एक्स्प्लोर

पोलिसानेच केली प्रेयसीची हत्या, मृतदेह गाडीत घेऊन दोन दिवस फिरला, पोलिसांनी ठोकल्या बेड्या 

Ulhasnagar Crime News : उल्हासनगर हिललाइन पोलिसांनी आरोपी पोलिसांसह त्याच्या साथीदाराला केली अटक

Maharashtra Ulhasnagar Crime News : ठाणे पोलीस आयुक्तालयातील एका पोलिसाने आपल्या प्रेयसीची हत्या केल्याचा प्रकार समोर आलाय. धक्कादायक म्हणजे ज्या गाडीत त्याने प्रेयसीची हत्या केली, त्याच गाडीत मृतदेह घेऊन तो दोन दिवस राज्याच्या विविध शहरात फिरत होता. उल्हासनगर पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे अखेर या पोलिसाला आणि त्याच्या साथीदाराला बेड्या ठोकल्या आहेत. अनेक आरोपीना बेड्या ठोकणारा पोलिसच हत्येच्या आरोपीखाली जेरबंद झाल्याने हा पोलीस वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे.

ठाणे पोलीस आयुक्तालयातील पोलीस कर्मचारी सचिन खाजेकर याने साथीदाराच्या मदतीने प्रेयसीची हत्या केली. सचिन खाजेकर याने 14  तारखेला प्रेयसी आशा मोरेची आपल्या कारमध्ये गळा दाबून हत्या केली. धक्कादायक म्हणजे आशाची हत्या ज्या कार मध्ये त्याने केली होती, त्या कारमध्येच तिचा मृतदेह घेऊन तो नाशिक, भिवंडी, ठाणे आशा विविध शहरात दोन दिवस मृतदेह घेऊन फिरत होता. अखेर उल्हासनगर हिललाईन पोलीस ठाण्याच्या हद्दीत आल्यानंतर त्याने आपल्या मेव्हण्याला हत्या केल्याची माहिती देत मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी सांगितले. त्याच्या मेव्हण्याने आणखी एका ओळखीच्या व्यक्तीला मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी मदत करण्यासाठी फोन केला. मात्र ज्याला फोन करून सांगितले त्यानेच पोलिसांना माहिती देत या हत्येचा उलगडा करण्यासाठी मदत केली. विठ्ठलवाडी पोलीस पथकाने खबऱ्याने दिलेल्या माहितीच्या ठिकाणी जाऊन पोलीस सचिन खाजेकर सह त्याच्या साथीदाराला ताब्यात घेतले. तसेच  महिलेचा मृतदेह ताब्यात घेत पुढील तपास सुरू केला.
 
सचिन खाजेकर हा औरंगाबादेत पोलीस आयुक्तालयात एक वर्षांपूर्वी कामाला असताना आशा मोरे सोबत त्याचे प्रेमसंबंध निर्माण झाले होते. याच दरम्यान ती त्याला घरी घेऊन जाण्यासाठी वारंवार तगादा लावत होती, शिवाय पैशाची मागणी देखील करत होती. त्यामुळेच सचिन याने ठाणे पोलीस आयुक्तालयात बदली करून घेतली. मात्र आशा येथे देखील आली, आणि तिने पैशाची मागणी केली. अखेर 14 तारखेला सचिन याने आशाला बोलवून घेत तिची कार मध्ये गळा दाबून हत्या केली. मात्र हत्या केल्यानंतर मृतदेह कशी विल्हेवाट लावायची हे त्याला सुचत नव्हतं. त्यामुळे कारमधून तिचा मृतदेह विविध शहरात फिरवला. मात्र पोलिसांच्या खबऱ्यामुळे त्याचे बिंग फुटले. दरम्यान आता सचिनने आपल्या बहिणी सोबत लॉक डाऊनच्या काळात लग्न केल्याची माहिती हत्या झालेल्या आशाच्या बहिणीने दिलीय.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

शेअर मार्केटच्या नादात युवक कर्जबाजारी, 75 वर्षीय आजीला ठार करुन सोनं लंपास; सोलापूर जिल्ह्याला हादरवणारी घटना
शेअर मार्केटच्या नादात युवक कर्जबाजारी, 75 वर्षीय आजीला ठार करुन सोनं लंपास; सोलापूर जिल्ह्याला हादरवणारी घटना
मतदार पडताळणी मॅपिंगसाठी आलेल्या BLO कर्मचाऱ्यावर हल्ला; लाथा-बुक्क्यांनी मारहाण करत धूम ठोकली, शोध सुरू
मतदार पडताळणी मॅपिंगसाठी आलेल्या BLO कर्मचाऱ्यावर हल्ला; लाथा-बुक्क्यांनी मारहाण करत धूम ठोकली, शोध सुरू
धक्कादायक! पोलीस स्टेशन शेजारीच असणारं ATM मशीन चोरीला, 10 लाखांची रोकड लंपास, घटना सीसीटीव्हीत कैद
धक्कादायक! पोलीस स्टेशन शेजारीच असणारं ATM मशीन चोरीला, 10 लाखांची रोकड लंपास, घटना सीसीटीव्हीत कैद
अयोध्येत बुरखा घालून सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला मारणारी तरुणी हिंदू निघाली; खेळण्यातील बंदुकीचा धाक दाखवून लूट, 4 महिन्यांची गर्भवती, बॉयफ्रेंड राहुलसकट मुसक्या आवळल्या
अयोध्येत बुरखा घालून सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला मारणारी तरुणी हिंदू निघाली; खेळण्यातील बंदुकीचा धाक दाखवून लूट, 4 महिन्यांची गर्भवती, बॉयफ्रेंड राहुलसकट मुसक्या आवळल्या

