एक्स्प्लोर

Crime News : मुलीचे लग्न लावण्यास नकार देणाऱ्या पित्याची हत्या करणाऱ्या तिघांना पुण्यातून अटक

Crime News Beed : अल्पवयीन मुलीच्या वडिलाची हत्या करून फरार झालेल्या तीन आरोपींच्या केज पोलिसांनी पुण्यातून मुसक्या आवळल्या.

Crime News Beed : मुलीचे लग्न लावून देण्यास नकार देणाऱ्या वडिलांची हत्या करणाऱ्या तिघांना अटक करण्यात आली आहे. पुण्यातून आरोपींच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले आहे. केज येथील एका तरुणाने  मुलीच्या वडिलांच्या डोक्यात लोखंडी रॉड घातला होता. उपचारा दरम्यान त्यांचे निधन झाले. न्यायालयाने तिन्ही आरोपींना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

९ एप्रिल रोजी केज-कळंब मार्गावर साळेगाव शिवारात शेख फरीद बाबा दर्गाजवळ असलेल्या संत सेना महाराज यांच्या मंदिरा जवळ रमेश एकनाथ नेहरकर (वय ४२, रा. धारूर रोड) हे केज ते कळंब मार्गावरून  मोटार सायकल वरून येत असताना आरोपीने त्यांच्या डोक्यात लोखंडी रॉडने मारून गंभीर जखमी केले होते. रमेश नेहरकर यांच्यावर अश्विनी हॉस्पिटल लातूर येथे उपचार सुरू होते. मात्र, ११ एप्रिल रोजी रमेश नेहरकर मृत्यू झाला.

प्रकरण काय?

केज तालुक्यातील तांबवा येथील भागवत चाटे याने रमेश नेहरकर यांच्या अल्पवयीन मुलीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल केला होता. या कृत्याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या रमेश नेहरकर यांना आरोपी भागवत साठे याने तुमच्या मुलीचे माझ्यासोबत लग्न लावून द्या, नाहीतर तुम्हाला जीव मारेल अशी धमकी दिली होती. या धमकीनंतर दुसऱ्या दिवशीच रमेश नेहरकर यांच्यावर केज कळंब रस्त्यावरील गांजी पाटीजवळ भागवत साठे व त्याच्या दोन साथीदारांनी प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात रमेश नेहरकर हे गंभीर जखमी झाले. जखमी उमेश नेहरकर यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र,  गंभीर जखमी झालेल्या नेहरकर यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. नेहरकर यांच्या मृत्यूनंतर संतप्त नातेवाईकांनी रमेश नेहरकर याचे प्रेत केज पोलीस ठाण्यात आणून आरोपींना अटक करण्याची मागणी केली होती. 

पोलिसांची कारवाई 

गुन्हा दाखल होताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर सेलचे पोलीस नाईक अनिल मंदे यांनी प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांचे मार्गदर्शनाखाली तपासी अधिकारी सहाय्यक सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष मिसळे व त्यांचे पथक आरोपींचा शोध घेण्यासाठी विविध ठिकाणी रवाना झाले होते.

रमेश नेहरकर यांच्या हत्येनंतर कुटुंबीय आणि ग्रामस्थ संतप्त झाले होते जोपर्यंत आरोपींना अटक करणार नाही तोपर्यंत नेहरकर यांचा मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका सुद्धा कुटुंबीयांनी घेतली होती. मात्र त्यानंतर या घटनेत आरोपी हे झाशी येथे फरार झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली. आरोपींच्या मोबाईलचे टॉवर लोकेशनवरून आरोपी हे केज वरून पुणे मार्गे झाशी येथे गेले. ते तिघे पुन्हा उत्तर प्रदेश या मार्गे परत पुणे येथे येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. मिळालेल्या माहितीचे तांत्रिक विश्लेषण करून त्याची खात्री होताच सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर मिसळे, त्यांच्या पथकातील अनिल मंदे व दिलीप गित्ते पुण्याला रवाना झाले. तिन्ही आरोपींना वाघोली येथून पोलिसांनी अटक केली.

