एक्स्प्लोर

विभागीय क्रीडा संकुल घोटाळा प्रकरण, बँक अधिकारी अन् क्रीडा उपसंचालकाच्या सांगण्यावरून घोटाळा, आरोपीचे पोलिसांना सात पानांचं पत्र 

Chhatrapati Sambhajinagar: छत्रपती संभाजीनगरच्या विभागीय क्रीडा संकुलात 21 कोटी 59 लाख 38 हजार 287 रुपयांचा घोटाळा करून पळून गेलेल्या आरोपी हर्षकुमार क्षीरसागर यांच्या बाबतीत एक मोठी बातमी समोर आलीय.

Chhatrapati Sambhajinagar Crime : छत्रपती संभाजीनगरच्या विभागीय क्रीडा संकुलात 21 कोटी 59 लाख 38 हजार 287 रुपयांचा घोटाळा करून पळून गेलेल्या आरोपी हर्षकुमार क्षीरसागर यांच्या बाबतीत एक मोठी बातमी समोर आली आहे. यात हर्षकुमार क्षीरसागर याने पोलिसांना सात पानांचे पत्र पाठवून बँक अधिकारी आणि विभागीय क्रीडा उपसंचालकांच्या सांगण्यावरूनच मी हा निधी लंपास केल्याचा दावा केलाय. उपसंचालकांनी मला जीवे मारण्याची धमकी दिली आणि माझ्या कडून हे सगळं करून घेतलं, सगळी संपत्ती मी संजय सबनीस यांच्या धमकीमुळे माझ्या नावावर घेतली. ही संपत्ती विकून सगळे पैसे वसूल करावे आणि सबनीस याना अटक करावी,  अशी मागणी हर्षकुमार याने केली आहे. हे पत्र त्यांनी पोस्टाद्वारे पोलिसांना पाठवला आहे.

अवघ्या 11 महिन्यांत 21.59 कोटींचा घोटाळा

छत्रपती संभाजीनगरच्या विभागीय क्रीडा संकुलाच्या कामात कोट्यवधींचा घोटाळा करून पसार झालेल्या हर्षकुमार क्षीरसागर याची मैत्रीण अर्पिताला पोलिसांनी शनिवारी नवी मुंबईच्या कोपरखैरणे भागातून अटक केली. हर्षकुमारच्या आणखी संपत्ती आणि घोटाळ्याच्या रकमेबाबत तिच्याकडून मोठा उलगडा होण्याची शक्यता आहे. अवघ्या 11 महिन्यांत 21.59 कोटींचा घोटाळा करणाऱ्या हर्षकुमारने अर्पिताला देखील या घोटाळ्याचा भागीदार केले होते. विमानतळासमोरील उच्चभ्रू सोसायटीमध्ये अर्पिताच्या नावानेच दीड कोटी रुपयांचा लक्झरियस फ्लॅट खरेदी केला होता. महत्त्वाचं म्हणजे हा फ्लॅट खरेदी करताना ते दोघे हजर होते आणि हा फ्लॅट रोखीने विकत द्यावा, अशी गळ हे मंडळी बिल्डरला घालत असल्याचं पुढे आलेला आहे.

कसा केला घोटाळा?

या प्रकरणातील मुख्य आरोपी क्षीरसागर याने क्रीडा उपसंचालकांच्या नावाचा आणि स्वाक्षरीचा बनावट वापर केला. त्याने बँकेला बनावट मजकुराचे पत्र पाठवून बँक खात्याला स्वतःचा मोबाइल क्रमांक जोडला. मोबाईल नंबर जोडल्यानंतर नेट बँकिंगची सुविधा सुरू करून खात्यातून मोठ्या प्रमाणात पैसे स्वतःच्या खात्यात ट्रान्स्फर केले. हा संपूर्ण प्रकार होत असताना क्रीडा उपसंचालक आणि बँकेतील अधिकाऱ्यांना याची जाणीव कशी झाली नाही, यावर प्रश्नचिन्ह आहे. इतक्या मोठ्या आर्थिक गैरव्यवहारानंतरही क्रीडा संकुलाच्या उपसंचालकांना किंवा बँकेतील जबाबदार अधिकाऱ्यांना याचा पत्ता कसा लागला नाही, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. तसेच, आयकर विभागाकडूनही कोणतीही नोटीस न आल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींकडून आणखी माहिती मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. घोटाळ्यात इतर कोणी सहभागी आहेत का, याचा तपास आर्थिक गुन्हे शाखा करत आहे. सरकारी निधीवर असे दुरुपयोग होणे ही गंभीर बाब असून, दोषींवर कठोर कारवाई होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

हे ही वाचा 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nashik : नाशिक जिल्हा रुग्णालयातून पाच दिवसांच्या बाळाची चोरी, कुटुंबीयांशी ओळख वाढवून महिलेने बाळाला पळवले
नाशिक जिल्हा रुग्णालयातून पाच दिवसांच्या बाळाची चोरी, कुटुंबीयांशी ओळख वाढवून महिलेने बाळाला पळवले
Ashish Jaiswal : मनोज जरांगेंच्या डोक्यात फरक पडला असून ते वैफल्यग्रस्त झालेत; मंत्री आशिष जयस्वालांची जहरी टीका
मनोज जरांगेंच्या डोक्यात फरक पडला असून ते वैफल्यग्रस्त झालेत; मंत्री आशिष जयस्वालांची जहरी टीका
Nitin Gadkari: खोटारडा पंतप्रधान आमच्यावर बसवण्यापेक्षा तुम्हीच ती गादी का घेत नाही? बी जे कोळसे पाटलांनी गडकरींना सूचवताच शिट्ट्या अन् टाळ्यांचा गजर!
खोटारडा पंतप्रधान आमच्यावर बसवण्यापेक्षा तुम्हीच ती गादी का घेत नाही? बी जे कोळसे पाटलांनी गडकरींना सूचवताच शिट्ट्या अन् टाळ्यांचा गजर!
फेक आयडी तयार करून तब्बल सातशे महिलांकडून घेतली खंडणी! बंबल-स्नॅपचॅटवर तसले फोटो घेत व्हायरल करण्याची धमकी
फेक आयडी तयार करून तब्बल सातशे महिलांकडून घेतली खंडणी! बंबल-स्नॅपचॅटवर तसले फोटो घेत व्हायरल करण्याची धमकी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Bageshwar Baba : बागेश्वरबाबांच्या कार्यक्रमात चेंगराचेंगरी, विभुती घेण्यासाठी भाविकांची तुफान गर्दी!ABP Majha Marathi News Headlines 07 PM TOP Headlines 04 January 2024ABP Majha Marathi News Headlines 06 PM TOP Headlines 04 January 2024100 Headlines | 100 हेडलाईन्स बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik : नाशिक जिल्हा रुग्णालयातून पाच दिवसांच्या बाळाची चोरी, कुटुंबीयांशी ओळख वाढवून महिलेने बाळाला पळवले
नाशिक जिल्हा रुग्णालयातून पाच दिवसांच्या बाळाची चोरी, कुटुंबीयांशी ओळख वाढवून महिलेने बाळाला पळवले
Ashish Jaiswal : मनोज जरांगेंच्या डोक्यात फरक पडला असून ते वैफल्यग्रस्त झालेत; मंत्री आशिष जयस्वालांची जहरी टीका
मनोज जरांगेंच्या डोक्यात फरक पडला असून ते वैफल्यग्रस्त झालेत; मंत्री आशिष जयस्वालांची जहरी टीका
Nitin Gadkari: खोटारडा पंतप्रधान आमच्यावर बसवण्यापेक्षा तुम्हीच ती गादी का घेत नाही? बी जे कोळसे पाटलांनी गडकरींना सूचवताच शिट्ट्या अन् टाळ्यांचा गजर!
खोटारडा पंतप्रधान आमच्यावर बसवण्यापेक्षा तुम्हीच ती गादी का घेत नाही? बी जे कोळसे पाटलांनी गडकरींना सूचवताच शिट्ट्या अन् टाळ्यांचा गजर!
फेक आयडी तयार करून तब्बल सातशे महिलांकडून घेतली खंडणी! बंबल-स्नॅपचॅटवर तसले फोटो घेत व्हायरल करण्याची धमकी
फेक आयडी तयार करून तब्बल सातशे महिलांकडून घेतली खंडणी! बंबल-स्नॅपचॅटवर तसले फोटो घेत व्हायरल करण्याची धमकी
मी खडसेंच्या नार्को टेस्टची मागणी केली, तेव्हा शरद पवारांनी ऐकलं का? गिरीश महाजनांकडून धनंजय मुंडेंची पाठराखण
मी खडसेंच्या नार्को टेस्टची मागणी केली, तेव्हा शरद पवारांनी ऐकलं का? गिरीश महाजनांकडून धनंजय मुंडेंची पाठराखण
मोठी बातमी! जम्मू-काश्मीरमध्ये भीषण अपघात, भारतीय लष्कराचं वाहन दरीत कोसळलं, 4 जवान शहीद
मोठी बातमी! जम्मू-काश्मीरमध्ये भीषण अपघात, भारतीय लष्कराचं वाहन दरीत कोसळलं, 4 जवान शहीद
Dada Bhuse : शिक्षकांवरील निवडणुका आणि सर्व्हेचा अतिरिक्त ताण कमी करणार; शिक्षणमंत्री दादा भुसेंचं आश्वासन
शिक्षकांवरील निवडणुका आणि सर्व्हेचा अतिरिक्त ताण कमी करणार; शिक्षणमंत्री दादा भुसेंचं आश्वासन
DYSP Ramachandrappa Video : तक्रार करण्यासाठी आलेल्या महिलेला डीवायएसपी थेट केबीनच्या बाथरुममध्ये घेऊन गेला, हलकट कृत्य करताना खिडकीतून सापडला! 35 सेकंदाचा व्हिडिओ व्हायरल
Video : तक्रार करण्यासाठी आलेल्या महिलेला डीवायएसपी थेट केबीनच्या बाथरुममध्ये घेऊन गेला, हलकट कृत्य करताना खिडकीतून सापडला!
Embed widget