एक्स्प्लोर

Crime News : संतापजनक! मद्यधुंद प्रवाशाकडून विमानात एअर होस्टेसचा विनयभंग, दोन वेळा जाणीवपूर्वक स्पर्श केला अन्...

Crime News : दिल्लीहून शिर्डीला येणाऱ्या विमानात एका मद्यधुंद प्रवाशाने एअर होस्टेसचा विनयभंग केल्याची संतापजनक घटना घडली आहे.

Crime News : दिल्लीहून शिर्डीला (Shirdi) येणाऱ्या विमानात (Airplane) एका मद्यधुंद प्रवाशाने एअर होस्टेसचा (Air hostess) विनयभंग केल्याची संतापजनक घटना इंडिगो एअरलाइन्सच्या फ्लाईट क्रमांक 6 ए 6403 मध्ये घडली. विमान शिर्डीत उतरल्यानंतर एअरलाइन्स कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार राहाता पोलिसांनी (Rahata Police) आरोपी प्रवाशाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. हा प्रवाशी लष्करी जवान असल्याचे पोलीस तपासात समोर आले असून त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. (Crime News)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित एअर होस्टेस मूळची केरळमधील आहे. शुक्रवारी 2 मे रोजी दुपारी 1 वाजून 40 मिनिटे ते 4 वाजून 10 मिनिटांच्या दरम्यान दिल्ली ते शिर्डी या विमानाच्या प्रवासादरम्यान आरोपी प्रवासी संदीप सुमेर सिंग याने एअर होस्टेसला दोन वेळा जाणीवपूर्वक स्पर्श करून तिला लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले, असे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. 

महिला कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर 

घटनेनंतर शिर्डी विमानतळ इंटरग्लोब एव्हिएशन प्रायव्हेट लिमिटेड इंडिगो कंपनीचे कर्मचारी संतोष कोंडीबा चौरे रा. लोणी यांनी राहाता पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल केली. फिर्यादीनुसार पीडित एअर होस्टेसने याबाबत लेखी तक्रार दिली असून, आरोपी संदीप सुमेर सिंग (रा. गालड चुरू, राजस्थान) याच्याविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम ३५४ (विनयभंग) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक नितीन चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार पेटारे करत आहेत. या घटनेमुळे विमान प्रवासादरम्यान महिला कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

शिर्डीच्या साईबाबा संस्थानला धमकीचा मेल आल्याने खळबळ 

दरम्यान, शिर्डीच्या साईबाबा संस्थानला धमकीचा मेल आल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. शिर्डी साई मंदिर पाईप बॉम्बने उडवून देण्याच्या हा धमकीचा मेल अजित जोकामुल्ला नावाच्या मेल आयडी वरून आला असल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून या मेलच्या पार्श्वभूमीवर साईबाबा संस्थान सतर्क झाले आहे. रविवारी शिर्डीत साई भक्तांची मोठी गर्दी असून दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांची तपासणी करूनच त्यांना प्रवेश दिला जातोय. नवीन दर्शन रांगेच्या संकुलात जाण्यापूर्वी दर्शन रांगेच्या प्रवेशद्वारावरच साईबाबा संस्थानच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांकडून पुरुष व महिला या दोघांचीही कडक तपासणी केली जात आहे. कुठलीही संशयास्पद वस्तू मंदिर परिसरात जाणार नाही याची काळजी घेतली जात असून पोलीस यंत्रणा देखील साई मंदिर परिसरात गस्त घालताना दिसत आहे. 

आणखी वाचा 

Bilawal Bhutto on Indus Water Treaty : सिंधू नदीत रक्त सांडू म्हणणाऱ्या बिलावल भुट्टोंचा यू-टर्न; म्हणाले, मी सीमारेषेवर हातात बंदूक घेऊन...

