एक्स्प्लोर

Badlapur School: पोलीस, संस्थाचालक कोणीही असो, जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करु, कोणालाही सोडणार नाही, मुख्यमंत्र्यांचा शब्द

Maharashtra Crime news: शाळेतील ज्या मुलींवर लैंगिक अत्याचार झाले आहेत, त्यापैकी एक मुलगी 3 वर्षे 8 महिन्यांची आहे. तर दुसरी मुलगी सहा वर्षांची आहे. शाळेच्या स्वच्छतागृहात नराधमाने या मुलींवर अत्याचार केले.

मुंबई: बदलापूरमध्ये एका नामांकित शाळेतील दोन चिमुकल्या मुलींवर सफाई कर्मचाऱ्याने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. संस्थाचालक आणि पोलिसांकडून  हे प्रकरण  दाबून टाकण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप होत आहे. पोलिसांनी याप्रकरणी पीडित मुलींच्या पालकांची तक्रार नोंदवून घ्यायला 12 तास लावले. त्यामुळे पालक आणि बदलापूरमधील नागरिक प्रचंड संतापले होते. या संतप्त नागरिकांनी मंगळवारी सकाळी हजारोंच्या संख्येने शाळेवर मोर्चा काढला होता. त्यानंतर नागरिकांनी बदलापूरमध्ये रेल्वे ट्रॅकवर उतरत मध्य रेल्वेची वाहतूक रोखून धरली होती. नागरिकांच्या या संतप्त प्रतिसादानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 'एबीपी माझा'शी संवाद साधताना या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले.

मुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले? 

मी पोलीस आयुक्तांशी स्वत: बोललो, त्या आरोपीला अटक झाली आहे, जे आरोपी आहेत त्यांना कठोर शिक्षा होईल, पोक्सो अंतर्गत कलमं लावायला सांगितलं आहे, फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवला जाईल, आरोपीला कठोर शिक्षा होईल. या खटल्यास विशेष पीपी नेमण्यास सांगितलं आहे. संस्था चालकांचीही चौकशी करुन जे दोषी असतील तर त्यांच्यावरही कारवाई करु. पोलिसांनी आरोपींना अरेस्ट केलं आहे, पोलिसांना अटेम्पट टू रेप हा खटला दाखल करायला सांगितलं आहे.. संस्थाचलकांनीही कर्मचारी ठेवताना बॅकग्राऊंड तपासलं पाहिजे, जर तसं झालं नसेल तर त्यांच्यावरही कारवाई होईल.अत्यंत कठोर कारवाई करु, पोलीस, गृह विभाग आणि सरकार पूर्ण कठोर कारवाई करण्याच्या बाजूने असतील. कोणी पोलीस असतील जे यात दोषी आढळले तर त्यांनाही सोडणार नाही, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. 

पोलिसांनी तक्रार दाखल न करुन घेतल्याने नागरिक संतापले: शंभुराज देसाई

या प्रकरणाबाबत ठाण्याचे पालकमंत्री शंभुराज देसाई यांनी प्रतिक्रिया दिली. त्यांनी म्हटले की, ही दुर्दैवी घटना आहे. याबाबत चौकशी करण्याचे आदेश पोलीस ठाण्याला दिले आहेत. ज्या संस्थेची शाळा आाहे, व्यवस्थापन आहे, मुख्याधापक असेल त्यांनी अशा गोष्टींकडे दुर्लक्ष का केलं, याची शिक्षण विभागामार्फत चौकशी करा असं सांगितलं आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करुन घेणयास उशीर केल्याने लोकांचा संयम सुटला, अशी माहिती मला मिळाली. हा प्रकार घडला तेव्हा पोलीस ठाण्यात कोण प्रभारी होते,कोणाची ड्युटी होती, याचा अहवाल पोलीस उपायुक्तांना दोन दिवसांत सादर करण्याचे अहवाल देण्यात आले आहेत. याप्रकरणात पोलीस दोषी असतील तर त्यांच्यावरही कारवाई केली जाईल, असे मंत्री शंभुराज देसाई यांनी सांगितले.

आणखी वाचा

“ए आई मला शुच्या जागी मुंग्या चावताहेत….” बदलापूरच्या शाळेत चिमुरडीवर अत्याचार, अंगावर काटा आणणारी पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

