Chhatrapati Sambhajinagar Crime: वाळूच्या पैशांनी गब्बर झालेल्या माफियांचा तहसील पथकावर हल्ला, अधिकाऱ्यांवर दगडफेक, सिल्लोडमधील धक्कादायक घटना
वाळू माफियांचा सिल्लोड तालुक्यात धुमाकूळ सुरू असून तस्करी रोखणारी यंत्रणा हतबल झाली आहे.नदीपात्रांना लागलेल्या वाळूचोरीचे ग्रहण थांबता थांबत नसल्याचे चित्र आहे.

Chhatrapati Sambhajinagar Crime: राज्यात वाळूतून गब्बर झालेल्या वाळूमाफियांची दहशत वाढली असून या गब्बरांना टोकणारा, कारवाई करणाऱ्यांना कसं टाचेखाली ठेवायचं हे वाळूमाफियांना शिकवावं लागत नाही. सिल्लोड तालुक्यातील उपळी शिवारात वाळू माफियांनी गुरुवारी रात्री (13 फेब्रुवारी) (Sand Mafia Terror)
तहसीलच्या पथकावर हल्ला चढवत दहशत निर्माण केली. माफियांनी रात्रीच्या सुमारास वाहनांवर दगडफेक करत कर्मचाऱ्यांना धाकात ठेवण्याचा प्रयत्न केला. या घटनेत महसूल पथकातील नऊ अधिकारी-कर्मचारी थोडक्यात बचावले असून, याप्रकरणी ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.(Sillod)
वाळू माफियांचा सिल्लोड तालुक्यात धुमाकूळ सुरू असून तस्करी रोखणारी यंत्रणा हतबल झाली आहे.नदीपात्रांना लागलेल्या वाळूचोरीचे ग्रहण थांबता थांबत नसून, रात्रीच्या सुमारास नदीपात्रांमध्ये वाळूमाफियांचा वाळू उत्खननासाठी धुमाकूळ सुरू आहे. प्रशासनावर पाळत ठेवून गुंगारा देऊन वाळूची वाहतूक करण्यात येते. यंत्रणा कितीही ॲक्शन मोडवर आली तरी नदीपात्रातून वाळू उपसा रोखण्यासाठी, वाळूमाफियांवर कारवाई करण्यासाठी यंत्रणा कूचकामी ठरत असल्याचं दिसून येत आहे. (Chhatrapati Sambhajinagar Crime)
घटनास्थळी दहशतीचं वातावरण
सिल्लोड तालुक्यातील उपळी शिवारात अनेक दिवसांपासून अवैध वाळू उपसा सुरू असल्याची तक्रार महसूल विभागाकडे आली होती. त्यानुसार, तहसीलदारांच्या मार्गदर्शनाखाली महसूल पथकाने छापा टाकण्याचे ठरवले. मात्र, ही माहिती माफियांना मिळताच त्यांनी रात्रीच्या अंधारात पथकावर दगडफेक केली.या घटनेत महसूल पथकातील नऊ अधिकारी-कर्मचारी थोडक्यात बचावले. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे महसूल कर्मचाऱ्यांमध्ये घबराट पसरली.
वाळू माफियांची मुजोरी वाढली
सिल्लोड तालुक्यात नदीपात्रात मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा सुरू असून, महसूल विभागाच्या कारवायांना माफियांकडून सातत्याने विरोध केला जात आहे. महसूल विभाग आणि पोलिस प्रशासनाने यावर कठोर पावले उचलण्याची गरज आहे. या प्रकरणी महसूल विभागाच्या तक्रारीवरून ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तपास सुरू केला असून, हल्लेखोरांना लवकरात लवकर अटक करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सांगण्यात आले.
हेही वाचा
Beed Crime: बीडमध्ये वाल्मिक कराडची बी टीम ॲक्टिव्ह, पोलिसांचं दुर्लक्ष; धनंजय देशमुखांचा गंभीर आरोप
























