धक्कादायक! भाजप नेत्याला रात्रीच्या काळोखात गोळ्या घालून संपवलं, अज्ञात आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरू
BJP Leader Murder: 50 वर्षीय भाजप नेत्याची हत्या नेमकी का करण्यात आली? याचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू आहे.
![धक्कादायक! भाजप नेत्याला रात्रीच्या काळोखात गोळ्या घालून संपवलं, अज्ञात आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरू BJP leader shot dead in dark of night police search for unknown accused Patna BJP Leader Murder धक्कादायक! भाजप नेत्याला रात्रीच्या काळोखात गोळ्या घालून संपवलं, अज्ञात आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरू](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/08/13/18e1ae453d497039878dc1d0599778dc1723537900644208_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Patna BJP Leader Murder: पाटणा : भाजप नेत्याला (BJP Leader) रात्रीच्या काळोखात गोळ्यी झाडून संपवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. राजधानी पाटणामध्ये (Patna) डेअरी बूथ ऑपरेटर असलेल्या भाजप नेत्याची अज्ञातांनी गोळ्या झाडून हत्या केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना मंगळवारी (13 ऑगस्ट) रात्री घडली. आलमगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बजरंगपुरी कालव्याजवळ रात्री दहाच्या सुमारास ही हत्या करण्यात आली. 50 वर्षीय अजय साह याची हत्या का करण्यात आली? याचं कारण मात्र, अद्याप अस्पष्ट आहे. खून केल्यानंतर दुचाकीवर आलेले दोन्ही चोरटे पळून गेले. दरम्यान, घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली असून याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे. प्राथमिक अंदाजानुसार, हत्या पूर्ववैमन्सातून करण्यात आल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे.
एफएसएल टीम घटनास्थळी
भाजप नेत्याच्या हत्येची माहिती मिळताच पाटणा शहराचे एएसपी घटनास्थळी पोहोचले. या घटनेशी संबंधित प्रत्येक मुद्द्यावर पोलीस तपास करत आहेत. घटनास्थळी पोहोचलेले पाटणा शहराचे एएसपी शरथ आरएस यांनी या प्रकरणाची माहिती देताना सांगितलं की, एफएसएल टीमला पाचारण करण्यात आलं आहे. कुटुंबीयांचे जबाब घेण्यात येत आहेत. दोन क्रमांकाचे बदमाश बूथवर पोहोचले आणि नंतर बाचाबाची झाल्यानंतर त्यांनी गोळीबार केला.
दिनांक 13.08.24 को #आलमगंज थानान्तर्गत बजरंगपुरी में बाईक सवार 02 अज्ञात अपराधकर्मी के द्वारा एक व्यक्ति को गोली मारकर हत्या कर देने की सूचना प्राप्त हुई।
— Patna Police (@PatnaPolice24x7) August 13, 2024
इस संबंध में @EastSP_Patna द्वारा दी गई बाइट pic.twitter.com/3hlvsEkMNa
पोलीस CCTV फुटेज तपासण्यात व्यस्त
रात्री साधारणतः दहा वाजताच्या सुमारास 50 वर्षीय अजय साह डेअरी बूथवर बसला होता. तेवढ्या एक दुचाकी तिथे आली आणि दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी अजय साह यांच्यावर गोळ्या झाडल्या. या हल्ल्यात अजय साह गंभीर जखमी झाले होते. डेअरी घराशेजारीच असल्यानं गोळ्यांच्या आवाजानं कुटुंबियांनी घराबाहेर धाव घेतली. त्यावेळी अजय साह यांच्यावर हल्ला झाला असून या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाल्याचं दिसून आलं. जखमी अजय साह यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यांना तातडीनं उपचार केंद्रात नेण्यात आलं. मात्र, तोपर्यंत फार उशीर झाला होता. डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. दरम्यान, पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)