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

ITC : केंद्र सरकारचा एक निर्णय अन् ITC चे 50 हजार कोटी स्वाहा, एलआयसीसह म्युच्युअल फंड्सचं देखील मोठं नुकसान
केंद्र सरकारचा एक निर्णय अन् ITC चे 50 हजार कोटी स्वाहा, एलआयसीसह म्युच्युअल फंड्सचं देखील मोठं नुकसान
Video: बजरंग सोनवणेंनी खिशातून काढलेली 500 ची नोट अजित पवारांनी नाकारली; व्हिडिओ व्हायरल
Video: बजरंग सोनवणेंनी खिशातून काढलेली 500 ची नोट अजित पवारांनी नाकारली; व्हिडिओ व्हायरल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 जानेवारी 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 जानेवारी 2026 | गुरुवार
मोठी बातमी : तिकीट नाकारल्यानंतर नरेश म्हस्केंचा मुलगा रोखठोक बोलला, म्हणाला, हट्टी मुलाचं ऐकलं जातं, पण....
तिकीट नाकारल्यानंतर नरेश म्हस्केंचा मुलगा रोखठोक बोलला, म्हणाला, हट्टी मुलाचं ऐकलं जातं, पण....

व्हिडीओ

Pune Mahapalika : एबी फॉर्म गिळल्याचा आरोप असलेले उद्धव कांबळे माझावर, म्हणाले मीच आहे उमेदवार!
Sanjay Raut PC : मराठी माणसाच्या तोंडावर पिचकाऱ्या मारण्याचा काम भाजपने केलं, संजय राऊतांचा घणाघात
Lay Bhari Award 2025 : लय भारी पुरस्कार 2025
Rahul Narvekar On Election : पराभव दिसू लागल्यानं राऊतांचे बिनबुडाचे आरोप, नार्वेकरांची टीका
Special Report Vanchit Congress:20जागांवर काँग्रेस वंचित,मुंबईत वंचितच्या निर्णयाने काँग्रेसची पळापळ

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ITC : केंद्र सरकारचा एक निर्णय अन् ITC चे 50 हजार कोटी स्वाहा, एलआयसीसह म्युच्युअल फंड्सचं देखील मोठं नुकसान
केंद्र सरकारचा एक निर्णय अन् ITC चे 50 हजार कोटी स्वाहा, एलआयसीसह म्युच्युअल फंड्सचं देखील मोठं नुकसान
Video: बजरंग सोनवणेंनी खिशातून काढलेली 500 ची नोट अजित पवारांनी नाकारली; व्हिडिओ व्हायरल
Video: बजरंग सोनवणेंनी खिशातून काढलेली 500 ची नोट अजित पवारांनी नाकारली; व्हिडिओ व्हायरल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 जानेवारी 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 जानेवारी 2026 | गुरुवार
मोठी बातमी : तिकीट नाकारल्यानंतर नरेश म्हस्केंचा मुलगा रोखठोक बोलला, म्हणाला, हट्टी मुलाचं ऐकलं जातं, पण....
तिकीट नाकारल्यानंतर नरेश म्हस्केंचा मुलगा रोखठोक बोलला, म्हणाला, हट्टी मुलाचं ऐकलं जातं, पण....
पुण्यातील पूजा मोरे ओक्साबोक्शी रडल्या, उमेदवारी मागे घेताना पतीलाही अश्रू अनावर; भाजपात हायव्होल्टेज ड्रामा
पुण्यातील पूजा मोरे ओक्साबोक्शी रडल्या, उमेदवारी मागे घेताना पतीलाही अश्रू अनावर; भाजपात हायव्होल्टेज ड्रामा
शिंदेंच्या शिवसेनेतही मोठी घराणेशाही; मुंबई महापालिकेसाठी अनेक आमदार-खासदारांच्या मुलांना उमेदवारी
शिंदेंच्या शिवसेनेतही मोठी घराणेशाही; मुंबई महापालिकेसाठी अनेक आमदार-खासदारांच्या मुलांना उमेदवारी
नांदेडमध्ये अशोक चव्हाणांनी 50 लाख घेऊन तिकीट दिलं, माजी नगरसेवकाचा आरोप, म्हणाले, मी 1980 पासून सोबत होतो
नांदेडमध्ये अशोक चव्हाणांनी 50 लाख घेऊन तिकीट दिलं, माजी नगरसेवकाचा आरोप, म्हणाले, मी 1980 पासून सोबत होतो
Gold Rate : गुड न्यूज, नववर्षाच्या पहिल्याच दिवशी सोने- चांदीच्या दरात घसरण, जाणून घ्या 22 आणि 24 कॅरेट सोन्याचा दर
गुड न्यूज, नववर्षाच्या पहिल्याच दिवशी सोने- चांदीच्या दरात घसरण, जाणून घ्या 22 आणि 24 कॅरेट सोन्याचा दर
Embed widget