एक्स्प्लोर

मोठी बातमी : मुंबईतील 50 रुग्णालय बॉम्बने उडवण्याची धमकी, पालिका मुख्यालयासह महाविद्यालयांनाही आले धमकीचे ईमेल

Mumbai Crime News : मुंबईतील 50 हून अधिक रुग्णालयांना बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली असून महाविद्यालयांनाही धमकीचे ईमेल आले आहेत.

मुंबई : मुंबईतील 50 हून अधिक रुग्णालयांमध्ये धमकीचा मेल आला आहे. मुंबईतील 50 हून अधिक रुग्णालयांना बॉम्बने उडवण्याची धमकीचा मेल (Bomb Threat) पाठवण्यात आला आहे. मुंबई पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईतील अनेक प्रसिद्ध रुग्णालयांमध्ये धमकीचे ईमेल आले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ईमेल पाठवणाऱ्याने रुग्णालयांच्या बेड आणि बाथरूमच्या खाली बॉम्ब ठेवून रुग्णालय उडवण्याची धमकी दिली आहे.

मुंबईतील रुग्णालये बॉम्बने उडवण्याची धमकी

एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, धमकीचा ईमेल पाठवणाऱ्याने आपली ओळख लपवण्यासाठी व्हीपीएन नेटवर्कचा वापर करून सर्व ईमेल पाठवले आहेत. हा ईमेल मुंबईतील जसलोक हॉस्पिटल, रहेजा हॉस्पिटल, सेव्हन हिल हॉस्पिटल, कोहिनूर हॉस्पिटल, केईएम हॉस्पिटल, जेजे हॉस्पिटल, सेंट जॉर्ज हॉस्पिटल आणि अन्य हॉस्पिटलमध्ये आल्याचीही माहिती सूत्रांनी म्हटलं आहे.

50 हून अधिक रुग्णालयांना धमकीचा ईमेल

एका अधिकाऱ्याने यासंदर्भात माहिती देताना सांगितलं आहे की, एकाच ईमेलमध्ये लिहिलेला हा धमकीचा ईमेल 50 हून अधिक रुग्णालयांना पाठवण्यात आला आहे, असे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, रुग्णालयांना धमकीचा ईमेल मिळताच त्यांनी पोलिसांना कळवले. यानंतर पोलीस आणि बॉम्ब निकामी पथकाने रुग्णालयात जाऊन तपासणी केली असता पोलिसांना कोणतीही संशयास्पद वस्तू आढळून आली नाही.

पोलिसांकडून प्रकरणाचा शोध सुरु

मुंबई पोलिसांना प्राथमिक तपासानंतर मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील अनेक नामांकित रुग्णालयांना त्यांच्या ईमेल आयडीवर हा धमकीचा ईमेल आला आहे आणि धमकीचा ईमेल बीबल डॉट कॉम नावाच्या वेबसाइटचा वापर करून पाठवण्यात आला आहे. पोलिसांनी सांगितलं की, धमकीचा ईमेल पाठवणारी व्यक्ती अद्याप सापडलेली नाही. धमकीचा ईमेल पाठवण्यामागचा हेतू काय होता, याचा पोलीस सध्या शोध घेत आहेत. 

आता महाविद्यालयांनाही धमकीचे ईमेल

मुंबईतील रुग्णालयांपाठोपाठ आता महाविद्यालयांनाही धमकीचे ईमेल आले आहेत. मुंबईच्या हिंदुजा कॉलेज ऑफ कॉमर्समध्ये धमकीचा ईमेल आला आहे. ईमेल करणाऱ्याने कॉलेज बॉम्बने उडवून देण्याची धमकी दिली. धमकीचा ईमेल मिळाल्यानंतर, कॉलेज प्रशासनाने जवळच्या पोलिस स्टेशनला यासंदर्भात माहिती दिली. त्यानंतर स्थानिक पोलिस आणि बॉम्बशोधक पथकाचे अधिकारी आले आणि त्यांनी तपास केला पण काहीही संशयास्पद आढळलं नाही. मुंबईचे व्हीपी रोड पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

