एक आर्मी ऑफीसर बोलतोय असे समोरील व्यक्तीला आपल्याला भासवते आणि तिथेच सामान्यांची फसवणूक होते.

Cyber Crime :  डिजीटल युगात सायबर गुन्हेगारीचे (Cyber Crime) प्रकार वाढत चालले आहेत. सामान्यांना लुबाडण्यासाठी या सायबर चोरांकडून (Cyber Thieves) विविध आयडिया लढवल्या जात आहेत. आता, सायबर चोरांकडून भारतीय जवानांच्या नावाचा वापर सुरू झाला आहे.  पूर्वीदेखील भारतीय सैनिकांच्या नावाने नागरिकांची फसवणूक सुरू होती. परंतु आता सायबर गुन्हेगारांनी एक नवीन फंडा नागरिकांना फसवण्यासाठी शोधला आहे. त्यात हे सायबर गुन्हेगार मी भारतीय सैन्यातून एक आर्मी ऑफीसर बोलतोय असे समोरील व्यक्तीला आपल्याला भासवते आणि तिथेच सामान्यांची फसवणूक होते.

अनेक माध्यमातून आता ऑनलाईन पद्धतीने फसवणुकीचे प्रकार समोर येत आहे. आता भारतीय सैनिकांच्या नावाने नागरिकांची फसवणूक केली जात आहे. यामध्ये भारतीय सैनिक असल्याचे भासवून मला आजाराच्या उपचारासाठी आपल्या आर्थिक मदतीची आवश्यकता आहे किंवा ती व्यक्ती आपल्याला असे देखील सांगते की मला मुलगा झाला आहे, मी आपल्या परिसरातील मंदिराकरीता काही रक्कम दान करु इच्छितो आणि आपल्याला आपले फोन पे, गुगले पे नंबर ओपन करण्यास सांगतात आणि आपल्याला विविध प्रकारच्या लिंकवर क्लिक करा अशा वेगवेगळया पद्धतीने आपल्याला गुंतववून आपले बँक अकाउंट रिकामे करण्याचा प्रयत्न करतात. 

आपण त्या अज्ञात व्यक्तीला भारतीय सैनिकांच्या नावाने मदत म्हणून पैसे पाठवून देतो आणि इथेच आपण फसतो कारण आपण भारतीय सैनिक नाव ऐकताच भावूक होवून जातो.  जर आपल्या देशाच्या सैनिकाला कुठलीही मदतीची आवश्यकता असेल किंवा त्याला कुठल्या प्रकारचे दानधर्म करायचे असेल तर आपण त्वरीत त्यांना होकार देतो आणि तेथेच आपण फसतो. त्यामुळे नागरिकांनी अशा भावनिक आव्हानांपासून दूर राहावे असा सल्ला सायबर तज्ञ ॲड. चैतन्य भंडारी यांनी दिला आहे.  जर आपल्याला भारतीय सैनिकांचा नावाने फोन आलेले असेल तर त्याला प्रतिसाद देवू नका. त्यांनी जरी आपल्याला भारतीय सैनिक असल्याचे पुरावे आपल्या व्हॉटस अॅपवर पाठवले असतील तरी देखील त्यांच्यावर विश्वास ठेवू नका. हे सर्व खोटे पुरावे हे सायबर गुन्हेगार बनवून नागरिकांची फसवणूक करतात. जर आपल्यासोबत अशा प्रकारचे काही गुन्हे घडले असतील तर आपण तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यात अथवा सायबर पोलिसांच्या 1930 या हेल्पलाईनवर संपर्क साधावा असे आवाहन ॲड. चैतन्य भंडारी यांनी केले.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Superfast News : महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्यांचा आढावा : 10 PM 26 Sept 2024ABP Majha Headlines : 10 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स9 Second News : 9 सेकंदात बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट न्यूज : 26 Sept 2024 : ABP MajhaABP Majha Headlines : 09 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Harshvardhan Patil: हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
PM Modi Death Threat: मोदींच्या जीवाला धोका, त्यांना वाचवा! पुण्याच्या कंट्रोल रूमला फोन, पोलिसांच्या तपासाची चक्र फिरली, एकाला ताब्यात घेतलं अन्...
मोदींच्या जीवाला धोका, त्यांना वाचवा! पुण्याच्या कंट्रोल रूमला फोन, पोलिसांच्या तपासाची चक्र फिरली, एकाला ताब्यात घेतलं अन्...
Embed widget