व्हिडीओ

Baramati Bypolls : बारामतीचा लढा, मविआत तिढा? काँग्रेसच्या भूमिकेमुळे मोठा ट्विस्ट Special Report
Ashok kharat Minister Connection : दमानियांचा कॉल बॉम्ब, कुणाला फुटणार घाम? Special Report
Ashok Kharat Property : खरातची खाती,काळ्या करामती; 130 खात्यांमधून 60 कोटींचे व्यवहार Special Report
BMC School Manache Shlok : मनाचे श्लोक, वादाचे टोक; एमआयएचा विरोध Special Report
Anjali Damania on Rupali Chakankar | रुपाली चाकणकरांचे Ashok Kharat ला 177 कॉल!, दमानियांचा दावा

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
CSK vs PBKS Highlights, IPL 2026  :  पंजाबच्या आक्रमणापुढं चेन्नईचा बालेकिल्ला ढासळला, चेन्नई सुपर किंग्जचा सलग दुसरा पराभव, ऋतुराजनं सांगितलं काय चुकलं? 
पंजाबच्या आक्रमणापुढं चेन्नईचा बालेकिल्ला ढासळला, चेन्नई सुपर किंग्जचा सलग दुसरा पराभव, ऋतुराजनं सांगितलं काय चुकलं? 
Ganesh Naik : माझ्यानंतर आनंद दिघे जिल्हाप्रमुख झाले, त्यानंतर बरेच जण झाले, त्यांच्या नावांची मालिका सांगत नाही,गणेश नाईक यांनी एकनाथ शिंदेंचा उल्लेख टाळला
ठाणे शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही, पालघरमधील कार्यक्रमात गणेश नाईक यांचं वक्तव्य, रोख कोणाकडे?
US Iran War : अमेरिकेला F-35 च्या एका पायलटला वाचवण्यात यश, दुसऱ्याचा शोध सुरु, अमेरिकेचं हेलिकॉप्टर पाडल्याचा इराणी मीडियाचा दावा
अमेरिकेला F-35 च्या एका पायलटला वाचवण्यात यश, दुसऱ्याचा शोध सुरु, अमेरिकेचं हेलिकॉप्टर पाडल्याचा इराणी मीडियाचा दावा
AAP : योगेंद्र यादव ते स्वाती मालीवाल, आम आदमी पक्षाची स्थापना झाल्यापासून पक्षाची साथ कोणी कोणी सोडली? पुढचा नंबर कोणाचा? 
योगेंद्र यादव ते स्वाती मालीवाल, आम आदमी पक्षाची स्थापना झाल्यापासून पक्षाची साथ कोणी कोणी सोडली? पुढचा नंबर कोणाचा? 
Video: संजय राऊत अन् गुलाबराव पाटील समोरासमोर, आधी दुरुनच हसले नंतर जवळून गेले; सगळेच बघायले
Video: संजय राऊत अन् गुलाबराव पाटील समोरासमोर, आधी दुरुनच हसले नंतर जवळून गेले; सगळेच बघायले
शेअर मार्केटच्या नादात युवक कर्जबाजारी, 75 वर्षीय आजीला ठार करुन सोनं लंपास; सोलापूर जिल्ह्याला हादरवणारी घटना
शेअर मार्केटच्या नादात युवक कर्जबाजारी, 75 वर्षीय आजीला ठार करुन सोनं लंपास; सोलापूर जिल्ह्याला हादरवणारी घटना
Sarfaraz Khan and Musheer Khan : एक मुलगा CSK, दुसरा PBKS कडून मैदानात, वडील कुणाच्या बाजूने? आयपीएलमध्ये आज पंजाब आणि चेन्नई आमने सामने
एक मुलगा CSK, दुसरा PBKS कडून मैदानात, वडील कुणाच्या बाजूने? IPL मध्ये पंजाब आणि चेन्नई आमने सामने
पाकिस्तानमध्ये इंधन दरवाढीचा भडका; पेट्रोल 458 तर डिझेल 520 रुपये लिटर, नागरिकांचा संताप, पंपावर रांगा
पाकिस्तानमध्ये इंधन दरवाढीचा भडका; पेट्रोल 458 तर डिझेल 520 रुपये लिटर, नागरिकांचा संताप, पंपावर रांगा
Embed widget