'केमिकलमध्ये नोटा डबल होतात', असं म्हणत केली हजारो रुपयांची फसवणूक; 5 आरोपींना अटक
Crime News: केमिकलमध्ये नोटा ठेवल्यास त्या डबल होतात असं म्हणत लोकांची फसवणूक करणाऱ्या टोळीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
Crime News: केमिकलमध्ये नोटा ठेवल्यास त्या डबल होतात असं म्हणत लोकांची फसवणूक करणाऱ्या टोळीला पोलिसांनी (police) बेड्या ठोकल्या आहेत. गोंदिया जिल्ह्यातील (gondia district ) रावणवाडी पोलीस ठाणेंतर्गत येत असलेल्या कोरणी घाट परिसरात ही घटना घडली आहे. याप्रकरणी 5 गुन्हेगारांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सातोना येथील दीपांशु उरकुडे यांना काही लोकांनी नोटा एका केमिकलमध्ये ठेवल्यास काही तासात त्या नोटामधून अडीच लाख रुपये तयार होतात, अशी बतावणी केली. त्यानंतर दिपांशु याच्याकडून या भामट्यांनी 10,000 रुपये घेऊन एक केमिकल टाकलेले नोटांचे बंडल पॅक करून दिले आणि 2 तासांनी उघडून बघायला सांगितले. दिपाशुने 2 तासानंतर बंडल घडून पाहिले असता त्यात कागदी नोटा दिसून आल्याने आपली फसवूणक झाल्याचे त्याच्या लक्षात आले. यानंतर त्याने थेट पोलिसात (police) धाव घेत याप्रकरणी गुन्हा दाखल केला.
दीपांशूने आरोपींनी फसवणूक (Crime News) करून 10,000 रूपये रोख रक्कम घेऊन स्विफ्ट चारचाकीने गोंदियाच्या (gondia district ) दिशेने पसार झाल्याचे सांगितले. ही माहिती प्राप्त होताच घटनेचे गांभीर्य लक्षत घेऊन चारचाकी मधून पसार झालेल्या गुन्हेगारांचे शोध घेऊन गुन्हेगारांना तात्काळ अटक करण्याच्या सूचना पोलीस (police) अधीक्षकांनी दिल्या. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेने पथक तयार करुन तपासाला सुरवात केली असता गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे बालाघाट टी पॉईट, गोंदिया (gondia district ) येथे सापळा रचून नाकाबंदीत स्विफ्ट कार रावणवाडी येथून गोंदियाच्या (gondia district ) दिशेने येताना दिसून आली. या चारचाकी कारमध्ये 5 व्यक्ती संशयितरित्या आढळून आल्याने त्यांची चौकशी करण्यात आली. चौकशीत पोलिसी खाक्या दाखवत दिपांशु याची जी फसवणूक झाली आहे, याबाबत त्यांना विचारले असता, या पाचही जणांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. यानंतर पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. आरोपींच्या ताब्यातून 10 हजार रुपये रोख रक्कम व चारचाकी वाहन जप्त करण्यात आले. पिंटूकुमार बारमाते, दुर्गेश मरसकोल्हे, सियाराम चौधरी, राजेश नेवारे, विष्णू पंधरे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. दरम्यान, या आरोपींनी आणखी किती लोकांची फसवणूक केली आहे, याबाबत अधिक तपास चौकशी करत आहेत.
इतर महत्वाची बातमी: