Crime News : इन्स्टा पोस्टला रिप्लाय देणं पडलं महागात; दोघांची सटकली, तरुणाला एकट्यात पकडलं, परत दिसला तर तुला जिवंत सोडणार नाही म्हणत धुतलं
Crime News : इन्स्टाग्रामवरील पोस्टला रिप्लाय दिला म्हणून दोघा जणांनी एका तरुणाला शिवीगाळ करुन बेदम मारहाण केली आहे.

Crime News : इन्स्टाग्रामवरील (Instagram) पोस्टला रिप्लाय दिला म्हणून, दोघा जणांनी एका तरुणाला शिवीगाळ करुन लोखंडी गज व लाकडी दांड्याने बेदम मारहाण केली. ही घटना अहिल्यानगर (Ahilyanagar Crime News) जिल्ह्याच्या राहुरी तालुक्यातील कोळेवाडी फाटा येथे घडली. या प्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात (Rahuri Police Station) दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राहुरी पोलीस ठाण्यात अर्जुन किसन बोराडे (18, रा. वरशिंदे, ता. राहुरी) या तरुणाने फिर्याद दाखल केली आहे. त्यात म्हटले आहे की, या घटनेतील आरोपींनी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट टाकली होती. त्या पोस्टला अर्जुन बोराडे याने रिप्लाय दिला होता. दुपारी 2 वाजेच्या सुमारास अर्जुन बोराडे हा तरुण राहुरी तालुक्यातील कोळेवाडी फाटा येथे उभा होता.
परत दिसला तर तुला जिवंत सोडणार नाही
त्यावेळी तेथे आरोपी आले व म्हणाले, आम्ही पाठवलेल्या फोटोला रिप्लाय का दिला? असे म्हणून दोघा आरोपींनी अर्जुन बोराडे यास शिवीगाळ करून लोखंडी गज व लाकडी दांड्याने बेदम मारहाण केली. तसेच तू परत दिसला तर तुला जिंवत सोडणार नाही, अशी धमकी दिली.
दोघांविरोधात गुन्हा दाखल
या घटनेत अर्जुन बोराडे हा तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याने राहूरी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून रोहित गोपीनाथ आंबेकर व विजय भागवत भांलीगे (दोघे रा. कोळेवाडी, ता. राहुरी) या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.
अल्पवयीन मुलीचे अपहरण; गुन्हा दाखल
दरम्यान, राहुरी तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्याची घटना दि. 6 एप्रिल रोजी सकाळी उघडकीस आली. याबाबत एका तरुणावर अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेतील मुलगी व तिचे आजोबा रात्री 10.30 वाजे दरम्यान घरात झोपले होते. त्यानंतर पहाटे 5 वाजता मुलीचे आजोबा उठले असता त्यांची नात घरातून बेपत्ता झाल्याचे लक्षात आले. नातेवाईकांनी तिचा परिसरात शोध घेतला. मात्र ती कोठेही आढळून आली नाही. तिला चैतन्य कदम या तरुणाने फूस लावून पळवून नेले, असे नातेवाईकांना समजले. नातेवाईकांनी राहुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. फिर्यादीवरून चैतन्य दीपक कदम (रा. मोकळ ओहळ, ता. राहुरी) याच्यावर अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास राहुरी पोलीस करीत आहेत.
आणखी वाचा