बीएमसी मुख्यालयाला धमकीचा ईमेल

मुंबईतील रुग्णालय आणि महाविद्यालयानंतर बीएमसी मुख्यालयाला धमकीचा ईमेल आला आहे. मुंबईतील बीएमसी मुख्यालयाला धमकीचा ईमेल आला. ईमेलद्वारे मुख्यालय उडवून देण्याची धमकी दिली. पोलिसांनी बीएमसीच्या मुख्यालयात तपास केला पण त्यात काहीही संशयास्पद आढळलं नाही. या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात ई-मेल पाठवणाऱ्या व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Vasai Crime : 6 वर्ष प्रेमसंबंध, महिन्यापूर्वी ब्रेकअप, संशयाचं भूत, वसईत भर रस्त्यात प्रेयसीला संपवलं!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Narayan Rane on Vinod Tawde: विनोद तावडेंबाबत नारायण राणेंचं महत्त्वाचं वक्तव्य, म्हणाले, 'त्यांना दिलेली वागणूक मला आवडली नाही'
विनोद तावडेंबाबत नारायण राणेंचं महत्त्वाचं वक्तव्य, म्हणाले, 'त्यांना दिलेली वागणूक मला आवडली नाही'
Jharkhand Election 2024 : मतदान करायला लागतंय! महाराष्ट्राच्या तुलनेत झारखंमध्ये मतदानाची टक्केवारी सुसाट, पहिल्या चार तासातच मतदारांचा जोर
मतदान करायला लागतंय! महाराष्ट्राच्या तुलनेत झारखंमध्ये मतदानाची टक्केवारी सुसाट, पहिल्या चार तासातच मतदारांचा जोर
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: मुंबईत मतदानाचा पॅटर्न बदलणार, मलबार हिल आणि भांडूपमध्ये सर्वाधिक मतदान, वरळी-माहीममध्ये काय स्थिती?
मुंबईत मतदानाचा पॅटर्न बदलणार, मलबार हिल आणि भांडूपमध्ये सर्वाधिक मतदान, वरळी-माहीममध्ये काय स्थिती?
Exit poll: मतदानानंतरचा एक्झिट पोल कधी अन् कुठं पाहाल? राज्यात महायुती की महाविकास आघाडी, कुणाला कौल
मतदानानंतरचा एक्झिट पोल कधी अन् कुठं पाहाल? राज्यात महायुती की महाविकास आघाडी, कुणाला कौल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sanjay Raut Vidhan Sabha Election : मिंधे गटाने पैसे वाटपासाठी खास माणसं ठेवली - संजय राऊतDevendra Fadnavis On Vidhan Sabha : यंदा महिला मतदार गॅप भरु काढतील; फडणवीसांचं महत्त्वाचं वक्तव्यSharad Pawar Vidhan Sabha Election 2024 : महाराष्ट्राचं भवितव्य नागरिकांच्या मतांमध्ये - शरद पवारVinod Tawde PC : आरोपानंतर विनोद तावडेंच मतदान, सुप्रिया सुळे, राहुल गांधींना दिलं प्रत्युत्तर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Narayan Rane on Vinod Tawde: विनोद तावडेंबाबत नारायण राणेंचं महत्त्वाचं वक्तव्य, म्हणाले, 'त्यांना दिलेली वागणूक मला आवडली नाही'
विनोद तावडेंबाबत नारायण राणेंचं महत्त्वाचं वक्तव्य, म्हणाले, 'त्यांना दिलेली वागणूक मला आवडली नाही'
Jharkhand Election 2024 : मतदान करायला लागतंय! महाराष्ट्राच्या तुलनेत झारखंमध्ये मतदानाची टक्केवारी सुसाट, पहिल्या चार तासातच मतदारांचा जोर
मतदान करायला लागतंय! महाराष्ट्राच्या तुलनेत झारखंमध्ये मतदानाची टक्केवारी सुसाट, पहिल्या चार तासातच मतदारांचा जोर
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: मुंबईत मतदानाचा पॅटर्न बदलणार, मलबार हिल आणि भांडूपमध्ये सर्वाधिक मतदान, वरळी-माहीममध्ये काय स्थिती?
मुंबईत मतदानाचा पॅटर्न बदलणार, मलबार हिल आणि भांडूपमध्ये सर्वाधिक मतदान, वरळी-माहीममध्ये काय स्थिती?
Exit poll: मतदानानंतरचा एक्झिट पोल कधी अन् कुठं पाहाल? राज्यात महायुती की महाविकास आघाडी, कुणाला कौल
मतदानानंतरचा एक्झिट पोल कधी अन् कुठं पाहाल? राज्यात महायुती की महाविकास आघाडी, कुणाला कौल
Kolhapur District Assembly Constituency : कोल्हापूर जिल्ह्यात पहिल्या चार तासात करवीर अन् राधानगरीत मतदानाचा वेग वाढला; दक्षिण,उत्तर अन् कागलमध्ये काय घडतंय?
कोल्हापूर जिल्ह्यात पहिल्या चार तासात करवीर अन् राधानगरीत मतदानाचा वेग वाढला; दक्षिण,उत्तर अन् कागलमध्ये काय घडतंय?
Suhas Kande vs Sameer Bhujbal : सुहास कांदे म्हणाले, आज तुझा मर्डर फिक्स, समीर भुजबळ म्हणतात, अरे, तुझ्यासारखे 56 पाहिलेत; नांदगावात वातावरण तापलं!
सुहास कांदे म्हणाले, आज तुझा मर्डर फिक्स, समीर भुजबळ म्हणतात, अरे, तुझ्यासारखे 56 पाहिलेत; नांदगावात वातावरण तापलं!
Maharashtra Assembly Election Voting 2024: राज्यातील 15 मतदारसंघांत खटाखट मतदान, मुंबईत किती टक्के मतदान?
राज्यातील 15 मतदारसंघांत खटाखट मतदान, सर्वाधिक मतदान कुठे? मुंबईत किती टक्के मतदान?
एकीकडे मतदान केंद्राबाहेर EVM मशीन हॅकिंगसाठी राऊटर? दुसरीकडे 94 कोटी 68 लाखांच्या चांदीच्या विटा सापडल्याने खळबळ
एकीकडे मतदान केंद्राबाहेर EVM मशीन हॅकिंगसाठी राऊटर? दुसरीकडे 94 कोटी 68 लाखांच्या चांदीच्या विटा सापडल्याने खळबळ
Embed widget