मुख्य आरोपी भागवत संदिपान चाटे,  शिवशंकर हरिभाऊ इंगळे आणि रामेश्वर नारायण लंगे यांच्याविरुद्ध केज पोलीस ठाण्यात हात्याचा गुन्हा दाखल झाला होता

तपासात सायबर सेलची महत्त्वाची भूमिका 

हल्लेखोर ते वापरत असलेला मोबाईल बंद केला होता परंतु सायबर विभागाने अत्यंत खुबीने ते ज्यांच्या संपर्कात आहेत त्यांचे मोबाईल ट्रेस करून त्यांचे लोकेशन मिळविण्यात यश मिळविले. तिन्ही आरोपी पोलिसांच्या हाती लागू नयेत म्हणून राज्या बाहेर झाशीला गेले होते. परंतु ते पुन्हा रेल्वेने पुणे मार्गे दक्षिणेत जाण्याच्या तयारीत असताना ते पुणे येथे येताच पोलिसांनी त्यांना झडप घालून पुणे येथील वाघोली येथून ताब्यात घेतले. 

मागील काही वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Tiger Shroff Attack: टायगर श्रॉफ प्रकरणात मोठी अपडेट, मुंबई पोलिसांनी सुरतमधून रिव्हॉल्व्हर ताब्यात घेतली, आणखी तीन जण अटकेत
टायगर श्रॉफ प्रकरणात मोठी अपडेट, मुंबई पोलिसांनी सुरतमधून रिव्हॉल्व्हर ताब्यात घेतली, आणखी तीन जण अटकेत
Chhatrapati Sambhaji nagar Crime Bunty Dixit Case: छत्रपती संभाजीनगरमधील फेसबुक किंग बंटी दीक्षितचा भयानक शेवट, मित्रानेच संपवलं, लोखंडी रॉडने चेहरा बिघडवून टाकला
छत्रपती संभाजीनगरमधील फेसबुक किंग बंटी दीक्षितचा भयानक शेवट, मित्रानेच संपवलं, लोखंडी रॉडने चेहरा बिघडवून टाकला
Nashik Digital Arrest Case : धक्कादायक... नाशिकमधील एका सेवानिवृत्त पोलीस कर्मचाऱ्याला 20 दिवस डिजीटल अरेस्ट, 71 लाखांची लूट ...
नाशिकमधील एका सेवानिवृत्त पोलीस कर्मचाऱ्याला 20 दिवस डिजीटल अरेस्ट, 71 लाखांची लूट ...
Mira Bhayandar Crime News : अजित पवारांचा पीए असल्याचा दावा; सरकारी शाळेत शिक्षकाची नोकरी लावण्याचं आमिष; महिलेसह तिच्या मैत्रिणीला फसवलं, 21 लाख 46 हजार घेतले अन्...
अजित पवारांचा पीए असल्याचा दावा; सरकारी शाळेत शिक्षकाची नोकरी लावण्याचं आमिष; महिलेसह तिच्या मैत्रिणीला फसवलं, 21 लाख 46 हजार घेतले अन्...