हॉस्टेलच्या वादातून लातूरमध्ये हाणामारी, तरुणाचा भोसकून खून, तर दोन जण जखमी, चार जणांना अटक
हॉस्टेलच्या वादातून लातूरमध्ये हाणामारी, तरुणाचा भोसकून खून, तर दोन जण जखमी, चार जणांना अटक
पोटच्या मुलानेच आईला संपवलं, धक्कादायक घटनेनं अहिल्यानगर हादरलं, आरोपी पोलिसांच्या ताब्यात
पोटच्या मुलानेच आईला संपवलं, धक्कादायक घटनेनं अहिल्यानगर हादरलं, आरोपी पोलिसांच्या ताब्यात
Beed : सोशल मीडियावर स्टेटस ठेवण्यावरून हाणामारी, बीडच्या आष्टीत 20 वर्षीय तरुणाचा मृत्यू
सोशल मीडियावर स्टेटस ठेवण्यावरून हाणामारी, बीडच्या आष्टीत 20 वर्षीय तरुणाचा मृत्यू
बुलेटवरुन मुलींना कट मारण्याचा स्टंट; भीषण अपघातात 19 वर्षीय दोन तरुणांचा मृत्यू, नागपूरमधील घटना
बुलेटवरुन मुलींना कट मारण्याचा स्टंट; भीषण अपघातात 19 वर्षीय दोन तरुणांचा मृत्यू, नागपूरमधील घटना

व्हिडीओ

Mulund Metro Slab  : मुलुंडमधील मेट्रो स्लॅब अपघात प्रकरण, 2 कंपन्याना काळ्या यादीत टाकणार
Sanjay Raut PC : अजितदादांची 'ती' फाईल ते अमित शाहांवर निशाणा, राऊतांची स्फोटक पत्रकार परिषद
Asawari Jagdale Pune : एबीपी माझाच्या बातमीनंतर आसावरी जगदाळे यांना नोकरी मिळाली
Malegaon Tipu Sultan : टिपू सुलतानचा फोटो संविधानात आहे हे भाजपला माहितच नाही
Ajit Pawar Black Box Investigation : ब्लॅक बॉक्स परदेशात? गुप्तहेर राज्यात Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vaibhav suryavanshi: तडाखेबंद फलंदाज वैभव सूर्यवंशीची 10 वीच्या बोर्ड परीक्षेला दांडी; प्रिंसिपल सिन्हांनी स्पष्टच सांगितलं पुढं काय
तडाखेबंद फलंदाज वैभव सूर्यवंशीची 10 वीच्या बोर्ड परीक्षेला दांडी; प्रिंसिपल सिन्हांनी स्पष्टच सांगितलं पुढं काय
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 फेब्रुवारी 2026 | मंगळवार
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 फेब्रुवारी 2026 | मंगळवार
महापशुधन एक्स्पोसाठी 3 कोटींचा मंडप, स्वत:वरील गाण्यासाठी आनंद शिंदेंना कोट्यवधी दिले; करुणा शर्मांचा गंभीर आरोप
महापशुधन एक्स्पोसाठी 3 कोटींचा मंडप, स्वत:वरील गाण्यासाठी आनंद शिंदेंना कोट्यवधी दिले; करुणा शर्मांचा गंभीर आरोप
भारत-अमेरिका व्यापारी करार अंतिम टप्प्यात; भारतीय टीम पुढील आठवड्यात US दौऱ्यावर 
भारत-अमेरिका व्यापारी करार अंतिम टप्प्यात; भारतीय टीम पुढील आठवड्यात US दौऱ्यावर 
2026 चे वर्ष दोन्ही देशांसाठी ट्रर्निंग पाँईंट; मोदींचं फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांसमोर भाषण, सावरकरांच्या उडीची आठवण
2026 चे वर्ष दोन्ही देशांसाठी ट्रर्निंग पाँईंट; मोदींचं फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांसमोर भाषण, सावरकरांच्या उडीची आठवण
सुनिल तटकरेंची रवींद्र चव्हाणांसोबत ZP पे चर्चा; राष्ट्रवादीच्या नेत्यांचं मुख्यमंत्र्यांना निवेदन, CBI चौकशीची मागणी
सुनिल तटकरेंची रवींद्र चव्हाणांसोबत ZP पे चर्चा; राष्ट्रवादीच्या नेत्यांचं मुख्यमंत्र्यांना निवेदन, CBI चौकशीची मागणी
Rohit Pawar and Ajit Pawar: राष्ट्रवादीतील स्वत:चं महत्त्व टिकवण्यासाठी काही नेते शरद पवारांना विरोध करतायत, आमदारांनाही धमकावलं? रोहित पवारांचा खळबळनजक दावा
राष्ट्रवादीतील स्वत:चं महत्त्व टिकवण्यासाठी काही नेत्यांचा शरद पवारांना विरोध, आमदारांना धमकावलं? रोहित पवारांचा खळबळजनक दावा
बुलेटवरुन मुलींना कट मारण्याचा स्टंट; भीषण अपघातात 19 वर्षीय दोन तरुणांचा मृत्यू, नागपूरमधील घटना
बुलेटवरुन मुलींना कट मारण्याचा स्टंट; भीषण अपघातात 19 वर्षीय दोन तरुणांचा मृत्यू, नागपूरमधील घटना
Embed widget