एक्स्प्लोर

Crime News : धक्कादायक! दहावीतील मुलीचा संशयास्पद मृत्यु ; बलात्कार करून हत्या केल्याचा संशय

Crime News: जव्हार तालुक्यातील एका गावात अल्पवयीन मुलीचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. या अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.

Crime News : राज्यात दहावीच्या परीक्षेत विद्यार्थीनींनी मिळवलेले यश साजरं होत असताना दुसरीकडे जव्हारमधून मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. जव्हार तालुक्यातील वडपाडा येथील 16 वर्षीय आदिवासी अल्पवयीन मुलीचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना बुधवारी उघडकीस आली आहे. 

दहावीची परीक्षा दिलेल्या अल्पवयीन मुलीचा मृतदेह वडपाडा गावापासून काही अंतरावर आढळून आला आहे. मंगळवारपासून ही अल्पवयीन मुलगी बेपत्ता होती. बराच वेळ झाला तरी ती घरी न परतल्याने कुटुंबीय घाबरले होते. त्यांनी परिसरात तिचा शोध घेतला तरी ती सापडली नाही. अखेर तिच्या कुटुंबियांनी बुधवारी ही अल्पवयीन मुलगी हरवली असल्याची तक्रार जव्हार पोलीस ठाण्यात दाखल केली होती. त्यानंतर बुधवारी गावकऱ्यांना तिचा मृतदेह आढळून आला. त्यानंतर एकच खळबळ उडाली. मृत अल्पवयीन मुलीच्या अंगावर व डोक्यावर मार लागल्याचे प्रथमदर्शी दिसून आले आहे. या मुलीवर बलात्कार झाल्याच्या संशय व्यक्त केला जात आहे. तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. पोलिसांना शवविच्छेदन अहवालाची प्रतिक्षा आहे. 

मन सुन्न करणारी घटना घडल्यामुळे पालघर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक प्रकाश गायकवाड यांनी घटनास्थळाची पाहणी केली. जव्हार उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली जव्हार पोलीस निरीक्षक आप्पासाहेब लेंगरे तपास करीत आहेत. पोलिसांनी अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. 

लैंगिक अत्याचाराला कंटाळून तरुणीची आत्महत्या, आठ जणांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या

लैंगिक अत्याचाराला कंटाळून नैराश्यातून एका तरुणीने इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारत आत्महत्या केल्याची घटना कल्याणात उघडकीस आली होती. याप्रकरणी कोलशेवाडी पोलिसांनी आठ जणांवर गुन्हे दाखल करत अटक केली. या गंभीर प्रकरणाची दखल राज्य महिला आयोगाने घेतली आहे. महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी याप्रकरणी कडक कारवाई करून केलेल्या कार्यवाहीचा अहवाल राज्य महिला आयोगास सादर करण्याचे निर्देश ठाणे पोलिसांना दिले आहेत. याबाबत रुपाली चाकणकर यांनी ट्विट केलं आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या:

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Satej Patil Radhanagari Speech :   भर मंचावर सतेज पाटलांना समोर बोलावलं, राधानगरीत मोठी जबाबदारी
भर मंचावर सतेज पाटलांना समोर बोलावलं, राधानगरीत मोठी जबाबदारी
Uddhav Thackeray: कोल्हापूरच्या सभेत उद्धव ठाकरेंची पाच मोठी गेमचेंजर आश्वासनं; मुलांना मोफत शिक्षण, मुंबईत घरं ते स्थिर भाव
कोल्हापूरच्या सभेत उद्धव ठाकरेंची पाच मोठी गेमचेंजर आश्वासनं; मुलांना मोफत शिक्षण, मुंबईत घरं ते स्थिर भाव
मध्यप्रदेशकडून महाराष्ट्रात येणाऱ्या वाहनातून 70 लाखांची रोकड जप्त
Dhule Cash Seized : मध्यप्रदेशकडून महाराष्ट्रात येणाऱ्या वाहनातून 70 लाखांची रोकड जप्त
लोकसभेत हातावर लिहिले 3 'वाजे'ला मतदान करा, माझ्या पाठीत खंजीर खुपसला, हेमंत गोडसेंचा भुजबळांवर गंभीर आरोप
लोकसभेत हातावर लिहिले 3 'वाजे'ला मतदान करा, माझ्या पाठीत खंजीर खुपसला, हेमंत गोडसेंचा भुजबळांवर गंभीर आरोप
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Uddhav Thackeray Radhanagri Speech : शिवरायांचं मंदिर ते मुलांना मोफत शिक्षण; ठाकरेंची मोठी आश्वासनंSatej Patil Radhanagari Speech :   भर मंचावर सतेज पाटलांना समोर बोलावलं, राधानगरीत मोठी जबाबदारीEknath Shinde Koregaon Sabha : महेश शिंदेंच्या प्रचारसाठी कोरेगावात सभा, शिंदेंची कोरेगावात सभाSharad Pawar On Retirement : 14 वेळा निवडणुका लढल्या, आता निवडणुक लढणार नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Satej Patil Radhanagari Speech :   भर मंचावर सतेज पाटलांना समोर बोलावलं, राधानगरीत मोठी जबाबदारी
भर मंचावर सतेज पाटलांना समोर बोलावलं, राधानगरीत मोठी जबाबदारी
Uddhav Thackeray: कोल्हापूरच्या सभेत उद्धव ठाकरेंची पाच मोठी गेमचेंजर आश्वासनं; मुलांना मोफत शिक्षण, मुंबईत घरं ते स्थिर भाव
कोल्हापूरच्या सभेत उद्धव ठाकरेंची पाच मोठी गेमचेंजर आश्वासनं; मुलांना मोफत शिक्षण, मुंबईत घरं ते स्थिर भाव
मध्यप्रदेशकडून महाराष्ट्रात येणाऱ्या वाहनातून 70 लाखांची रोकड जप्त
Dhule Cash Seized : मध्यप्रदेशकडून महाराष्ट्रात येणाऱ्या वाहनातून 70 लाखांची रोकड जप्त
लोकसभेत हातावर लिहिले 3 'वाजे'ला मतदान करा, माझ्या पाठीत खंजीर खुपसला, हेमंत गोडसेंचा भुजबळांवर गंभीर आरोप
लोकसभेत हातावर लिहिले 3 'वाजे'ला मतदान करा, माझ्या पाठीत खंजीर खुपसला, हेमंत गोडसेंचा भुजबळांवर गंभीर आरोप
एकाच राज्यासाठी काम करत असाल तर तुम्ही पंतप्रधान कशाला होता? राज्याचे मुख्यमंत्री व्हा; पवार गरजले
एकाच राज्यासाठी काम करत असाल तर तुम्ही पंतप्रधान कशाला होता? राज्याचे मुख्यमंत्री व्हा; पवार गरजले
Numerology : अतिशय घाबरट असतात 'या' जन्मतारखेचे लोक; मनातील भावनाही धड करत नाहीत व्यक्त, लोक काय बोलतील याचा करतात अति विचार
अतिशय घाबरट असतात 'या' जन्मतारखेचे लोक; लोक काय बोलतील याचा करतात अति विचार, मनातील भावना व्यक्त करायलाही घाबरतात
नालासोपाऱ्यात हिंदी भाषिक टीसीची दादागिरी, दाम्पत्याकडून लिहून घेतलं
नालासोपाऱ्यात हिंदी भाषिक टीसीची दादागिरी, दाम्पत्याकडून लिहून घेतलं "मराठी बोलणार नाही"
मोठी बातमी! उत्तर प्रदेशच्या मदरसा कायद्याला सर्वोच्च न्यालयाची मान्यता, मदरशांना मोठा दिलासा 
मोठी बातमी! उत्तर प्रदेशच्या मदरसा कायद्याला सर्वोच्च न्यालयाची मान्यता, मदरशांना मोठा दिलासा 
Embed widget