व्हिडीओ

Manoj Jarange Audio Clip Bomb : ऑडिओ बॉम्ब कुणाला फोडणार घाम? | Special Report ABP Majha
Politics After Jarange Audio Clip : जरांगेंनी दिला 'पुरावा' मित्रांमध्येच दुरावा? | Special Report
Manoj Jarange News : एकनाथ शिंदेंचा कुठला नेता कुठे जातो, कुठे पैसे जातात, हे सगळं माहितीय
Manoj Jarange: 500 कोटींचा बॉम्ब, आता मनोज जरांगेंनी ऐकवली राज्याला हादरवणारी ऑडिओ क्लिप, पाहा संपूर्ण VIDEO
Raj Thackeray News : पुढच्या 2-5 महिन्यात देशात काहीतरी मोठं होईल, छोटा काळा असा येईल देशाला पंतप्रधान नसेल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dengue Death in Pune : आधी ताप अन् पोटदुखीचा त्रास; श्वास घेता येईना, प्लेटलेट्सची संख्या घसरली, पुण्यात डेंगीचा पहिला बळी; आठ वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
आधी ताप अन् पोटदुखीचा त्रास; श्वास घेता येईना, प्लेटलेट्सची संख्या घसरली, पुण्यात डेंगीचा पहिला बळी; आठ वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
Nitesh Karale: नितेश कराळेंची राष्ट्रवादी पक्षातून हकालपट्टी, कारवाईनंतर मास्तर ओक्साबोक्शी रडले; नंतर थेट आक्रमक इशारा देत म्हणाले, शरद पवारांविषयी आदर, पण...
नितेश कराळेंची राष्ट्रवादी पक्षातून हकालपट्टी, कारवाईनंतर मास्तर ओक्साबोक्शी रडले; नंतर थेट आक्रमक इशारा देत म्हणाले, शरद पवारांविषयी आदर, पण...
Chhatrapati Sambhaji nagar Crime Bunty Dixit Case: छत्रपती संभाजीनगरमधील फेसबुक किंग बंटी दीक्षितचा भयानक शेवट, मित्रानेच संपवलं, लोखंडी रॉडने चेहरा बिघडवून टाकला
छत्रपती संभाजीनगरमधील फेसबुक किंग बंटी दीक्षितचा भयानक शेवट, मित्रानेच संपवलं, लोखंडी रॉडने चेहरा बिघडवून टाकला
Maharashtra Live blog updates: विधानपरिषदेच्या पाच जागांसाठी आज मतदान, शिक्षक-पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीबाबत उत्सुकता
Maharashtra Live blog updates: विधानपरिषदेच्या पाच जागांसाठी आज मतदान, शिक्षक-पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीबाबत उत्सुकता
Sri Lanka vs England: रावळपिंडीच्या मैदानात इंग्रंजांविरोधात श्रीलंकन वादळ घोंगावलं! वनडेत तब्बल 430 धावांचा डोंगर पार केला, कॅप्टन हॅरी ब्रुकचं विश्वविक्रमी द्विशतक वाया गेलं
Video: रावळपिंडीच्या मैदानात इंग्रंजांविरोधात श्रीलंकन वादळ घोंगावलं! वनडेत तब्बल 430 धावांचा डोंगर पार केला, कॅप्टन हॅरी ब्रुकचं विश्वविक्रमी द्विशतक वाया गेलं
Raju Shetti: 'कर्नाटक सरकार तोडगा काढत आहे, पण देशात सर्वाधिक साखरेचे उत्पादन असणाऱ्या महाराष्ट्रातील सरकार..' राजू शेट्टींचा हल्लाबोल
'कर्नाटक सरकार तोडगा काढत आहे, पण देशात सर्वाधिक साखरेचे उत्पादन असणाऱ्या महाराष्ट्रातील सरकार..' राजू शेट्टींचा हल्लाबोल
पीएम मोदी म्हणाले, काही लोक परदेशात भारताची बदनामी करत आहेत, काँग्रेस आपली फेल प्राॅडक्ट सादर करण्यासाठी देशाला आणखी किती काळ धोक्यात घालणार?
पीएम मोदी म्हणाले, काही लोक परदेशात भारताची बदनामी करत आहेत, काँग्रेस आपली फेल प्राॅडक्ट सादर करण्यासाठी देशाला आणखी किती काळ धोक्यात घालणार?
Driving License Rule: ड्रायव्हिंग लायसन्स काढण्यासाठी आता पासिंग टक्केवारी बदलली, परिवहन मंत्रालयाकडून नवीन नियम तयार
ड्रायव्हिंग लायसन्स काढण्यासाठी आता पासिंग टक्केवारी बदलली, परिवहन मंत्रालयाकडून नवीन नियम तयार
Embed widget